ब्रिजधाममध्ये जादूगर गुरुराज यांचे बोलकी बाहुली व जादूचे प्रयोग
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि. २० ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता “बोलकी बाहूली व जादूचे प्रयोग” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जादुगार गुरुराज मिर्जी उर्फ एम.राज यांनी बोलकी बाहुली व जादूचे एकापेक्षा एक असे सरस प्रयोगाचे सादरीकरण करून सर्व ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
जादुगार एम.राज यांनी यावेळी खेळण्याचे पत्ते अदृश्य करणे, फुलांचा रंग बदलणे, कापलेली फीत पुन्हा अखंड करणे, पाच पत्यांचा खेळ, रिकाम्या बॉक्समधील जादू, डोळ्याला पट्टी बांधून बटाटा कापणे, व ज्या इसमाच्या डोक्यावर बटाटा कापला त्यांना जादूने नाचविणे, सर्व प्रेक्षकांसमोर अंगठी गायब करणे व ती बॉक्समधून काढून दाखविली. रिकाम्या पिशवीतून बऱ्याचशा वस्तू काढणे, तलवार तोंडामध्ये घालून परत बाहेर काढणे, जादूच्या डब्यातून खाण्याचे पदार्थ काढणे, ५२ पत्त्याचा खेळ, अखंड चादरीचे एक पिशवी आहे त्यामधून वामनराव सातपुते यांनी शहनिशा केली. व नंतर जादुगराचे मुलाला त्यामध्ये ठेवून वरून गाठ त्या पोत्याला बांधून जादूने मुलाला सोडवून स्वतः पोत्यातून बाहेर आले.
जादूगर गुरुराज मिर्जी यांनी आतापर्यंत महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, गुजरात, आंध्र त्याचप्रमाणे दुबई, बहारीन, इजिप्त आदी देशातही आपल्या जादूचे प्रयोग केले आहेत. त्यांनी फेव्हिकॉल, कोलगेट, वूड गार्ड या कंपनांच्या जाहिरातीतही काम केले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या अनेक प्रचार मोहिमेत सहभाग घेतला आहे. त्यांनी जादू क्षेत्रात अनेक पुरस्कारही प्राप्त केलेले आहेत. विशेष म्हणजे ते जादूगर असूनही अध्यात्माची आवड असल्याने त्यांनी अनेक धर्मग्रंथांचे अध्ययन केले आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी कलाकरांचा सत्कार केला. व व सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

No comments:
Post a Comment