Wednesday, December 25, 2019

ब्रिजधाम आश्रमास शंकरलीला भजनी मंडळाची सदिच्छा भेट 1/3/2018


ब्रिजधाम आश्रमास शंकरलीला भजनी मंडळाची सदिच्छा भेट

सोलापुर : सोरेगाव येथील ब्रीजधाम आश्रमास शंकर लीला भजनीमंडळांनी सदिच्छा भेट दिली. या मंडळातील सर्व महिलांनी ब्रिजधाम आश्रमाची पाहणी केली. ब्रिजमोहन फोफलिया यांनी ब्रिजधाम आश्रमाची सविस्तर माहिती मंडळातील सदस्यांना दिली. आश्रमातील निसर्गरम्य वातावरण पाहून महिलांनी खूप आनंद व्यक्त केला.
    “ शंकर लीला भजनीमंडळांतील महिलांनी अनेक भक्तिमय भजन, कींर्तन सादर केले. त्यानंतर सौ. सिंधूताई कडादी यांनी मंडळातील महिलाच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. सिद्धेश्वर महाराजांचा जयजयकार केला. या महिला भक्तिमय जीवन जगतात. सासुपासून सुनेपर्यत हा भक्तिमय वारसा जपत आहेत.  सिंधूताईंनी विभूतीचे महत्व व महात्म सांगितले.त्यानंतर सिंधूताईनी सामुहिक विवाहाचे प्रणेते ब्रिजमोहन फोफलिया यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या ब्रिजम्हणजे अनेक लोकांना जोडणारा महान व्यक्ती असे कौतुकास्पद उद्गार काढले. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची आजच्या तरून पिढीने आदर्श घ्यावा.
    त्यानंतर सौ. लीलावती मडकी यांनी ब्रिजमोहन फोफलीया यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की फोफलिया यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्य केले. आणि पुढे ही अशीच सामाजिक कार्य त्यांनी करावीत. अशी सिध्दरामेश्वराला प्रार्थना केली.
    या कार्यक्रमास मल्लिनाथ थलंगे, काशिनाथ भातगुणकी, सौ सिंधूताई काडादी, सौ. लीलावती मडकी, राजश्री थलंगे, इंदुमती हिरेमठ, मीनाक्षी बागलकोटी, संगीता भातगुणकी, विकास हेरलगी , शंकर विजापुरे , आदित्य अरुणकुमार, श्रीधर, सुहास हे उपस्थित होते.
    ब्रिजधामच्या वतीने  सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment