Thursday, December 26, 2019

ब्रिजधाममध्ये रील लाईफ युथ फाउंडेशन यांचा “आधार स्नेह मेळावा व सदाबहार गाण्यांचे” आयोजन Date 10/11/2019

ब्रिजधाममध्ये रील लाईफ युथ फाउंडेशन यांचा
“आधार स्नेह मेळावा व सदाबहार गाण्यांचे” आयोजन
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि.  १० नोव्हेंबर २०१९  रोजी सायंकाळी  ५ वाजता रील लाईफ युथ फाउंडेशन सोलापूर यांनी “ आधार स्नेह मेळावा व करा ओके ऑर्केस्ट्रा  हिंदी चित्रपटसृष्टीतील “ बाँलीवूड सदाबहार हिंदी गीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात काशिनाथ गुंडला व व त्यांच्या सह साथीदार यांनी जुने व नवीन गाणी सादर करून  सर्व ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
     कार्यक्रमाची सुरुवात नटराज प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर काशिनाथ गुंडला व त्यांच्या सह कलाकारांनी सदाबहार गीत सादर केले. ती गाणी पुढीलप्रमाणे  गणेश प्रार्थना “ प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया “ ......” या गीताने करण्यात आली. “ देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता उघड दार देवा....”, “ये तो सच है के भगवान है है मगर फिर भी अन्जान है धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है ये तो सच है के ”, "छू कर मेरे मन को किया तुने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा..”,“ओ मेरे सोना रे, सोना रे, सोना रे दे दूंगी जान जुदा मत होना रे मैंने तुझे ज़रा देर में जाना हुआ कुसूर खफ़ा मत होना रे ओ मेरे सोना रे...”, “  है अपना दिल तो आवारा न जाने कीस पर आयेगा....”, “ किसी की मुस्कुराह टो पे हो फिदा..” , “ आजा मधुर चांदणी में हम तुम मिले तो वीराने भी आये बहार..” , “ जिना यहाँ मारना यहाँ इसके सिवा जाना कहा....” , “ आने से उसके आये बहार जाने, जाने से उसके जाये बहार....” चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना...”, “ ये मालिक तेरे बंन्दे हम ....” , जीवन के दिन छोटे सही, हम भी बडे दिल वाले, कल की हमे फुर्सत कहा, सोचे जो हम मतवाले...” हि गाणी सादर करण्यात आली  या कार्यक्रमात काशिनाथ गुंडला, बालकृष्ण मदुरे, गिरीष गोसकी, डॉ. कांतीलाल डागा, व सौ. अनुराधा गुंगल या गायक कलाकारांनी सादर करून ज्येष्ठ  नागरिकांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन रमेश परशी, प्रास्ताविक तुकाराम चाबुस्कवार, व आभार इरन्ना कचेरी यांनी केले.
        कार्यक्रमाच्या शेवटी अमोघसिद्ध चाबुस्कवार यांनी मिमिक्री व हास्य जल्लोष सादर करून ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन केले. व त्यानंतर ब्रिजमोहन फोफलिया यांनी  कलाकरांचा सत्कार केला. व  व सर्वांचे आभार मानले आणि  कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment