Wednesday, December 25, 2019

ब्रिजधाम आश्रम येथे अक्कमादेवी लघुचित्रपटाचे चित्रीकरण 7/2/2018


 ब्रिजधाम आश्रम येथे अक्कमादेवी लघुचित्रपटाचे चित्रीकरण
            
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य ठिकाणी अक्क्मादेवी लघुचित्रपटाचे चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. या लघुचित्रपटाचे चित्रीकरण सकाळी ते सायंकाळी पर्यत जवळजवळ दिवस चालले. या चित्रीकरणासाठी जवळजवळ २०० पेक्षा जास्त कलाकार आले होते. या लघुपटाचे वैशिष्ट म्हणजे यात सर्व किरदार लेडीज कलाकारांनी सादर केले आहेत.
     लघुचित्रपटाची सुरुवात कँमेराची पूजा ब्रिजमोहन फोफलिया यांच्या हस्ते करून मुहूर्त करण्यात आला. या मुहूर्त प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. पोलीस आयुक्त महादेव तांबडे, ग्रामीण पोलीस अधीक्षक  वीरेश प्रभू हे उपस्थित होते.
बाराव्या शतकातील महान संत, कवयित्री आपल्या वचन साहित्यातून विश्वाला शांती संदेश व गुरु महिमा भक्तीतून जीवन उद्धार करून अक्क्मादेवी हे नाव जगात केलेल्या महादेवीचे जीवन कार्यातून अमर ज्योती अक्कामादेवी सिनेमा लोकांना व महिलांना प्रेरणादायी ठरणार आहे. या लघुचित्रपटाव्दारे अक्क्मादेवीचे जीवनचरित्र सर्वासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा बसवेश्वर स्थापित अनुभव मंडपात ७७ शरणी व ७०० शरण होते. त्यामध्ये अक्क्मादेवी यांचे कार्य व त्यांनी लिहिलेले वचन साहित्य जगाला प्रेरणा देणारे आहे. गुरु महिमा, गुरुभक्ती व त्यागमय जीवन जगून महादेवी यांनी सर्वांची अक्क (बहीण) म्हणून कीर्ती मिळवली होती.त्यामुळे नवीन पिढीला त्यांच्या जीवनचरित्राची ओळख होण्यासाठी अमर ज्योती अक्क्मादेवीहा लघुचित्रपट बनविण्यात येत असल्याचे चित्रपट दिग्दर्शक शंकर विजापूर यांनी दिली.
अमर ज्योती अक्क्मादेवी हा लघुचित्रपट कन्नड व हिंदीमधून तयार केला जाणार आहे. यामध्ये अक्क्मादेवीच्या प्रमुख भूमिकेत राजश्री थळंगे, अल्लमप्रभूच्या भूमिकेत मीनाक्षी बागलकोटी तर अक्क्महादेविच्या बाल भूमिकेत ख़ुशी गुणकी या असणार आहेत. लेखक, छायाचित्रकर, छायाचित्रकरण हे सर्व बेंगलोर चे आहेत.
अमर ज्योती अक्क्मादेवी लघुचित्रपटाचे चित्रीकरण पहाण्यासाठी सोलापूर वाशियानी ब्रिजधाम आश्रमात गर्दी केली होती. व चित्रीकरणाचा आनंद घेतला.

No comments:

Post a Comment