Friday, December 27, 2019

ब्रिजधाममध्ये ग्रोथ अकॅडमीचा डान्सचा जल्लोष

ब्रिजधाममध्ये ग्रोथ अकॅडमीचा डान्सचा जल्लोष
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि.  १४ जुलै २०१९  रोजी सायंकाळी  ५ वाजता  अनिल गणपत राठोड यांच्या  ग्रोथ अकॅडमीचा डान्स व  सदाबहार हिंदी व मराठी गीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ग्रोथ अकॅडमीच्या विध्यार्थी व विध्यार्थिनी यांनी एकापेक्षा एक सरस अशा गाण्यांवर डान्स  सादर करून ज्येष्ठ नागरिकांकडून  दाद मिळविली. यामध्ये  विविध प्रकारच्या  गाण्यांवर डान्सचे   सादरीकरण करण्यात आले. स्टंटडान्स, ब्रेक डान्स  अॅक्शन डान्स, ग्रुप डान्स, मायकेल जँक्सन डान्स, हिप पॉप डान्स, सोलो डान्स इत्यादी डान्सचे प्रकार सादर करण्यात आले.
     कार्यक्रमाच्या सुरुवातीला “ ये जो मोहब्बत है ये उनका है नाम .......”- डान्स, “ तुने ये रंगीला कैसा जादू किया....”- गायन, “ तुम हि मेरी मंझील तुम हि मेरी पूजा, तुम हि देवता हो... गायन , लाल छडी मैदान खडी...’ –डान्स, ही पोळी साजूक तुपातली, तिला नवऱ्याचा लागलाय नाद....”- डान्स, “ आँख मारे वो लडका आँख मारे...” डान्स, स्लो मोशन में .....” –डान्स, उर्वशी उर्वशी .....” – डान्स, आला रे आला सिम्बा आला....डान्स अशी अनेक नवीन जुनी रिमिक्स गाण्यांवर डान्स करण्यात आले.  अनिल राठोड- ग्रोथ अकॅडमी हेड, सौ. सरस्वती मुडके, सौ. देवशाला सगर, संजय केंगार, आकाश मैनावाले, माधुरी डहाळे- गायक कलाकर ,इत्यादी २४ कलाकारांनी आपली कला सादर केली.
          कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी ग्रोथ अकॅडमीच्या  कलाकरांचा सत्कार केला.सर्वांचे आभार मानले आणि  कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment