Friday, December 27, 2019

ब्रिजधाममध्ये “ वऱ्हाड निघाल लग्नाला” धमाल
 विनोदी व्दिपात्री नाट्यप्रयोग  
 
 सोलापूर :  सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि २५ ऑगस्ट २०१९  रोजीसायंकाळी  ५ वाजता  लेखक दिग्दर्शक विक्रांत शिंदे यांचा “वऱ्हाड निघाल लग्नाला” हा धमाल विनोदी व्दिपात्री नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. पुणे फिल्म प्रस्तुत व वैभवदीप निर्मित या नाटकाचे सादरकर्ते होते. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एकपत्री नाट्य कलावंत विक्रांत शिंदे व सुप्रसीद्ध नाट्य व सिनेअभिनेत्री  बागेश्री सप्तर्षी राहणार पुणे यांनी अनेक प्रकारच्या भूमिका सादर करून ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन केले.
     स्वातंत्र लढ्यातील गोष्ट सांगणारे गुरुजी, गावातील हॉटेलमध्ये होणारा संवाद व असणारी वस्तुस्थिती, एसटी कंट्रोल, बस कंडक्टर, कवी ,मुका,  आचाऱ्याचा शोध, मंगलकार्यालयातील व्यवस्थापकाने सांगितलेले कार्यालयाचे व्यवस्थापन, हळदीचा कार्यक्रम, मंडपवाल्यांशी संवाद, बॅडवाल्याची धमाल, शाहिराने सादर केलेल्या मंगलाष्टक, नवरीचा व नवऱ्याचा उखाणा, आहेर न केल्याशिवाय न जाण्याची सूचना,लग्नात डान्स करणारी मुले, घोडेवाला जेवण वाढणारे आचारी,  अशा ४० विविध भूमिका व त्यांचा वेगवेगळा आवाज तसेच लग्नातील गोंधळ  अतिशय उत्तमरीतीने विक्रांत शिंदे व बागेश्री सप्तर्षी यांनी अतिशय सुरेखरित्या सादर केले. या संपूर्ण नाटकाला चंद्रकांत जगताप यांनी संगीत देवून प्रयोगामध्ये रंगत आणली. 
     नाटकांच्या माधमातून प्रत्यक्ष लग्नसोहळा स्टेजवरती उभा करण्यात कलावंत यशस्वी झाले. खूप चांगल्या पद्धतीने विविध पात्रे साकारत दोन तास रसिक प्रेक्षकांना  अक्षरशः खेळवून ठेवले. दोनच व्यक्तीने साकारलेले अनेक पात्र पाहताना रसिक प्रेक्षक भारावून गेले होते. विक्रांत शिंदे यांच्या लेखणीतून दिग्दर्शनातून तयार झालेला हा व्दिपात्री नाट्यप्रयोग महाराष्ट्रातील तमाम नाट्य रसिकांना एक हास्य मेजवानीच आहे असे गौरवोद्गार ब्रिजमोहन फोफलीया यांनी काढले. या नाट्यप्रयोगास  रसिक प्रेक्षक व ज्येष्ठ नगारीक यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. 
     कार्यक्रमाच्या शेवटी  ब्रिजमोहन फोफलिया यांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देवून   कलाकरांचा सत्कार केला. व  आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास  ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
ब्रिजधाममध्ये देवेंद्र औटी यांचे कवी संमेलन

 मानवी भावभावनांचे प्रतिनिधीत्वं करते ती हृद्यस्पर्शी कविता- 
 कवी देवेंद्र औटी   

 सोलापूर :  सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि.  ८ सप्टेंबर २०१९  रोजी सायंकाळी  ५ वाजता  कवी देवेंद्र औटी, विजय गायकवाड, सतीश गडकरी  यांनी सुंदर एका पेक्षा एक असा कविता सादर केल्या. कवी देवेंद्र औटी हे एक महान कवी आहेत. त्याच्या अनेक कविता आकाशवाणीवर प्रसारित झाल्या आहेत. त्यांना आतापर्यंत ५० पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. विजय गायकवाड हे दैनिक सुराज्यमध्ये पत्रकार म्हणून काम करतात. त्याचबरोबर कविता लिखाण करतात.त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सतीश गडकरी हे एक कवी तर आहेतच त्याचबरोबर ते भजनकार, गीतकार आहेत. या कवी संमेलनात त्यांनी कविता सादर करून ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन केले.
