Friday, December 27, 2019

ब्रिजधाममध्ये “सदाबहार गाण्यांचे” आयोजन Date 22/9/2019

ब्रिजधाममध्ये “सदाबहार गाण्यांचे” आयोजन
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि.  २२ सप्टेंबर २०१९  रोजी सायंकाळी  ५ वाजता  हिंदी चित्रपटसृष्टीतील “ बाँलीवूड सदाबहार हिंदी गीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गोदावरी कॉलेजचे डॉ. श्रीकांत देशमुख, दीपक पोतदार, महेश माने, वर्षा सोनवले, मंगल गायकवाड, चैताली जमादार व त्यांचे सहकारी विध्यार्थी विध्यार्थिनीनी जुने व नवीन गाणी सादर करून  सर्व ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
     कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पोतदार व चैताली जमादार यांनी गायलेल्या गणेश प्रार्थना “ प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया “ ......” या सदाबहार गीताने करण्यात आली. त्यानंतर  श्री. शेख  यांनी “जीवनाविषयी  सार – जीवन संघर्ष असत, जीवन सुंदर आहे. असे सांगितले. त्यानंतर डॉ. दीपक पोतदार व वर्षा सोनवले  यांनी “मै यहाँ तू वहाँ मै तुझे ढूँढता तुम  कहाँ | मै ढूँढता तुझे रात दिन ओ मेरे हमसफर ...”, डॉ. महेश माने  यांनी मेरे सपनों की राणी कब आयेगी तू  ....”, डॉ. देशमुख  यांनी “सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था आज भी है ...”  डॉ. पोतदार वर्षा सोनवले  यांनी  “तुने ये रंगीला कैसा जादू किया पिया पिया बोले मत वाला जिया ..” वैष्णवी गोरंटला कृष्ण जिनका नाम है गोकुळ जिनका धाम है ऐसे भगवान को बारबार प्रणाम है यशोदा जिसकी मैय्या है .....”  चैताली यांनी मोह मोह के धागे मेरे उंगलीयों के मिले ..” प्रभाकर यांनी  “बदन पे सितारे लपेटे. हुये ओ जाने तमन्ना किधर जा रही हो. जरा पास आओ ....”, डॉ.दीपक पोतदार व चैताली जमादार यांनी – ये शाम मस्तानी मदहोश किये जाये मुझे  डोर कोई खींचे ,तेरी और लिए जाए ये शाम मस्तानी मदहोश किये जाए मुझे डोर कोई खींचे तेरी और लिए जाए  यांनी “ हमे ओर जिने की चाहत ना होती अगर तुम ना होते.....”, धीरज  यांनी “ प्रार्थना आहे “ मर मर के जी लिये जिने दो, जिने दो...”, डॉ. श्रीकांत देशमुख “ जाने कहा गये वो दिन कहते जाने कहाँ  गए वो दिन, कहते थे तेरी राह में नज़रों को हम बिछाएंगे जाने कहाँ गए वो दिन, कहते थे तेरी राह में नज़रों को हम बिछाएंगे चाहे कहीं भी तुम रहो, चाहेंगे तुमको उम्र भर तुमको ना भूल पाएंगे. ..” अशी एकापेक्षा एक सुंदर गाणी सादर करून सर्वांचे  मनोरंजन केले.  रमजान शेख यांनी चारोळे सादर केले. “ तू नसता तर, चांद पे फुलले नसते , “ संस्कार आणि प्रेम , ती माझी होऊ शकत नाही. प्रेम म्हणजे प्रेम असते इत्यादी. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगल गायकवाड यांनी केले.
     कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी  कलाकरांचा सत्कार केला. व  व सर्वांचे आभार मानले आणि  कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment