Saturday, December 28, 2019

ब्रिजधाममध्ये अनुपम पुरवत यांचा सदाबहार गीतांचा कार्यक्रम

ब्रिजधाममध्ये अनुपम पुरवत यांचा सदाबहार गीतांचा कार्यक्रम
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि.  ९ जून २०१९  रोजी सायंकाळी  ५ वाजता  गायक अनुपम पुरवत याचा सदाबहार हिंदी व मराठी गीताच्या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुरवत यांनी एकापेक्षा एक सरस अशी गाणी सादर करून ज्येष्ठ नागरिकांकडून  दाद मिळविली.
     कार्यक्रमाच्या सुरुवातीला “देहाची तिजोरी भक्तीचा ठेवा, उघड दार देवा आता या भक्ती गीतांनी करण्यात आली. त्यानंतर मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यामध्ये गंध मोहरते...”, “ दाम करी काम येड्या दाम करी काम...”, शोधिशी मानवा राउळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी...”, गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर खुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू...”, “खाइके पान बनारस वाला खुल जाए बंद अकल का ताला फिर तो ऐसा करे धमाल सीधी कर दे सबकी चाल ओ छोरा गंगा किनारे वाला खाइके पान बनारस...”, ये शाम मस्तानी मदहोश किये जाये...”, “ मेरे मितवा, मेरे मित रे आज तुझ को पुकारे मेरे गीत रे ओ मेरे मितवा...”, “ कभी कभी मेरे दिल मै ख्याल आता है...”, “ रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन ...”, “ मै जिंदगी का साथ निभाता चला गया...”, “ आने से उसके आये बहार, जाने के उसके जाये बहार, बडी मस्तानी है मेरी दिलरुबा...”, “ किसी की मुस्कराहटो पे हो फिदा...”, अशी सदाबहार गाणी सादर केली. “झिंग झिंग झिंगाट या गाण्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. खमितकर यांनी अत्यंत सुंदररित्या केले.
          कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी अनुपम पुरवत यांचा सत्कार केला.सर्वांचे आभार मानले आणि  कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

ब्रिजमोहन दिव्य योग सेवा केंद्र तर्फे “ मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबीर संपन्न ”

ब्रिजमोहन दिव्य योग सेवा केंद्र तर्फे “ मोफत मधुमेह
व रक्तदाब तपासणी  शिबीर संपन्न ”

सोलापूर: ब्रिजमोहन दिव्य योग सेवा केंद्र सोरेगाव येथे  दिनांक: ३० जून  २०१९ रोजी दुपारी ४ ते ७ यावेळेत “ मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबीर”  आयोजित करण्यात आले होते. यामध्ये आयुर्वेद उपचार केले गेले.  या शिबिरात सुमारे १६० नागरिकांची तपासणी केली.
     तसेच आहार व आरोग्य विषयी मोफत मार्गदर्शन व तपासणी तज्ञ डॉ. सुरेश खमितकर  यांच्या मार्फत केले गेले. त्याच्या सोबत डाबर इंडिया लिमिटेडचे मँनेजर श्री राहुल रणसुरे व किशोर मोक्षेकर यांनी सर्व ज्येष्ठ नागरिक व महिलांची मधुमेह तपासणी केली. यावेळी वरिष्ठ फार्मासिस्ट  श्री राणे यांचे सहकार्य लाभले.
    श्री ब्रिजमोहन फोफलिया यांनी मधुमेहासंबधी उपयुक्त माहिती सांगितली.तसेच वृद्धापकाळात काय, काय व्याधी उत्पन्न होतात. व त्यावर मात कशी करावी. याविषयी मार्गदर्शन केले. शिबिरास मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

Friday, December 27, 2019

ब्रिजधाममध्ये ग्रोथ अकॅडमीचा डान्सचा जल्लोष

ब्रिजधाममध्ये ग्रोथ अकॅडमीचा डान्सचा जल्लोष
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि.  १४ जुलै २०१९  रोजी सायंकाळी  ५ वाजता  अनिल गणपत राठोड यांच्या  ग्रोथ अकॅडमीचा डान्स व  सदाबहार हिंदी व मराठी गीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ग्रोथ अकॅडमीच्या विध्यार्थी व विध्यार्थिनी यांनी एकापेक्षा एक सरस अशा गाण्यांवर डान्स  सादर करून ज्येष्ठ नागरिकांकडून  दाद मिळविली. यामध्ये  विविध प्रकारच्या  गाण्यांवर डान्सचे   सादरीकरण करण्यात आले. स्टंटडान्स, ब्रेक डान्स  अॅक्शन डान्स, ग्रुप डान्स, मायकेल जँक्सन डान्स, हिप पॉप डान्स, सोलो डान्स इत्यादी डान्सचे प्रकार सादर करण्यात आले.
     कार्यक्रमाच्या सुरुवातीला “ ये जो मोहब्बत है ये उनका है नाम .......”- डान्स, “ तुने ये रंगीला कैसा जादू किया....”- गायन, “ तुम हि मेरी मंझील तुम हि मेरी पूजा, तुम हि देवता हो... गायन , लाल छडी मैदान खडी...’ –डान्स, ही पोळी साजूक तुपातली, तिला नवऱ्याचा लागलाय नाद....”- डान्स, “ आँख मारे वो लडका आँख मारे...” डान्स, स्लो मोशन में .....” –डान्स, उर्वशी उर्वशी .....” – डान्स, आला रे आला सिम्बा आला....डान्स अशी अनेक नवीन जुनी रिमिक्स गाण्यांवर डान्स करण्यात आले.  अनिल राठोड- ग्रोथ अकॅडमी हेड, सौ. सरस्वती मुडके, सौ. देवशाला सगर, संजय केंगार, आकाश मैनावाले, माधुरी डहाळे- गायक कलाकर ,इत्यादी २४ कलाकारांनी आपली कला सादर केली.
          कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी ग्रोथ अकॅडमीच्या  कलाकरांचा सत्कार केला.सर्वांचे आभार मानले आणि  कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
ब्रिजधाममध्ये गायक मुकेश यांची जयंती साजरी
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि.  २१ जुलै २०१९  रोजी सायंकाळी  ५ वाजता  हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायक स्वर्गीय मुकेश यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त  मुकेश व लता मंगेशकरयांच्या युगलगीतांचा सदाबहार हिंदी गीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. सुरेश खमितकर व मीरा देशपांडे यांनी अतिशय सुरेल व हुबेहूब आवाजामध्ये लता व मुकेश यांची गाणी  सादर करून ज्येष्ठ नागरिकांकडून  दाद मिळविली. आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अविनाश पत्की यांनी अतिशय बहारदारपणे केले..
     कार्यक्रमाची सुरुवात “ हमसफर मेरे हमसफर  .......”- पोर्णिमा या सदाबहार गीताने करण्यात आली. त्यानंतर  “ दिल की नजर से नजरो की दिल से ये बात क्या है, ये राज क्या है, कोई हमे बता दे.......”- अनाडी, “मेहबूब मेरे मेहबूब मेरे, तू है तो दुनिया कितनी हसी है, जो तू नही तो कुछ भी नही है,....”- पत्थर के सनम, “ मेरा प्यार भी तू है, ये बहार भी तू है.... साथी, “ आजा रे अब मेरा दिल पुकारा रो रो के गम भी हारा ...” – आह, “ किसी राह में, किसी मोड पर ...”- मेरे हमसफर,  “ ओ मेरे सनम, ओ मेरे सनम...” –संगम, “ सावन का महिना पवन करे सोर ...” मिलन, “ दिल तडफ तडफ के कह  रहा है ...” – मधुमती, “ क्या खूब लगती हो, बडी सुंदर लगती हो....” – धर्मात्मा, “ फुल तुम्हे भेजा है खत मै ...” – सरस्वती चंद, “  धीरे धीरे बोल कोई  सून ना ले ...” – गोरा और काला, “ एक प्यार का नगमा है ....”- शोर , अशी एकापेक्षा एक अशी सुंदर गीते अतिशय उत्तम रित्या सादर करून ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले.  श्री अविनाश पत्की यांनी यांनी आपल्या निवेदनामध्ये राज कपूर, आनंद बक्षी, राजेंदकुमार यांचे विविध किस्से सांगितले.  
          कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी  कलाकरांचा सत्कार केला. व  श्री जोजन यांनी सर्वांचे आभार मानले आणि  कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
 

ब्रिजधाममध्ये “बाँलिवूड गाण्यांचे” आयोजन

ब्रिजधाममध्ये “बाँलिवूड गाण्यांचे” आयोजन
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि.  २८ जुलै २०१९  रोजी सायंकाळी  ५ वाजता  हिंदी चित्रपटसृष्टीतील “ बाँलीवूड सदाबहार हिंदी गीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बाँलीवूड सिंगीग क्लासेसचे श्री. रुकुम बागवान व श्री शिरीष पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट गीते अनेक कलाकारांनी सादर करून सर्व ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
     कार्यक्रमाची सुरुवात तनुश्रीने गायलेल्या “सत्यम शिवम सुंदरम“ ......” या सदाबहार गीताने करण्यात आली. त्यानंतर  श्री. पाटील यांनी “रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन ....”, सौ. रेखा खळसोडे यांनी “कभी कभी मेरे दिल में ख़याल आता है, के जैसे तुझ को बनाया गया है मेरे लिए तू अब से पहले सितारों में बस रही थी कही तुझे जमीं पे बुलाया गया है मेरे लिए...”, श्रीरंग बनसोडे यांनी साँसों की ज़रूरत है जैसे साँसों की ज़रूरत है जैसे ज़िंदगी के लिये बस एक सनम चाहिये आशिक़ी के लिये ....”, सौ. संध्या पतंगे यांनी “ये समा समा है ये प्यार का किसी के इंतज़ार का दिल ना चुराले कहीं मेरा मौसम बहार का...”  कु. चैताली हिने “ये मोह मोह के धागे तेरी उँगलियों से जा उलझे ये मोह मोह के धागे तेरी उँगलियों से जा उलझे...” श्री. गायकवाड यांनी “ज़िंदगी का सफ़र है ये कैसा सफ़र कोई समझा नहीं कोई जाना नहीं है ये कैसी डगर चलते हैं सब मगर कोई समझा नहीं कोई जाना नहीं..”  डॉ. पोतदार व चैताली यांनी वादा करो नहीं छोड़ोगी तुम मेरा साथ, जहाँ तुम हो, वहाँ मैं भी हूँ वादा करो नहीं छोड़ोगी तुम मेरा साथ जहाँ तुम हो, वहाँ मैं भी हूँ...” कु. गौरी हिने “डोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर....”, जैस्वाल यांनी “ हमे ओर जिने की चाहत ना होती अगर तुम ना होते.....”, सौ रेखा खळसोडे व गायकवाड यांनी “ प्रीतीचे झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ गाणी....”, शिवकुमार यांनी मेरे रश्के क़मर तू ने पहली नज़र जब नज़र से मिलाई मज़ा आ गया मेरे रश्के क़मर तू ने पहली नज़र जब नज़र से मिलाई मज़ा आ गया...” पाटील यांनी “मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा फिर भी मेरा मन प्यासा मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा फिर भी मेरा मन प्यासा...” कु. साक्षीने “टीप टीप बरसा पाणी......”  व शेवटी सौ. पतंगे व गायकवाड यांनी “ वादा करले साजना.. तेरे बिना मे ना रहू मेरे बिन तू ना रहे हो के जुदा ....” अशी एकापेक्षा एक सुंदर गाणी सादर करून सर्वांचे  मनोरंजन केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुरेश खमितकर  यांनी केले.
     कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी  कलाकरांचा सत्कार केला. व  व सर्वांचे आभार मानले आणि  कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

ब्रिजधाममध्ये ऑर्केस्ट्रा व लघु नाटिका सादर

ब्रिजधाममध्ये ऑर्केस्ट्रा व लघु नाटिका सादर

 सोलापूर :  सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि.  ४ ऑगस्ट २०१९  रोजी सायंकाळी  ५ वाजता ऑर्केस्ट्रा  प्रभाकर सलगर वुईथ इमोशन्स स्प्रिंकलर्स यांचा सदाबहार हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्वप्रथम सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली देण्यात आली.  व   त्यांनी गायलेली काही  गाणी सादर करण्यात आली.
          कार्यक्रमाची सुरुवात श्री प्रभाकर सलगर यांनी  शिर्डीवाले साईबाबा  हे गीत सादर करून केले.  त्यानंतर छु कर मेरे मन को किया तूने क्या इशारा ……” , सोला बरस की बाली उमर को सलाम……” “ या जन्मावर या जगण्यावर  शतशः प्रेम करावे…” “  एक लडकी को देखा तो ऐसा लगा ….” “  नैनो मे सपना सपनो मे सजना सजना पे दिल आ गया ….” “  पापा कहते है बडा नाम करेगा…” “  आने से उसके आई बहार…”  मेरे सपनोंकी रानी कब आएगी तू …” “  बदन पे सितारे लपेटे हुए …”  झिंग झिंग झिंगाट …” , इत्यादी गीतांनी  ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले. प्रभाकर सलगर  यांच्यासोबत   वैष्णवी  हिने देखील गीते सादर केली.  या कार्यक्रमाचे   सूत्रसंचालन  श्री संजय घोलप      श्रुतकीर्ती सलगर यांनी केले.
           यानंतर रंग भूमी प्रतिष्ठान  मोहोळ  या संस्थेने शाळा ही लघुनाटिका सादर केली. हनुमंत काळे, दिनेश नरळे, पप्पू  शिंगाडे  व संतोष जाधव  यांनी आपल्या अभिनयाने सर्व जेष्ठ नागरिकांचे मनोरंजन केले. या मनोरंजनातूनच त्यांनी स्वच्छ भारत अभियान, पर्यावरणाचा तसेच व्यसनमुक्तीचा संदेश अतिशय विनोदी व रंजक पद्धतीने दिला.  या कार्यक्रमांमध्ये मोहोळचा १ वर्षीय मल्लखांबपटू  अथर्व रविकिरण देशमुख या राज्यस्तरीय कौशल्य प्राप्त खेळाडूचा विशेष सत्कार करण्यात आला.
     कार्यक्रमाच्या शेवटी  शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी  कलाकरांचा सत्कार केला. श्री जोजन सर यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ब्रिजधाममध्ये संरक्षण खात्यातील अधिकारी व जवान यांच्या पालकांचा सत्कार व सन्मान

