ब्रिजधामला सेंट थाँमस इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट
सोलापूर: सोरेगाव येथील ब्रिजधाम आश्रमास सेंट थाँमस इंग्लिश मिडीयम स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची यंदाच्या नाताळ सणानिमित्त “एसयुपीडब्लू” “ Socially useful productivity works” या विषयातील अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भेट दिली. त्यांच्या सोबत त्यांचे मुख्याध्यापक व शिक्षक गण उपस्थित होते.
या सर्व विद्यार्थ्यांना श्री ब्रिजमोहन फोफालीया यांनी संपूर्ण आश्रमाची माहिती दिली. व त्याच्या भावी जीवनाविषयी मार्गदर्शन केले. मुलींनी आई वडील, आजी आजोबा, व मोठ्यांचा आदर केला पाहिजे. मुली या दोन कुटुंबाना जोडणारा दुवा आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांबरोबर आदरपूर्वक वागले पाहिजे. कुटुंब तोडण्यापेक्षा कुटुंब जोडले पाहिजे. घर कामात मदत केली पाहिजे. सर्व विध्यार्थानी आपल्या घरातील मोठ्यांचा (आई, वडील, आजी, आजोबा, काका, काकू) यांच्याशी प्रेमाने व आदरपूर्वक वागावे तसेच सेवा आणि वाणी यांचे महत्व सांगितले. व सेवेची सुरुवात आपण आपल्या परिवारापासून व आई वडिलांपासून करावे, त्याची आपुलकीने चौकशी करावी, आज काल टीव्ही व मोबाईलमुळे घरात कुणी एकमेकांशी बोलतानाही दिसत नाही, असे चित्र घराघरातून दिसून येत आहे. आई वडिलांनी मुलांबरोबर संवाद साधला पाहिजे. त्याच प्रमाणे मुलांनी आपल्या आई वडिलाना सर्व गोष्टी सांगाव्यात. अशा प्रकारे भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले.
ब्रिजधाम आश्रमास भेट दिल्यानंतर सर्व विद्यार्थी आनंदी होते. काही विध्यार्थानी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आश्रमातील वातावरण प्रसन्न आहे. आश्रम अतिशय स्वच्छ व नीटनेटके आहे. व फोफालिया सरांचे अनमोल मार्गदर्शन आम्हांला भावी आयुष्यासाठी खूप उपयोगी असे आहे .
सर्व विध्यार्थानी आश्रमातील वृध्द आजी आजोबांची आपुलकीने त्याची विचारपूस केली. त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या. अशा आनंदी वातावरणात विध्यार्थानी निरोप घेतला.

No comments:
Post a Comment