Friday, December 27, 2019

ब्रिजधाममध्ये “ ज्येष्ठ नागरिक दिन” साजरा

ब्रिजधाममध्ये “ ज्येष्ठ नागरिक दिन” साजरा
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक  दिनाचे औचित्य साधत “ज्येष्ठ नागरिक दिन” साजरी करण्यात आला.  या प्रसंगी श्री. व्ही. एम. जोजन सर यांनी सध्याच्या यंत्र युगात ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा आणि कथा वर्णन केल्या. ते पुढे म्हणाले, समाजातील ज्येष्ठांचे दु:ख  कमी होण्यासाठी श्री. ब्रिजमोहन फोफलिया यांनी सन २००२ साली “ ब्रिजधाम प्रतिष्ठानची स्थापना केली. ज्येष्ठ नगारिकांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन केले. आणि दर रविवारी ते ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम, गायनाचे कार्यक्रम, भारुड, भरतनाट्यम, दांडिया, कथ्थक, शास्त्रीय संगीत, अंताक्षरी, हास्यधारा, हस्यकल्लोळ, हास्यनाद, हसवाहसवी, बिनधास्त लाईफ स्टाईल, मिमिक्री, माऊथ आँर्गन, आधार कार्ड शिबीर, सुगम संगीत, योगा प्राणायम, आरोग्य विषयक शिबीर, पारिवारिक व्याख्यान, जादूचे प्रयोग, रामलीला  अशा विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत आहेत. दर रविवारी मनोरंजनाच्या कार्यक्रमासहित ज्येष्ठांना भोजनाची हि मेजवानी दिली जाते. ज्येष्ठांसाठी आतापर्यंत ९०० पेक्षाही जास्त कार्यक्रमाचे आयोजन.    
      त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरीकांसाठी  ज्येष्ठांच्या गाण्यांच्या स्पर्धा, विविध पोषाख स्पर्धा, दांडिया, व अनेक खेळांच्या स्पर्धा त्यासाठी कब्बडी, संगीत खुर्ची, पोत्याची शर्यत, लिंबू चमचा, संगीत बॉल, रस्सीखेच, याचा समावेश असतो. भारतीय परंपरेनुसार सर्व सण साजरी केले जातात. हा कार्यक्रम कोणाकडून ही रक्कम न घेता ब्रिजमोहन फोफलीया हे स्व खर्चाने करीत आहेत. ब्रिजधाम आश्रमातील ज्येष्ठ नागरिक व  शहरातील विविध भागातून भरपूर ज्येष्ठ नागरिक बंधू  भगिनी येतात व कार्यक्रमाचा आनंद घेतात. ज्या महिन्यात ज्यांचा वाढदिवस असतो त्या महिन्याअखेरीस त्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा केला जातो.
      कार्यक्रमात बोलताना जोजन सर यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी ब्रिजमोहन फोफलीया हे दर रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. हे कार्यक्रम आयोजन करताना त्यांना अनेक अडचणी येत असतात. नवीन नवीन कार्यक्रम ठरविणे, त्याचे आयोजन योग्य प्रकार करणे, कार्यक्रमानंतर जेष्ठ नागरिकांची  भोजनाची व्यवस्था करणे, लाईट , साऊंडची व्यवस्था करणे, कलाकारांची व्यवस्था करणे, बैठक व्यवस्था करणे, इत्यादी तरी फोफलीया सर हे  सर्व कामे आपल्या व्यवस्थापन कौशल्याने करून घेत असतात. या मागची भावना फक्त एकच असते की, ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य दिसू दे, त्यांना आनंद, समाधान  मिळू दे.
    ब्रिजमोहन फोफलीया यांच्या कार्याचा आढावा देताना ते म्हणाले की फोफलीया यांनी शाळेतील लहान मुळापासून जेष्ठ नागरिकासाठी त्यांनी अखंड कार्य केले आहे. ब्रिजमोहन नेत्रालयातून ९ वर्षात जवळ जवळ १६००० गरजुंचे मोफत आँप्रेशन केले आहेत. ब्रिजधाम आश्रमची स्थापना, सामुहिक विवाह सोहळा, किडनी डायलेसीस, आरोग्य शिबीर, आनंद मेळावा, दंत शिबीर, बिपी. डायबेटीस मोफत तपासणी शिबीर ई.
    या कार्यक्रमात  ज्येष्ठ नागरिक महिलां मीनाक्षी कर्णेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, आम्हांला येथे आश्रमात येवून खूप छान वाटते. नवीन नवीन कार्यक्रम आम्हांला पहायला मिळतात. घरातील कामे आम्ही लवकर लवकर करून आम्ही दर रविवारी येतो. आम्हांला माहेरी आल्याचा आनंद मिळतो. सौ. सुनंदा चनशेट्टी व श्री भानुदास रणशृंगारे यांनी ब्रिजमोहन फोफलीया यांचा सेवाभावी कार्याचा गौरव केला.
    कार्यक्रमाच्या शेवटी श्री. ब्रिजमोहन फोफलीया यांनी आश्रम स्थापनेपासूनची सर्व माहिती दिली. व ते म्हणाले, की दर रविवारच्या कार्यक्रमासाठी शहरातील निरनिराळ्या भागातून ज्येष्ठ नागरिक येत असतात. कार्यक्रमाचा आनंद घेतात.  यातच आपल्याला आनंद मिळतो. त्यानंतर त्यांनी सर्व जेष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या

No comments:

Post a Comment