ब्रिजधाममध्ये संरक्षण खात्यातील अधिकारी व जवान यांच्या पालकांचा सत्कार व सन्मान
सदाबहार हिंदी व मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि. १८ ऑगस्ट २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता “श्याम म्युझिकल नाईट ग्रुप” तर्फे १५ ऑगस्ट च्या प्रित्यर्थ देशभक्तीपर गीत , जुन्या व नवीन हिंदी व मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात संरक्षण खात्यांमध्ये काम करणाऱ्या काही अधिकारी व जवान यांच्या पालकांचा सत्कार व सन्मान श्री. ब्रिजमोहन फोफलीया यांच्या हस्ते करण्यात आला. सोलापुरचे अनेक सुपुत्र हे अधिकारी व जवान हे भूदल, वायुदल, नौदल, बीएसएफ, आरपीएस अशा संरक्षण खात्यामध्ये कार्यरत आहेत. देशासाठी अहोरात्र काम करत आहेत. अशा अधिकारी व जवान यांचे आई व वडील, भाऊ यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी ब्रिजमोहन फोफलीया म्हणाले “ देशासाठी लढणाऱ्या सध्या कार्यरत असणाऱ्या जवानांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. दिवसरात्र सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात. भारत मातेचे व आपल्या सर्वाचे संरक्षण करतात. यांची जाणीव आपण ठेवणे गरजेचे आहे. देशाच्या सेवेकरिता आपल्या मुलांना संरक्षण खात्यात पाठविलेल्या पालकांना मी वंदन व त्याच्ये अभिनन्दन करतो. असे गौरवोद्गार काढले.
देशासाठी शत्रू बरोबर लढा देताना अनेक जवान शहीद झाले आहेत. अशा जवानांना शत शतशः प्रणाम,
या कार्यक्रमात मेजर जय जोशी, कॅप्टन निखील देशमुख, लेफ्टनंट सुरेश खमितकर, मेजर सुमित मार्तंड, मेजर रघुनंदन, मुतालिक देसाई, लेफ्टनंट कर्नल राजेंद्र जमालपुरे, मेजर दत्तात्रय बिराजदार, फ्लाइट लेफ्टनंट साहिल बागेवाडीकर, लेफ्टनंट कर्नल सचिन बऱ्हाणपुरे, स्क्वाड्रनलीडर प्रतिक बऱ्हाणपुरे व स्क्वाड्रनलीडर यशवंत नारायणपेठकर या संरक्षण खात्यातील अधिकाऱ्याच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला “है प्रीत जँहा की रीत सदा, मै गीत वँहा के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनता हूँ...” – पूरब और पश्चिम या चित्रपटातील देशभक्तीपर गाणे सादर केले. त्यानंतर “नफरत की लाठी तोडो, लालच का खंजर फेंको, जिद के पीछे मत दौडो, तुम प्रेम के पंछी हो, देश प्रेमियो आपस में प्रेम करो देश प्रेमियो...” – देश प्रेमी, “ ये मेरे वतन के लोगो, तुम खूब लगा लो नारा ये शुभ दिन है, हम सब का लहरा लो तिरंगा प्यारा...”, “ कर चले हम फिदा जान –ओ –तन साथियो अब तुम्हारे हवाले वतन साथियो...”, “ शोधिसी मानवा राऊळी मंदिरी...”, “ये तो सच है की भगवान है...”, “ मेरा जुता है जपानी ......” “तू जहा मिल गया...”, “आ अब लोट चले.......”, “ मै तो दिवाना, दिवाना, दिवाना.......”, इत्यादी गीते सादर करण्यात आली.
कार्यक्रमात गायक कलाकार हनुमंत हुलेरी, बाबा मुचाले, अनिल कोकाटे, अजित शेटे, व त्याचे सह गायक कलाकरांनी अनेक सदाबहार हिंदी व मराठी गाणी सादर केली. व जेष्ठ नागरिकांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले. व कलाकरांचा सत्कार केला. व आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:
Post a Comment