                कवी संमेलनात कवींनी पुढील कविता सादर केल्या. “ माणूस शोधतो मी” – सुखाच्या असोशिएशन पडदा पडदा म्हणत पळणारी जीवनाची मार्केटिंग करून जगणारी जिवंतपणाचा माणूस शोधतो मी, “कोशिश – नाही बांधून घेतली दावणीला नेतृत्व दातृत्व महत्वाचे आहे.बंधन कसलच अडकल नाही तळयात मळ्यात मी कोण स्वच्छंद माझ जगण. शुभ चिंतन कोशिश, “ सुपुत्र” – वृद्ध जोडप काठी  टेकीत चालल ते निराधार माझ्या बाल मित्राचे आई बाबाचे मित्र आमच कर्म खोट आहे.  – कवी देवेंद्र औटी,  “ उज्वल भारत घडवू या मानवताच्या हत्याराला धडा शिकवू  या. एकात्मताच्या वतीने नवीन भारत घडवू या” , “ माणूस जानवर झाला- जनावरांची जात माणूस झाला. जात घात केल्याशिवाय रहात नाही.”, “ पिकल पान म्हणून हिणवू नका त्यांनी सोसले वारा, त्यांनी दिली सावली म्हणून आम्ही मोठे झाले. – विजय गायकवाड, “ ३७० कलम बद्दल विचार मांडले. स्वतंत्रदिन झेंडा लावू अतिरेक्यांना धडा शिकवू, “ प्रार्थना – स्मरण आज करू त्यांचे ज्यांनी देशासाठी प्राण दिले, जय जवान जय किसान का पुसट झाला., “ समर्पित – पिकल्या केसांसमोर उभे रहा, मोठ्यांना मान द्यावा आई बद्दल आदर – सतीश गडकरी
          माणसांच्या जीवनातील सुख – दु:खाना  समाजासमोर मांडून योग्य मार्ग दाखविते तीच कविता काळजाला भिडते. यासाठी वास्तवासी नाळ तुटू देवू नये यासाठी कविता भूमिका मांडते असे मत ज्येष्ठ कवी देवेंद्र औटी यांनी व्यक्त केले.
          ज्येष्ठ नागरिक एम. एस. अंबुसे यांचे निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
         कार्यक्रमाच्या शेवटी  ब्रिजमोहन फोफलिया यांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देवून कलाकरांचा सत्कार केला. आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास  ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
निसर्गोपचार हे मानवाला मिळालेले एक वरदान – डॉ. कामत
सोलापूर: ज्येष्ठ समाज सेवक ब्रिजमोहन फोफलिया यांनी शनिवार दि. १४ सप्टेंबर १९ रोजी “ राधे राधे निवास” येथे निसर्गोपचार डॉ. नरसिंह कामत –मुंबई यांचे निसर्गोपचार व आरोग्य विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
        डॉ. कामत यांनी आपल्या व्याख्यानात निसर्गोपचार यांची माहिती आणि महत्व सांगितले. “निसर्गोपचार हे मानवाला मिळालेले एक वरदान “ आहे. निसर्गोपचार पध्दतीने उपचार केल्यास शरीरावर इतर कोणताही वाईट परिणाम होत नाही. 'आधुनिक जीवनशैलीचा परिणाम मानवी शरीरावर होतो आणि त्यामुळे अनेक रोग उदभवतात. या रोगांवर निसर्गोपचार करणे हा एकमेव व सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. निसर्गोपचार हि विनाऔषधी  उपचार पद्धती आहे.
       डॉ. कामत यांनी  “ ज्यांचे पोट साफ त्यांचे सर्व रोग माफ” हा आरोग्याचा मंत्र सांगितला. दैनंदिन आहारात फळे, पालेभाज्या, लसून, बाजरी, नाचणी तील, ज्वारी ,राजगिरा,  मोड आलेले कडधान्य, मध, हळकुंड , जिरे, मेथी, सेन्धा लोन, रानतुलस , हिंग, कडीपत्ता, काळी मिरी, काळे खजूर, काळे मनुके, गाजर, आवळा, लिंबू, आलीव यांचा जास्तीत  वापर करावा. “एरंड तेल” हे आहारासाठी सर्वोत्तम आहे.
