ब्रिजधाम आश्रममध्ये उपप्रवर्तक पारसमुनीजी महाराज
यांचे संघासहित आगमन व विहार
सोलापूर: ब्रिजधाम आश्रम सोरेगाव येथे दि. २५ एप्रिल १९ रोजी उपप्रवर्तक पारसमुनीजी महाराज यांचे संघासहित आगमन व विहार झाले. महाराजांच्या आगमनामुळे आश्रामातील वातावरण भक्तिमय झाले होते.
उपप्रवर्तक पारसमुनीजी महाराज व त्यांचा संघ हे बेंगलोरहून पुण्याला जाणार आहेत. त्यावेळी त्यांचे ब्रिजधाम आश्रम येथे आगमन झाले. महाराजांनी आश्रमाची पाहणी केली. आश्रमातील प्रसन्न वातावरण बघून समाधान व्यक्त केले.
त्यांनी ब्रिजमोहन फोफलिया यांच्या कार्याबद्दल स्तुती केली आणि म्हणाले “ तुम्ही अथक प्रयास करून अलौकिक असा वृद्धाश्रमाची निर्मिती केली. येथे येवून आम्हांला हार्दिक आनंदाची अनुभूती झाली. आज ही तुमच्या सारखी मुले आहेत की जे निराधार आई वडीलांची मुलगा बनून सेवा करत आहेत. त्यामुळे आमच्या ह्दयातून हे बोल येतात की धन्य आहेत तुमचे आई व वडील ज्यांनी तुमच्या सारख्या सेवाभावी मुलाला जन्म दिला. आणि हे सेवाभाव तुम्हांला पुढील जन्मात पण सुख सुविधा संपन्न बनवतील असा आशीर्वाद हि दिला.
उपप्रवर्तक पारसमुनीजी महाराज यांच्या संघात उपाध्याय रविंदमुनीजी महाराज सा, रमणिक महाराज ऋसंब मुनी, प्रदीप मुनी, ऋषी मुनी, पुष्पपेंद्र मुनी, वैभव मुनी, अरहम मुनी होते.
उपप्रवर्तक पारसमुनीजी महाराज यांच्या दर्शनासाठी जैन समाज व भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
No comments:
Post a Comment