ब्रिजधाममध्ये रोटरी फ्रान्सच्या पाहुण्यासोबत वृद्धांनी लुटला दांडियाचा आनंद
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि. ०६ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता नवरात्र निमित्त रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ दांडिया ग्रुपतर्फे दांडिया व गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले होते. सोलापुरातील निराधार वृद्धांना दांडियाचा आनंद लुटता यावा, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रिजमोहन फोफलीया व राजगोपाल झंवर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष रवींद्र फताटे यांनी कार्यक्रमाचे महत्व व रोटरीच्या कार्याबद्दल माहिती दिली. डॉ. नेहा तंबाके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सचिव सोमनाथ बावी यांनी आभार मानले.
श्री. संजीव मेंते, मीनाक्षी मेंते, डॉ. सुमित तंबाके, डॉ. आश्विनी करपे, वंदना कोपकर, दीपक आहुजा, डॉ.बल्लाळ, डॉ. शिल्पा शहा, डॉ. सोनी, सौ. आळगी, सौ. कट्टी आणि फ्रान्स हून आलेले पाहुणे आर्थर यांनी बहारदार नृत्य सादर करून सर्व ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी कलाकरांचा सत्कार केला. व व सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

No comments:
Post a Comment