Friday, December 27, 2019

ब्रिजधाममध्ये  “नृत्यसंध्या” भरतनाट्यमच्या कार्यक्रमाचे आयोजन

 सोलापूर :  सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि.  ११ ऑगस्ट २०१९  रोजी सायंकाळी  ५ वाजता  “नृत्यसंध्या” हा भरतनाट्यम नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होता. या कार्यक्रमात जुळे सोलापूर येथील कलाश्री नृत्यालय व शिवशक्ती नृत्यालयाच्या ६० विध्यार्थीनींनी नृत्य कला सादर केली. व जेष्ठ नागरिकांची मने जिंकली.
          कार्यक्रमाच्या सुरुवातीला कलाश्री नृत्यालयाच्या संचालिका सौ शिल्पा दिक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली विध्यार्थिनींनी सर्व प्रथम गणेशवंदना सादर केली. त्यानंतर गुरुराजमुखी, रामचंद्रासजनक , जातीस्वरम , रामलक्ष्मणम, वृन्दावणी वेणू, नृत्यांजली व शिवतांडव अशी एकापेक्षा एक बहारदार नृत्य सादर केली.
          शिवशक्ती नृत्यालयाच्या संचालिका सौ. अश्विनी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विध्यार्थिनींनी नटेश कौतुकम, लावणीनृत्य, मनोमान्दिराय माधो पंचाक्षरात , आणि “ घर मोरे परदेशीया  अशी एकापेक्षा एक बहारदार नृत्य सादर करून रसिक ज्येष्ठ नागरिकांची दाद मिळविली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मानसी निलंगेकर हिने केले.
     कार्यक्रमाच्या शेवटी  ब्रिजमोहन फोफलिया यांनी सर्व नृत्यांगनांचे कौतुक केले. व  कलाकरांचा सत्कार केला. आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास नृत्य कलाकारांसोबत पालकगण व ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment