ब्रिजधाममध्ये गायक मुकेश यांची जयंती साजरी
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि. २१ जुलै २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायक स्वर्गीय मुकेश यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त मुकेश व लता मंगेशकरयांच्या युगलगीतांचा सदाबहार हिंदी गीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. सुरेश खमितकर व मीरा देशपांडे यांनी अतिशय सुरेल व हुबेहूब आवाजामध्ये लता व मुकेश यांची गाणी सादर करून ज्येष्ठ नागरिकांकडून दाद मिळविली. आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अविनाश पत्की यांनी अतिशय बहारदारपणे केले..
कार्यक्रमाची सुरुवात “ हमसफर मेरे हमसफर .......”- पोर्णिमा या सदाबहार गीताने करण्यात आली. त्यानंतर “ दिल की नजर से नजरो की दिल से ये बात क्या है, ये राज क्या है, कोई हमे बता दे.......”- अनाडी, “मेहबूब मेरे मेहबूब मेरे, तू है तो दुनिया कितनी हसी है, जो तू नही तो कुछ भी नही है,....”- पत्थर के सनम, “ मेरा प्यार भी तू है, ये बहार भी तू है.... साथी, “ आजा रे अब मेरा दिल पुकारा रो रो के गम भी हारा ...” – आह, “ किसी राह में, किसी मोड पर ...”- मेरे हमसफर, “ ओ मेरे सनम, ओ मेरे सनम...” –संगम, “ सावन का महिना पवन करे सोर ...” मिलन, “ दिल तडफ तडफ के कह रहा है ...” – मधुमती, “ क्या खूब लगती हो, बडी सुंदर लगती हो....” – धर्मात्मा, “ फुल तुम्हे भेजा है खत मै ...” – सरस्वती चंद, “ धीरे धीरे बोल कोई सून ना ले ...” – गोरा और काला, “ एक प्यार का नगमा है ....”- शोर , अशी एकापेक्षा एक अशी सुंदर गीते अतिशय उत्तम रित्या सादर करून ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले. श्री अविनाश पत्की यांनी यांनी आपल्या निवेदनामध्ये राज कपूर, आनंद बक्षी, राजेंदकुमार यांचे विविध किस्से सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी कलाकरांचा सत्कार केला. व श्री जोजन यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

No comments:
Post a Comment