ब्रिजधाममध्ये मल्लखांब प्रात्यक्षिकाचा अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि. १५ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता रंगभूमी प्रतिष्ठान मोहोळ निर्मित “ काय होतय- कस वाटतय “ एक कॉमेडी लघु नाटिका आणि राज्यस्तरीय खेळाडू कुमार अथर्व देशमुख याचा मल्लखांब प्रात्यक्षिकाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “ काय होतय- कस वाटतय “ या कार्यक्रमाचे कलाकार हनुमंत काळे, दिनेश नरळे, अमोल महामुनी, संतोष जाधव यांनी आपली कला सादर करून सर्व ज्येष्ठ नागरिकांना खूप हसविले व पोट धरून जोर जोरात लोक हसून टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद देत होते .
कार्यक्रमाची सुरुवात राज्यस्तरीय कुमार अथर्व वय वर्ष १५ यांनी मल्लखांबाचे अतिशय अवघड, साहशी, आश्चर्याने तोंडात बोट घालायला लावणारे चित्त थरारक असी प्रात्यक्षिक करून दाखविली. त्याने मल्लखांबावर धनुरासन, बजरंगी आसन, बजरंगी झाप, एक पाय शीर्षासन, वजनी फराटा, सुई दोरा, असे एका मिनिटात १७ प्रकार करून भयानक थरारक प्रात्यक्षिक करून दाखून ज्येष्ठ नागरिकांकडून टाळ्याच्या गजरात वाहवा मिळविली.
मल्लखांब प्रशिक्षक यांनी कुमार अथर्व हा कशा प्रकारे मल्लखांब पटू झाला त्यांची थोडक्यात माहिती दिली. शारीरिक व्यायामाचे महत्व वरिष्ठांना सांगून त्यांना दिर्घाआयुष्य लाभो असे नमन करून ज्येष्ठ नागरिकांचे मनोबल वाढविले, पैसा असावा परंतु शारीरिक स्वास्थ, आरोग्य हि चांगले रहावे यासाठी या लहान मुलाने नवीन आदर्श मांडला. व वरिष्ठ नागरिकांनी आपले नातवंडे, मुलांनीही याचे धडे द्यावेत हे सांगितले

No comments:
Post a Comment