Saturday, December 28, 2019

ब्रिजमोहन दिव्य योग सेवा केंद्र तर्फे “ मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबीर संपन्न ”

ब्रिजमोहन दिव्य योग सेवा केंद्र तर्फे “ मोफत मधुमेह
व रक्तदाब तपासणी  शिबीर संपन्न ”

सोलापूर: ब्रिजमोहन दिव्य योग सेवा केंद्र सोरेगाव येथे  दिनांक: ३० जून  २०१९ रोजी दुपारी ४ ते ७ यावेळेत “ मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबीर”  आयोजित करण्यात आले होते. यामध्ये आयुर्वेद उपचार केले गेले.  या शिबिरात सुमारे १६० नागरिकांची तपासणी केली.
     तसेच आहार व आरोग्य विषयी मोफत मार्गदर्शन व तपासणी तज्ञ डॉ. सुरेश खमितकर  यांच्या मार्फत केले गेले. त्याच्या सोबत डाबर इंडिया लिमिटेडचे मँनेजर श्री राहुल रणसुरे व किशोर मोक्षेकर यांनी सर्व ज्येष्ठ नागरिक व महिलांची मधुमेह तपासणी केली. यावेळी वरिष्ठ फार्मासिस्ट  श्री राणे यांचे सहकार्य लाभले.
    श्री ब्रिजमोहन फोफलिया यांनी मधुमेहासंबधी उपयुक्त माहिती सांगितली.तसेच वृद्धापकाळात काय, काय व्याधी उत्पन्न होतात. व त्यावर मात कशी करावी. याविषयी मार्गदर्शन केले. शिबिरास मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment