ब्रिजधाम आश्रम आयुर्वेदिक औषधालय सोरेगाव येथे
“ मोफत हाडांचे (अस्थीरोग) तपासणी शिबीर” संपन्न ”
सोलापूर: ब्रिजधाम सोरेगाव येथे दिनांक: १७ नोव्हेंबर २०१९ रोजी ब्रिजधाम आश्रम आयुर्वेदिक औषधालय सोरेगाव येथे नागरिकांसाठी “ मोफत हाडांचे ( अस्थिरोग) तपासणी शिबीराचे आयोजित करण्यात आले होते. हे शिबीर तज्ञ डॉ. अरविंद कुमठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या शिबिरासाठी गुरुप्रसाद पावली- लँब टेक्निशियन, महेश पवार – औषध वाटप, हरून शेख, हिराचंद कासार यांचे सहकार्य लाभले. या शिबिरात सुमारे १५० नागरिकांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरात टाच दुखी, गुडगे दुखी, कंबर दुखी, खांदा दुखी, मणके दुखी, मान दुखी यावर मोफत उपचार केले गेले. तसेच वयस्कर व्यक्तींच्या ठिसूळ, झिजलेले हाडांची पूर्ण तपासणी, मोफत ठिसूळ हाडांची तपसणी करून त्यांना मोफत औषधे, गोळ्याचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे मोफत रक्त तपासणी ( शुगर ) करून मोफत गोळी औषध देण्यात आले.
तसेच वृद्धापकाळात काय, काय व्याधी उत्पन्न होतात. व त्यावर मात कशी करावी. हाडांची काळजी कशी घ्यावी, त्यासाठी आहार काय घ्यावा, व्यायाम कशा करावा याविषयी उपयुक्त माहिती सांगितली. शिबिरास मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment