Saturday, December 28, 2019

ब्रिजधामला यशोधरा नर्सिग इन्स्टिट्यूटच्या परिचारीकांची शैक्षणिक भेट

ब्रिजधामला  यशोधरा नर्सिग इन्स्टिट्यूटच्या  
परिचारीकांची शैक्षणिक भेट
(आश्रमातील आजी – आजोबांचे जाणून घेतले जीवन परिचारिकांनी )
सोलापूर: सोरेगाव येथील ब्रिजधाम आश्रमास यशोधरा नर्सिंग इन्स्टिट्यूट सोलापूर परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय येथील जी.एन.एम तृतीय वर्षात शिकणाऱ्या विध्यार्थीनींनी शैक्षणिक भेट दिली. भारतीय परिचर्या परिषद नवी दिल्ली यांचे अभ्यासक्रमानुसार “कम्युनिटी हेल्थ नर्सिंग” या विषयाला अनुसरून परिचारिकांच्या शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
      परिचारिका प्रशिक्षण इन्स्टिट्यूट मधील या सर्व विध्यार्थीनींनी शैक्षणिक भेट देताना आश्रमातील वातावरण अचूक टिपले. यावेळी श्री ब्रिजमोहन फोफालीया यांनी संपूर्ण आश्रमाची माहिती दिली. व त्याच्या भावी जीवनाविषयी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते म्हणाले की, “ आई वडील” हेच आपले श्रद्धास्थान तेच आपले दैवत, तेव्हा आई वडिलांन विषयी त्यांची महती सांगून त्यांनी स्वतः थोर विचारवंत, महापुरुष, संत महात्मे त्यांच्या काही पुस्तकामधून त्यांच्या वाचनात आलेली काही सुविचार, चांगले लेखन संग्रहित केले होते, त्या विचारांची चर्चा त्यांनी कथन केले.  मुलींनी आई वडील, आजी आजोबा, व मोठ्यांचा आदर केला पाहिजे. मुली या दोन कुटुंबाना जोडणारा दुवा आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांबरोबर आदरपूर्वक वागले पाहिजे. कुटुंब तोडण्यापेक्षा कुटुंब जोडले पाहिजे. घर कामात मदत केली पाहिजे.तसेच सेवा आणि वाणी यांचे महत्व सांगितले. व सेवेची सुरुवात आपण आपल्या परिवारापासून व आई वडिलांपासून पासून करावे  अशा प्रकारे भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले.
       ब्रिजधाम आश्रमास भेट दिल्यानंतर सर्व विध्यार्थीनीं आनंद व्यक्त केला. काही विध्यार्थीनीं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आश्रमातील वातावरण भारावलेले होते. आश्रम अतिशय स्वच्छ व नीटनेटके आहे. व फोफालिया सरांचे अनमोल मार्गदर्शन आम्हांला भावी आयुष्यासाठी खूप उपयोगी असे आहे. त्यांनी सांगितलेली तत्वांचे आम्ही काटेकोरपणे पालन करू. व आपल्या आई वडिलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करू असे आश्वासन हि या विध्यार्थीनीं दिले.
      सर्व विध्यार्थीनीं आश्रमातील वृध्द आजी आजोबांची  आपुलकीने त्याची विचारपूस केली. त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या. अशा आनंदी वातावरणात विध्यार्थीनीं निरोप घेतला.

No comments:

Post a Comment