ब्रिजधाममध्ये बाल चमुंचा “नृत्य आविष्कार” व फॅशन शो
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि. १९ मे २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता युसुफ पिरजादे तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युसुफ पिरजादे व त्यांच्या बाल कलाकारांनी आपला कला आविष्कार सादर केला. सोलापुरातील विविध शाळेतील वय वर्ष ७ ते १५ वयोगटातील लहान मुलांनी व मुलींनी फॅशन शो चे सादरीकरण केले. सिद्धेश्वर प्रशाला, के.एल .ई , हरीभाई देवकरण, आय.एम.एस , मुक्तांगणा, संभाजी शिंदे विद्या मंदिर, मॉडेल स्कूल इत्यादी शाळेतील मुलांनी सहभाग घेतला होता.
त्यानंतर गायक युसुफ पिरजादे यांनी काही हिंदी सिनेमामधील विविध गायकांची गाणी म्हणून ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले. “ पल पल दिल के पास तुम रहती हो”, शिर्डी वाले साई बाबा आया है तेरे दर पर सवाली इत्यादी.
श्रेया बनशेट्टी हिने “ दिवानी हो गयी या गाण्यावर नृत्य केले. सर्व जेष्ठ नागरिकांनी टाळ्या वाजवून श्रेयाचे कौतुक केले. नृत्य सादर करू बाल चमुनी ज्येष्ठ नागरिकांची मने जिंकली. त्यानंतर दादा कोंडके, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, राजकुमार, निळू फुले, यांचे आवाज काढून कार्यक्रमाची शोभा वाढविली. अनेक हिंदी व मराठी गाणी सादर करून ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले. ज्येष्ठ नागरिकांनी हि बाल कलाकारांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी सर्व कलाकारांचा सत्कार केला. व सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
No comments:
Post a Comment