ब्रिजधाम आश्रम येथे नववर्षाचे स्वागत मुस्तफा मुल्ला
यांच्या भजनाने
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी नववर्षाचे औचित्य साधून रविवार दि. ३१ डिसेंबर १७ रोजी सायंकाळी ५ वाजता मोरेश्वर भजनी मंडळ माचनूर यांच्या भक्तिगीते, भावगीते, गवळण, कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मुस्तान मुल्ला व त्यांच्या सह कलाकारांनी कार्यक्रम सादर केला. व उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस गणेश वंदना – “ॐकार स्वरूपा सद्गुरू समर्था अनाथाच्या नाथा तुज नमो” या गीताने करण्यात आली. त्यानंतर “घेई घेई घेई नाम वाचे, नाव तुझे घेता विठ्ठला ..” हा तुकाराम महाराजांचा अभंग सादर करण्यात आले. “ मन लगो रे लागी” दत्त दिगंबराचा अभंग, “सिद्धराम चिन्मया करुणा मूर्ती ..” , अहो अहो ओ सासूबाई – गवळण , “ चढता सुरज धीरे धीरे” – कव्वाली, “ हे ची दान दे ग देवा – भैरवी , इत्यादी गाणी सादर करून सर्व ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्घ केले. त्यामुळे सर्व वातावरण भक्तिमय झाले होते.
मस्तान मौल्ल्ला व शाम रिधुर यांनी जी भक्तिगीते, भावगीते, गवळण, कव्वाली, सादर केली. त्याच्या पहाडी आवाजाची, पंडित भीमसेन जोशी, बालगंधर्व, प्रल्हाद शिंदे त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या आवाजाची आठवण करून दिली. मस्तान मुल्ला यांना शाम, नंदकुमार बाबर ( मृदंगाचार्य) , फैसर शेख, परवेझ मुलानी, शकील मुलानी, प्रकाश जाधव या कलाकारांनी साथ दिली.
या कार्यक्रमास सर्व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी जुगलकिशोर तिवाडी यांनी सर्व कलाकारांचे कौतुक करून यांचा सत्कार केला. व भारतीय संस्कृतीमध्ये कृष्ण भक्त मुस्लीम समाजाचे भरपूर होते. त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा. सर्वांचे आभार मानले आणि का

र्यक्रमाची सांगता झाली
No comments:
Post a Comment