       आज धावपळीच्या जीवनात मनुष्य फास्ट फूडचा वापर जास्त करीत आहे. त्यामुळे न कळत आपल्या शरीरात विष तयार होत आहे. त्यामुळे अनेक आजार उद्भवत आहेत. हे टाळण्यासाठी तळलेले, मसालेदार, तिखट, आंबलेले पदार्थ, थंड पदार्थ , मसालेदार अन्न, खारटपणाचे पदार्थ, आंबट खाद्य, जंक फूड, तेलकट पदार्थ, तळलेले अन्न,  डबाबंद पदार्थ/अन्न,  रेफ्रिजरेटेड फूड, आईस्क्रीम, प्रकिया केलेले अन्न , लोणचे, पापड, चटणी, जाम, जेली, जाम, सॉस, स्क्वॅश , सिरप, कोल्ड ड्रिंक्स, कृत्रिम रंग, फ्लेवर्स,  चायनिज फूड, थाई फूड, कॉन्टिनेंटल फूड, वडापाव, पावभाजी, तंदुरी फूड, मायक्रोवेव्ह फूड, पिझ्झा, हॉटडॉग्ज, बर्गर, नूडल्स, सँडविच, मांसाहारी अन्न, अंडी, मासे, कोंबडी, लाल मांस, चहा, कॉफी, तंबाखू, कोणत्याही स्वरूपात मद्य किंवा अल्कोहोल इत्यादींचा वापर टाळावा.
      त्यांनी काही उपचार पद्धती सांगितल्या त्यामध्ये  माठातीलच पाणी पिणे,  पत्ता कोबी चिरुन त्यामध्ये हळद व पाणी घालून ते उकळावे आणि त्यांची वाफ घेणे हे फुफ्फुसासाठी चांगले आहे, सकाळी उठल्यावर एक लिटर पाणी पिणे, बद्धकोष्ट असलेल्या रुग्णांनी  पपई खावी, खांदा दुखत असेल तर थंड पाण्याची पट्टी लावावी, मायग्रेन असलेल्यांनी केळी आणि साखर खावू नये, खोकला असेल तर जवस खावे. त्याचबरोबर  कटीस्नानचे  महत्व सांगितले. “ No ill, No pills, & No Hospital Bill” असा कानमंत्र हि त्यांनी दिला.
       श्री. ब्रिजमोहन फोफलिया यांनी आपल्या मनोगतात निसर्गोपचार पद्धतीचा वापर केल्याने होणार फायदे स्व:ताच्या अनुभवातून सांगितले. ते स्व:ता बारा वर्षापासून किडनी आजाराने त्रस्त आहेत. परंतु ते निसर्गोपचार पद्धतीचा वापर केल्यामुळे स्वास्थ उत्तम आहे. खानपान, व्यायाम, योगा  हे निसर्गोपचाराचे सूत्र आहे. आज प्रत्येक मानव निसर्गाच्या नियमांचा उल्लंघन करत आहे. म्हणून त्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहे.
        त्यानंतर डॉ. कामत यांनी उपस्थित महिला व पुरुषांनी विचारलेल्या प्रश्नांना तब्बल एक तास भर देवून त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. यानंतर ब्रिजमोहन फोफलिया यांनी उपस्थितांचे आभार मानले

ब्रिजधामला रिलायन्सच्या पदाधिकाऱ्यांची सदीच्छा भेट, आणि सदाबहार हिंदी व मराठी गाण्यांचा घेतला आनंद.



ब्रिजधामला रिलायन्सच्या पदाधिकाऱ्यांची सदीच्छा भेट
आणि सदाबहार हिंदी व मराठी गाण्यांचा घेतला आनंद.
