Thursday, December 26, 2019

ब्रिजधाममध्ये ज्येष्ठांच्या चेहऱ्या उमटल्या “हास्यतरंग” लहरी Date 13/10/2019

ब्रिजधाममध्ये ज्येष्ठांच्या चेहऱ्या उमटल्या
“हास्यतरंग”  लहरी
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि.  १३  ऑक्टोबर २०१९  रोजी सायंकाळी  ५ वाजता “हास्य तरंग” या   कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अविनाश पत्की व त्यांचे सहकारी शेखर जेऊरकर यांनी सादरीकरण करून सर्व ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
     खर पाहता या कार्यक्रमात मनुष्य प्राणी हा सकाळपासून  ते संध्याकाळपर्यत धकधकीच्या जीवनात त्रस्त झाला असून, नेहमी तणावग्रस्त जीवन जगत असतो व या अशा धकधाकीच्या जीवनात ही त्याला विरंगुळा पाहिजे, तो नेहमी तणावग्रस्त न राहता त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले पाहिजे, हे सर्व कलाकार अविनाश पत्की यांनी खूप चांगल्या पद्धतीने नकला, गाणी, कविताचे सादरीकरण करून प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने तणावमुक्त केल्यामुळे  ज्येष्ठ नागरिकांच्या  चेहऱ्यावर हास्य लहरी उमटविल्या.  तेव्हा प्रेक्षकांनी हि टाळ्यांचा प्रतिसाद देवून दुजोरा दिला. कार्यक्रम पाहताना ज्येष्ठ नागरिक मंत्रमुग्ध होवून आस्वाद घेत पोट धरून हसत होते. सोबत त्यांचे सहकारी शेखर जेऊरकर यांनीही काही अनुभवाचे बोल प्रेक्षकांसमोर मांडल्या.
     कार्यक्रमात पुढे जेऊरकर यांनी विशेष करून स्वाक्षरी वरून मनुष्याची पारख करण्याची पद्धत याची माहिती दिली. स्वतः वरिष्ठांच्या स्वाक्षरी कागदावर घेचून त्यांना त्यावरून त्यांचे चारित्र्य व स्वभाव यांचे प्रात्यक्षिक करून सांगितले. वरिष्ठ स्तब्धपणे हे पहात होते. व एकदम अचंबित झाले. अतिशय उत्कृष्टपणे या स्वाक्षरीबाबत उहापोह केला.
     कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी  कलाकरांचा सत्कार केला. व  व सर्वांचे आभार मानले आणि  कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment