ब्रिजधाममध्ये ए.जी.पाटील महाविद्यालयच्या विध्यार्थीनींचा विविधरंगी जल्लोष
सोलापूर: सोरेगाव येथील ब्रिजधाममध्ये दि.३१ मार्च २०१९ रोजी रविवार सायंकाळी ५ वाजता ए.जी.पाटील महाविद्यालयच्या (इंजिनीअरिंग कॉलेज) विध्यार्थीनींचा विविधगुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थीनींचा गायनाचा व नृत्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात २० विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमात फँशन शो, हिंदी व मराठी गाणी, डान्स, कविता, लावणी, भाषण या विविधरंगी कलांचा आविष्कार सादर केला. यामध्ये गीता वडणे, पूजा सूर्यवंशी, पूजा लेंगरे, ऐश्वर्या कलमनी, सारिका झेंडे पाटील, निकिता कुंभार, सुप्रिया शिवशरण, निकिता म्हमाणे, लक्ष्मी हिप्परगी , कोमल बिराजदार, वर्षा तुलगावकर, लक्ष्मी सौदागर, श्रद्धा वाघमारे, प्रवीणा कसबे, ऋतुजा घुमे, महेर शेख, सरिता जंगमशेट्टी या कलाकारांनी भाग घेतला होता.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश स्तवनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थीनींनी फँशन शो केला. यावेळी विद्यार्थीनींनी वेगवेगळ्या डिझाईनचे पेहराव केले होते. व एक एक जण समोर येवून आपल्या पेहरावचे सादरीकरण करत होते. त्यानंतर काही हिंदी व मराठी गीत व नृत्य सादर करण्यात आले. “ स्त्री जन्मा ही तुझी कहाणी. – निकिता कुंभार , वडिलांनाचे महत्व – कविता,” आम आदमी कि जिंदगी – कविता , स्वतः च्या मनामध्ये शांती व परमेश्वराचे अस्थित्व कसा प्रकारे आहे याविषयी अमृता चव्हाण आणि महिलांची सद्यस्थिती यावर ऐश्वर्या कालमणी हिने भाषण केले. “आईचे प्रेम “ – कविता, त्यानंतर “ खेळताना ग बाई रंग होळीचा या लावणी गाण्याने ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन केले. उपस्थित वरिष्ठ नागरिकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. “ घ्यावा माझा सलामीचा मुजरा – लावणी, “ मुंगळा मुंगळा – ग्रुप डान्स
कार्यक्रमाच्या शेवटी सैराट या गाण्यावर विद्यार्थीनींनी जल्लोष डान्स सादर केला. या गाण्यावर ज्येष्ठ नागरिकांनी ताल धरुन चांगला प्रतिसाद दिला. शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी सर्व कलाकारांचा सत्कार व कौतुक केले. . सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

No comments:
Post a Comment