सोलापूर : सोरेगाव येथील ब्रिजधाम आश्रमास रिलायन्सच्या पदाधिकाऱ्यांनी सदीच्छा भेट दिली. या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत श्री ब्रिजमोहन फोफालीया यांनी केले. त्याचबरोबर फोफलीया यांनी संपूर्ण आश्रमाची माहिती दिली. आश्रमातील बाल उद्यानापासून ते वृद्धाश्रमातील अनेक संदेश देणाऱ्या मूर्ती पाहून सर्वांचे मन प्रसन्न झाले. कलयुगातील मुलांनी आपल्या आई वडिलांना कशाप्रकारे वागणूक देतात. हे चित्र दाखविले. आश्रमाविषयी माहिती देताना श्री फोफालिया यांनी आश्रम उभे करताना काय काय अडचणी आल्या याविषयी माहिती दिली. रिलायन्स पदाधिकाऱ्यांनी सर्व आश्रमाची पाहणी केली. तेथील निसर्गरम्य वातावरणामुळे त्याचे मन प्रसन्न  झाले. रिलायन्स पदाधिकाऱ्यांमध्ये श्री. विनीत खेडेकर – स्टोर मॅनेजर, मंगेश महाले –असिस्टंट मॅनेजर, सचिन वारे – मॅनेजर, अमीर शेख – मॅनेजर, सुरेश थोरात- मॅनेजर हे उपस्थित होते. त्यांची श्री ब्रिजमोहन फोफलीया यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. व त्यांच्या कार्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देत पुष्पगुच्छ देवून  सत्कार केला. त्यानंतर त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ब्रिजधाम मध्ये आयोजित करण्यात आलेल्या सरगम म्युझिकल ग्रुप – मंद्रूप यांचा करा ओके ऑर्केस्ट्रा  हिंदी चित्रपटसृष्टीतील “ बाँलीवूड सदाबहार हिंदी गीताच्या कार्यक्रमाचा  आनंद घेतला. या कार्यक्रमात प्रकाश शिवमूर्ती लोभे  व त्यांच्या सह साथीदार यांनी जुने व नवीन गाणी सादर करून  सर्व ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
     कार्यक्रमाची सुरुवात नटराज प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रकाश लोभे  व त्यांच्या सह कलाकारांनी सदाबहार गीत सादर केले. ती गाणी पुढीलप्रमाणे  “ आरंभी वंदिन अयोध्येचा राजा भक्ताचिया काजा पावतसे “ ......” या गीताने करण्यात आली. “ कानडा दे अंबरीसी मना (कन्नड) म्ह्ळप्पा हेळवी ....”, “हमे और जिने की चाहत ना होती अगर तुम ना होते. अभिजित हेळवी ”, "नीले नीले अंबर पर चंद जब आये ..महेश शिवमूर्ती ”,“ अकेले हैं चले आओ जहाँ हो अकेले हैं चले आओ जहाँ हो कहाँ आवाज़ दें तुमको कहाँ हो अकेले हैं चले आओ जहाँ हो... ”, “  रात कली एक ख्याब में आयी और गलेका हार हुई ...राहुल हेळवी ”, “ जाने कहा गये ओ दिन ..” , “अरे दिवानो मुझे पहचानो कहा से आया मै हु डॉन ..” , “घुंगरू की तरहा बजता हि रहा हू मै ....” , “ जहॉ डाल डाल  पर सोने की चिडिया करती है बसेरा ....” “पुकारता चला हु मै गली गली ...”, “ कानडा राजा पंढरीचा ....” , आनंद परमानंद (कन्नड) राजू शितारे ...”,” एक अजनबी हसीना से मुलाकात हो गई..., - राहुल हेळवी, “चेहरा है या चांद खिला है – अभिजीत हेळ्वी, “ ये शाम मस्तानी मदहोश किये जाय- महेश लोभे,” याद या रही है तेरी याद आ रही है... – महेश लोभे   हि गाणी सादर करण्यात आली  या कार्यक्रमात प्रकाश लोभे, राहूल हेळवी, अभिजित हेळवी, महेश लोभे, म्हलप्पा हेळवी या गायक कलाकारांनी सादर करून ज्येष्ठ  नागरिकांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन सुभाष सुतार यांनी केले.