ब्रिजधाममध्ये  संरक्षण खात्यातील अधिकारी व जवान यांच्या पालकांचा सत्कार व सन्मान

सदाबहार हिंदी व मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन
 सोलापूर :  सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि.  १८ ऑगस्ट २०१९  रोजी सायंकाळी  ५ वाजता  “श्याम म्युझिकल नाईट ग्रुप”  तर्फे १५ ऑगस्ट च्या प्रित्यर्थ देशभक्तीपर गीत , जुन्या व नवीन हिंदी व मराठी चित्रपट गीतांच्या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते.
          या कार्यक्रमात संरक्षण खात्यांमध्ये काम करणाऱ्या काही अधिकारी व जवान यांच्या पालकांचा सत्कार व सन्मान श्री. ब्रिजमोहन फोफलीया यांच्या हस्ते करण्यात आला. सोलापुरचे अनेक सुपुत्र हे अधिकारी व जवान हे भूदल, वायुदल, नौदल, बीएसएफ, आरपीएस अशा संरक्षण खात्यामध्ये कार्यरत आहेत. देशासाठी अहोरात्र काम करत आहेत. अशा अधिकारी व जवान यांचे  आई व वडील, भाऊ यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी ब्रिजमोहन फोफलीया म्हणाले “ देशासाठी लढणाऱ्या सध्या कार्यरत असणाऱ्या जवानांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. दिवसरात्र सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात. भारत मातेचे व आपल्या सर्वाचे संरक्षण करतात. यांची जाणीव आपण ठेवणे गरजेचे आहे. देशाच्या सेवेकरिता आपल्या मुलांना संरक्षण खात्यात पाठविलेल्या पालकांना मी वंदन व त्याच्ये अभिनन्दन करतो. असे गौरवोद्गार काढले.
      देशासाठी शत्रू बरोबर लढा देताना अनेक जवान शहीद झाले आहेत. अशा जवानांना शत शतशः प्रणाम,
      या कार्यक्रमात मेजर जय जोशी, कॅप्टन निखील देशमुख, लेफ्टनंट सुरेश खमितकर, मेजर सुमित मार्तंड, मेजर रघुनंदन, मुतालिक देसाई, लेफ्टनंट कर्नल राजेंद्र जमालपुरे, मेजर दत्तात्रय बिराजदार, फ्लाइट लेफ्टनंट साहिल बागेवाडीकर, लेफ्टनंट कर्नल सचिन बऱ्हाणपुरे, स्क्वाड्रनलीडर प्रतिक बऱ्हाणपुरे व स्क्वाड्रनलीडर यशवंत नारायणपेठकर या संरक्षण खात्यातील अधिकाऱ्याच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
               कार्यक्रमाच्या सुरुवातीला  “है प्रीत जँहा की रीत सदा, मै गीत वँहा के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनता हूँ...” – पूरब और पश्चिम या चित्रपटातील देशभक्तीपर गाणे सादर केले. त्यानंतर “नफरत की लाठी तोडो, लालच का खंजर फेंको, जिद के  पीछे मत दौडो, तुम प्रेम के पंछी हो, देश प्रेमियो आपस में प्रेम करो देश प्रेमियो...” – देश प्रेमी, “ ये मेरे वतन के लोगो, तुम खूब लगा लो नारा ये शुभ दिन है, हम सब का लहरा लो तिरंगा प्यारा...”, “ कर चले हम फिदा जान –ओ –तन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियो...”,  “ शोधिसी मानवा राऊळी मंदिरी...”, “ये तो सच है की भगवान है...”, “ मेरा जुता है जपानी ......” “तू जहा मिल गया...”, “आ अब लोट चले.......”, “ मै तो दिवाना, दिवाना, दिवाना.......”,  इत्यादी गीते सादर करण्यात आली.
     कार्यक्रमात गायक कलाकार हनुमंत हुलेरी, बाबा मुचाले, अनिल कोकाटे, अजित शेटे, व त्याचे सह गायक कलाकरांनी अनेक सदाबहार हिंदी व मराठी गाणी  सादर केली. व जेष्ठ नागरिकांची मने जिंकली.
     कार्यक्रमाच्या शेवटी  ब्रिजमोहन फोफलिया यांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले. व  कलाकरांचा सत्कार केला. आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास  ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.