ब्रिजधाममध्ये “ वऱ्हाड निघाल लग्नाला” धमाल
विनोदी व्दिपात्री नाट्यप्रयोग
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि. २५ ऑगस्ट २०१९ रोजीसायंकाळी ५ वाजता लेखक दिग्दर्शक विक्रांत शिंदे यांचा “वऱ्हाड निघाल लग्नाला” हा धमाल विनोदी व्दिपात्री नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. पुणे फिल्म प्रस्तुत व वैभवदीप निर्मित या नाटकाचे सादरकर्ते होते. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एकपत्री नाट्य कलावंत विक्रांत शिंदे व सुप्रसीद्ध नाट्य व सिनेअभिनेत्री बागेश्री सप्तर्षी राहणार पुणे यांनी अनेक प्रकारच्या भूमिका सादर करून ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन केले.
स्वातंत्र लढ्यातील गोष्ट सांगणारे गुरुजी, गावातील हॉटेलमध्ये होणारा संवाद व असणारी वस्तुस्थिती, एसटी कंट्रोल, बस कंडक्टर, कवी ,मुका, आचाऱ्याचा शोध, मंगलकार्यालयातील व्यवस्थापकाने सांगितलेले कार्यालयाचे व्यवस्थापन, हळदीचा कार्यक्रम, मंडपवाल्यांशी संवाद, बॅडवाल्याची धमाल, शाहिराने सादर केलेल्या मंगलाष्टक, नवरीचा व नवऱ्याचा उखाणा, आहेर न केल्याशिवाय न जाण्याची सूचना,लग्नात डान्स करणारी मुले, घोडेवाला जेवण वाढणारे आचारी, अशा ४० विविध भूमिका व त्यांचा वेगवेगळा आवाज तसेच लग्नातील गोंधळ अतिशय उत्तमरीतीने विक्रांत शिंदे व बागेश्री सप्तर्षी यांनी अतिशय सुरेखरित्या सादर केले. या संपूर्ण नाटकाला चंद्रकांत जगताप यांनी संगीत देवून प्रयोगामध्ये रंगत आणली.
नाटकांच्या माधमातून प्रत्यक्ष लग्नसोहळा स्टेजवरती उभा करण्यात कलावंत यशस्वी झाले. खूप चांगल्या पद्धतीने विविध पात्रे साकारत दोन तास रसिक प्रेक्षकांना अक्षरशः खेळवून ठेवले. दोनच व्यक्तीने साकारलेले अनेक पात्र पाहताना रसिक प्रेक्षक भारावून गेले होते. विक्रांत शिंदे यांच्या लेखणीतून दिग्दर्शनातून तयार झालेला हा व्दिपात्री नाट्यप्रयोग महाराष्ट्रातील तमाम नाट्य रसिकांना एक हास्य मेजवानीच आहे असे गौरवोद्गार ब्रिजमोहन फोफलीया यांनी काढले. या नाट्यप्रयोगास रसिक प्रेक्षक व ज्येष्ठ नगारीक यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देवून कलाकरांचा सत्कार केला. व आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:
Post a Comment