प्रत्येक नागरिक हा पत्रकार आहे--
डॉ. रवींद्र
चिंचोळकर
सोलापूर- “ बदलत्या युगा बरोबर माध्यम बदलत आहे. पत्रकारांची व्याख्या बदलत आहे. माध्यमे लोकांच्या हाहात आली आहेत. आजच्या काळात प्रत्येक नागरिक पत्रकार आहे” असे विधान डॉ.श्री.रवींद्र चिंचोळकर यांनी व्यक्त केले. ब्रिजधाम आश्रम सोरेगाव येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून “समाज आणि पत्रकारिता” या विषयावर डॉ.श्री.रवींद्र चिंचोळकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ.चिंचोळकर यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासून आतापर्यंत चा माध्यमाचा प्रवास सांगितला. भारत स्वतंत्र होण्यासाठी माध्यमांनी मोलाची कामगिरी केली आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम त्यांनी केले. माहिती, ज्ञान, प्रभोधन, मनोरंजन, देशसेवा, ही माध्यमांची कार्ये आहेत. परतू स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी माध्यमे स्वरूप बदलत चालले आहे. स्पर्धेत टिकून राहण्यसाठी माध्यमे विविध प्रकारचे प्रयोग करत आहे. माध्यमाचा मूळ हेतू बाजूला बडत आहे. मध्यम लोकांना काय सांगायचे आहे याचा विचार न करता लोकांना काय पाहिजे याचा विचार आजची माध्यमे करतात. सगळ्याच बातम्या चांगल्या दिल्या तर कोणीही पाहणार नाही. वाईट दुर्घटना लोक चवीने पाहतात. मध्यमा मुळे नव्या पिढीवर चांगले-वाईट परिणाम होताना दिसते आहे. लहान मुलांवर माध्यमाचा वाईट परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहिले पाहिजे असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. सोशल मिडिया च्या मध्यातून प्रत्येक व्यक्ती आपल्या जवळील माहिती क्षणात सगळीकडे पाठवू शकतो. मध्यमा आगोदर आपल्याला व्हॉटसअप द्वारे विडीओ मिळत आहे. त्यामुळे डॉ.चिंचोळकर म्हणतात प्रत्येक नागरिक हा पत्रकार आहे. आधुनिक भारत घडवण्यासाठी माध्यमांचे खूप मोठे योगदान आहे. माध्यम समाज घडवू शकतात , त्यासाठी नागरिकांनी योग्य माहिती योग्य वेळी माध्यमापर्यंत पोहोचवण्याची काळजी घ्यावी अशी सूचना डॉ.चिंचोळकर यांनी नागरिकांना दिली. श्री.ब्रिजमोहनजी फोफलीया यांच्या हस्ते डॉ.चिंचोळकर यांचा सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संखेने उपस्थितीत होते.

No comments:
Post a Comment