ब्रिजधाममध्ये देवेंद्र औटी यांचे कवी संमेलन
मानवी भावभावनांचे प्रतिनिधीत्वं करते ती हृद्यस्पर्शी कविता-
कवी देवेंद्र औटी
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि. ८ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता कवी देवेंद्र औटी, विजय गायकवाड, सतीश गडकरी यांनी सुंदर एका पेक्षा एक असा कविता सादर केल्या. कवी देवेंद्र औटी हे एक महान कवी आहेत. त्याच्या अनेक कविता आकाशवाणीवर प्रसारित झाल्या आहेत. त्यांना आतापर्यंत ५० पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. विजय गायकवाड हे दैनिक सुराज्यमध्ये पत्रकार म्हणून काम करतात. त्याचबरोबर कविता लिखाण करतात.त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सतीश गडकरी हे एक कवी तर आहेतच त्याचबरोबर ते भजनकार, गीतकार आहेत. या कवी संमेलनात त्यांनी कविता सादर करून ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन केले.
कवी संमेलनात कवींनी पुढील कविता सादर केल्या. “ माणूस शोधतो मी” – सुखाच्या असोशिएशन पडदा पडदा म्हणत पळणारी जीवनाची मार्केटिंग करून जगणारी जिवंतपणाचा माणूस शोधतो मी, “कोशिश – नाही बांधून घेतली दावणीला नेतृत्व दातृत्व महत्वाचे आहे.बंधन कसलच अडकल नाही तळयात मळ्यात मी कोण स्वच्छंद माझ जगण. शुभ चिंतन कोशिश, “ सुपुत्र” – वृद्ध जोडप काठी टेकीत चालल ते निराधार माझ्या बाल मित्राचे आई बाबाचे मित्र आमच कर्म खोट आहे. – कवी देवेंद्र औटी, “ उज्वल भारत घडवू या मानवताच्या हत्याराला धडा शिकवू या. एकात्मताच्या वतीने नवीन भारत घडवू या” , “ माणूस जानवर झाला- जनावरांची जात माणूस झाला. जात घात केल्याशिवाय रहात नाही.”, “ पिकल पान म्हणून हिणवू नका त्यांनी सोसले वारा, त्यांनी दिली सावली म्हणून आम्ही मोठे झाले. – विजय गायकवाड, “ ३७० कलम बद्दल विचार मांडले. स्वतंत्रदिन झेंडा लावू अतिरेक्यांना धडा शिकवू, “ प्रार्थना – स्मरण आज करू त्यांचे ज्यांनी देशासाठी प्राण दिले, जय जवान जय किसान का पुसट झाला., “ समर्पित – पिकल्या केसांसमोर उभे रहा, मोठ्यांना मान द्यावा आई बद्दल आदर – सतीश गडकरी
माणसांच्या जीवनातील सुख – दु:खाना समाजासमोर मांडून योग्य मार्ग दाखविते तीच कविता काळजाला भिडते. यासाठी वास्तवासी नाळ तुटू देवू नये यासाठी कविता भूमिका मांडते असे मत ज्येष्ठ कवी देवेंद्र औटी यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिक एम. एस. अंबुसे यांचे निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देवून कलाकरांचा सत्कार केला. व आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:
Post a Comment