Friday, December 27, 2019

ब्रिजधाममध्ये ऑर्केस्ट्रा व लघु नाटिका सादर

ब्रिजधाममध्ये ऑर्केस्ट्रा व लघु नाटिका सादर

 सोलापूर :  सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि.  ४ ऑगस्ट २०१९  रोजी सायंकाळी  ५ वाजता ऑर्केस्ट्रा  प्रभाकर सलगर वुईथ इमोशन्स स्प्रिंकलर्स यांचा सदाबहार हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्वप्रथम सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली देण्यात आली.  व   त्यांनी गायलेली काही  गाणी सादर करण्यात आली.
          कार्यक्रमाची सुरुवात श्री प्रभाकर सलगर यांनी  शिर्डीवाले साईबाबा  हे गीत सादर करून केले.  त्यानंतर छु कर मेरे मन को किया तूने क्या इशारा ……” , सोला बरस की बाली उमर को सलाम……” “ या जन्मावर या जगण्यावर  शतशः प्रेम करावे…” “  एक लडकी को देखा तो ऐसा लगा ….” “  नैनो मे सपना सपनो मे सजना सजना पे दिल आ गया ….” “  पापा कहते है बडा नाम करेगा…” “  आने से उसके आई बहार…”  मेरे सपनोंकी रानी कब आएगी तू …” “  बदन पे सितारे लपेटे हुए …”  झिंग झिंग झिंगाट …” , इत्यादी गीतांनी  ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले. प्रभाकर सलगर  यांच्यासोबत   वैष्णवी  हिने देखील गीते सादर केली.  या कार्यक्रमाचे   सूत्रसंचालन  श्री संजय घोलप      श्रुतकीर्ती सलगर यांनी केले.
           यानंतर रंग भूमी प्रतिष्ठान  मोहोळ  या संस्थेने शाळा ही लघुनाटिका सादर केली. हनुमंत काळे, दिनेश नरळे, पप्पू  शिंगाडे  व संतोष जाधव  यांनी आपल्या अभिनयाने सर्व जेष्ठ नागरिकांचे मनोरंजन केले. या मनोरंजनातूनच त्यांनी स्वच्छ भारत अभियान, पर्यावरणाचा तसेच व्यसनमुक्तीचा संदेश अतिशय विनोदी व रंजक पद्धतीने दिला.  या कार्यक्रमांमध्ये मोहोळचा १ वर्षीय मल्लखांबपटू  अथर्व रविकिरण देशमुख या राज्यस्तरीय कौशल्य प्राप्त खेळाडूचा विशेष सत्कार करण्यात आला.
     कार्यक्रमाच्या शेवटी  शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी  कलाकरांचा सत्कार केला. श्री जोजन सर यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment