Friday, December 27, 2019

निसर्गोपचार हे मानवाला मिळालेले एक वरदान – डॉ. कामत
सोलापूर: ज्येष्ठ समाज सेवक ब्रिजमोहन फोफलिया यांनी शनिवार दि. १४ सप्टेंबर १९ रोजी “ राधे राधे निवास” येथे निसर्गोपचार डॉ. नरसिंह कामत –मुंबई यांचे निसर्गोपचार व आरोग्य विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
        डॉ. कामत यांनी आपल्या व्याख्यानात निसर्गोपचार यांची माहिती आणि महत्व सांगितले. “निसर्गोपचार हे मानवाला मिळालेले एक वरदान “ आहे. निसर्गोपचार पध्दतीने उपचार केल्यास शरीरावर इतर कोणताही वाईट परिणाम होत नाही. 'आधुनिक जीवनशैलीचा परिणाम मानवी शरीरावर होतो आणि त्यामुळे अनेक रोग उदभवतात. या रोगांवर निसर्गोपचार करणे हा एकमेव व सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. निसर्गोपचार हि विनाऔषधी  उपचार पद्धती आहे.
       डॉ. कामत यांनी  “ ज्यांचे पोट साफ त्यांचे सर्व रोग माफ” हा आरोग्याचा मंत्र सांगितला. दैनंदिन आहारात फळे, पालेभाज्या, लसून, बाजरी, नाचणी तील, ज्वारी ,राजगिरा,  मोड आलेले कडधान्य, मध, हळकुंड , जिरे, मेथी, सेन्धा लोन, रानतुलस , हिंग, कडीपत्ता, काळी मिरी, काळे खजूर, काळे मनुके, गाजर, आवळा, लिंबू, आलीव यांचा जास्तीत  वापर करावा. “एरंड तेल” हे आहारासाठी सर्वोत्तम आहे.
       आज धावपळीच्या जीवनात मनुष्य फास्ट फूडचा वापर जास्त करीत आहे. त्यामुळे न कळत आपल्या शरीरात विष तयार होत आहे. त्यामुळे अनेक आजार उद्भवत आहेत. हे टाळण्यासाठी तळलेले, मसालेदार, तिखट, आंबलेले पदार्थ, थंड पदार्थ , मसालेदार अन्न, खारटपणाचे पदार्थ, आंबट खाद्य, जंक फूड, तेलकट पदार्थ, तळलेले अन्न,  डबाबंद पदार्थ/अन्न,  रेफ्रिजरेटेड फूड, आईस्क्रीम, प्रकिया केलेले अन्न , लोणचे, पापड, चटणी, जाम, जेली, जाम, सॉस, स्क्वॅश , सिरप, कोल्ड ड्रिंक्स, कृत्रिम रंग, फ्लेवर्स,  चायनिज फूड, थाई फूड, कॉन्टिनेंटल फूड, वडापाव, पावभाजी, तंदुरी फूड, मायक्रोवेव्ह फूड, पिझ्झा, हॉटडॉग्ज, बर्गर, नूडल्स, सँडविच, मांसाहारी अन्न, अंडी, मासे, कोंबडी, लाल मांस, चहा, कॉफी, तंबाखू, कोणत्याही स्वरूपात मद्य किंवा अल्कोहोल इत्यादींचा वापर टाळावा.
      त्यांनी काही उपचार पद्धती सांगितल्या त्यामध्ये  माठातीलच पाणी पिणे,  पत्ता कोबी चिरुन त्यामध्ये हळद व पाणी घालून ते उकळावे आणि त्यांची वाफ घेणे हे फुफ्फुसासाठी चांगले आहे, सकाळी उठल्यावर एक लिटर पाणी पिणे, बद्धकोष्ट असलेल्या रुग्णांनी  पपई खावी, खांदा दुखत असेल तर थंड पाण्याची पट्टी लावावी, मायग्रेन असलेल्यांनी केळी आणि साखर खावू नये, खोकला असेल तर जवस खावे. त्याचबरोबर  कटीस्नानचे  महत्व सांगितले. “ No ill, No pills, & No Hospital Bill” असा कानमंत्र हि त्यांनी दिला.
       श्री. ब्रिजमोहन फोफलिया यांनी आपल्या मनोगतात निसर्गोपचार पद्धतीचा वापर केल्याने होणार फायदे स्व:ताच्या अनुभवातून सांगितले. ते स्व:ता बारा वर्षापासून किडनी आजाराने त्रस्त आहेत. परंतु ते निसर्गोपचार पद्धतीचा वापर केल्यामुळे स्वास्थ उत्तम आहे. खानपान, व्यायाम, योगा  हे निसर्गोपचाराचे सूत्र आहे. आज प्रत्येक मानव निसर्गाच्या नियमांचा उल्लंघन करत आहे. म्हणून त्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहे.
        त्यानंतर डॉ. कामत यांनी उपस्थित महिला व पुरुषांनी विचारलेल्या प्रश्नांना तब्बल एक तास भर देवून त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. यानंतर ब्रिजमोहन फोफलिया यांनी उपस्थितांचे आभार मानले

No comments:

Post a Comment