        कार्यक्रमाच्या शेवटी  ब्रिजमोहन फोफलिया यांनी  कलाकरांचा सत्कार केला. व  व सर्वांचे आभार मानले आणि  कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
ब्रिजधाममध्ये “सदाबहार गाण्यांचे” आयोजन
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि.  २२ सप्टेंबर २०१९  रोजी सायंकाळी  ५ वाजता  हिंदी चित्रपटसृष्टीतील “ बाँलीवूड सदाबहार हिंदी गीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गोदावरी कॉलेजचे डॉ. श्रीकांत देशमुख, दीपक पोतदार, महेश माने, वर्षा सोनवले, मंगल गायकवाड, चैताली जमादार व त्यांचे सहकारी विध्यार्थी विध्यार्थिनीनी जुने व नवीन गाणी सादर करून  सर्व ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
     कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पोतदार व चैताली जमादार यांनी गायलेल्या गणेश प्रार्थना “ प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया “ ......” या सदाबहार गीताने करण्यात आली. त्यानंतर  श्री. शेख  यांनी “जीवनाविषयी  सार – जीवन संघर्ष असत, जीवन सुंदर आहे. असे सांगितले. त्यानंतर डॉ. दीपक पोतदार व वर्षा सोनवले  यांनी “मै यहाँ तू वहाँ मै तुझे ढूँढता तुम  कहाँ | मै ढूँढता तुझे रात दिन ओ मेरे हमसफर ...”, डॉ. महेश माने  यांनी मेरे सपनों की राणी कब आयेगी तू  ....”, डॉ. देशमुख  यांनी “सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था आज भी है ...”  डॉ. पोतदार वर्षा सोनवले  यांनी  “तुने ये रंगीला कैसा जादू किया पिया पिया बोले मत वाला जिया ..” वैष्णवी गोरंटला कृष्ण जिनका नाम है गोकुळ जिनका धाम है ऐसे भगवान को बारबार प्रणाम है यशोदा जिसकी मैय्या है .....”  चैताली यांनी मोह मोह के धागे मेरे उंगलीयों के मिले ..” प्रभाकर यांनी  “बदन पे सितारे लपेटे. हुये ओ जाने तमन्ना किधर जा रही हो. जरा पास आओ ....”, डॉ.दीपक पोतदार व चैताली जमादार यांनी – ये शाम मस्तानी मदहोश किये जाये मुझे  डोर कोई खींचे ,तेरी और लिए जाए ये शाम मस्तानी मदहोश किये जाए मुझे डोर कोई खींचे तेरी और लिए जाए  यांनी “ हमे ओर जिने की चाहत ना होती अगर तुम ना होते.....”, धीरज  यांनी “ प्रार्थना आहे “ मर मर के जी लिये जिने दो, जिने दो...”, डॉ. श्रीकांत देशमुख “ जाने कहा गये वो दिन कहते जाने कहाँ  गए वो दिन, कहते थे तेरी राह में नज़रों को हम बिछाएंगे जाने कहाँ गए वो दिन, कहते थे तेरी राह में नज़रों को हम बिछाएंगे चाहे कहीं भी तुम रहो, चाहेंगे तुमको उम्र भर तुमको ना भूल पाएंगे. ..” अशी एकापेक्षा एक सुंदर गाणी सादर करून सर्वांचे  मनोरंजन केले.  रमजान शेख यांनी चारोळे सादर केले. “ तू नसता तर, चांद पे फुलले नसते , “ संस्कार आणि प्रेम , ती माझी होऊ शकत नाही. प्रेम म्हणजे प्रेम असते इत्यादी. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगल गायकवाड यांनी केले.
     कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी  कलाकरांचा सत्कार केला. व  व सर्वांचे आभार मानले आणि  कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

ब्रिजधाममध्ये “सदाबहार गाण्यांचे” आयोजन Date 22/9/2019

ब्रिजधाममध्ये “सदाबहार गाण्यांचे” आयोजन
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि.  २२ सप्टेंबर २०१९  रोजी सायंकाळी  ५ वाजता  हिंदी चित्रपटसृष्टीतील “ बाँलीवूड सदाबहार हिंदी गीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गोदावरी कॉलेजचे डॉ. श्रीकांत देशमुख, दीपक पोतदार, महेश माने, वर्षा सोनवले, मंगल गायकवाड, चैताली जमादार व त्यांचे सहकारी विध्यार्थी विध्यार्थिनीनी जुने व नवीन गाणी सादर करून  सर्व ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
     कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पोतदार व चैताली जमादार यांनी गायलेल्या गणेश प्रार्थना “ प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना, गणराया “ ......” या सदाबहार गीताने करण्यात आली. त्यानंतर  श्री. शेख  यांनी “जीवनाविषयी  सार – जीवन संघर्ष असत, जीवन सुंदर आहे. असे सांगितले. त्यानंतर डॉ. दीपक पोतदार व वर्षा सोनवले  यांनी “मै यहाँ तू वहाँ मै तुझे ढूँढता तुम  कहाँ | मै ढूँढता तुझे रात दिन ओ मेरे हमसफर ...”, डॉ. महेश माने  यांनी मेरे सपनों की राणी कब आयेगी तू  ....”, डॉ. देशमुख  यांनी “सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था आज भी है ...”  डॉ. पोतदार वर्षा सोनवले  यांनी  “तुने ये रंगीला कैसा जादू किया पिया पिया बोले मत वाला जिया ..” वैष्णवी गोरंटला कृष्ण जिनका नाम है गोकुळ जिनका धाम है ऐसे भगवान को बारबार प्रणाम है यशोदा जिसकी मैय्या है .....”  चैताली यांनी मोह मोह के धागे मेरे उंगलीयों के मिले ..” प्रभाकर यांनी  “बदन पे सितारे लपेटे. हुये ओ जाने तमन्ना किधर जा रही हो. जरा पास आओ ....”, डॉ.दीपक पोतदार व चैताली जमादार यांनी – ये शाम मस्तानी मदहोश किये जाये मुझे  डोर कोई खींचे ,तेरी और लिए जाए ये शाम मस्तानी मदहोश किये जाए मुझे डोर कोई खींचे तेरी और लिए जाए  यांनी “ हमे ओर जिने की चाहत ना होती अगर तुम ना होते.....”, धीरज  यांनी “ प्रार्थना आहे “ मर मर के जी लिये जिने दो, जिने दो...”, डॉ. श्रीकांत देशमुख “ जाने कहा गये वो दिन कहते जाने कहाँ  गए वो दिन, कहते थे तेरी राह में नज़रों को हम बिछाएंगे जाने कहाँ गए वो दिन, कहते थे तेरी राह में नज़रों को हम बिछाएंगे चाहे कहीं भी तुम रहो, चाहेंगे तुमको उम्र भर तुमको ना भूल पाएंगे. ..” अशी एकापेक्षा एक सुंदर गाणी सादर करून सर्वांचे  मनोरंजन केले.  रमजान शेख यांनी चारोळे सादर केले. “ तू नसता तर, चांद पे फुलले नसते , “ संस्कार आणि प्रेम , ती माझी होऊ शकत नाही. प्रेम म्हणजे प्रेम असते इत्यादी. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगल गायकवाड यांनी केले.
     कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी  कलाकरांचा सत्कार केला. व  व सर्वांचे आभार मानले आणि  कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

ब्रिजधाममध्ये “ ज्येष्ठ नागरिक दिन” साजरा

ब्रिजधाममध्ये “ ज्येष्ठ नागरिक दिन” साजरा
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक  दिनाचे औचित्य साधत “ज्येष्ठ नागरिक दिन” साजरी करण्यात आला.  या प्रसंगी श्री. व्ही. एम. जोजन सर यांनी सध्याच्या यंत्र युगात ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा आणि कथा वर्णन केल्या. ते पुढे म्हणाले, समाजातील ज्येष्ठांचे दु:ख  कमी होण्यासाठी श्री. ब्रिजमोहन फोफलिया यांनी सन २००२ साली “ ब्रिजधाम प्रतिष्ठानची स्थापना केली. ज्येष्ठ नगारिकांसाठी आनंद मेळाव्याचे आयोजन केले. आणि दर रविवारी ते ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम, गायनाचे कार्यक्रम, भारुड, भरतनाट्यम, दांडिया, कथ्थक, शास्त्रीय संगीत, अंताक्षरी, हास्यधारा, हस्यकल्लोळ, हास्यनाद, हसवाहसवी, बिनधास्त लाईफ स्टाईल, मिमिक्री, माऊथ आँर्गन, आधार कार्ड शिबीर, सुगम संगीत, योगा प्राणायम, आरोग्य विषयक शिबीर, पारिवारिक व्याख्यान, जादूचे प्रयोग, रामलीला  अशा विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत आहेत. दर रविवारी मनोरंजनाच्या कार्यक्रमासहित ज्येष्ठांना भोजनाची हि मेजवानी दिली जाते. ज्येष्ठांसाठी आतापर्यंत ९०० पेक्षाही जास्त कार्यक्रमाचे आयोजन.    
      त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरीकांसाठी  ज्येष्ठांच्या गाण्यांच्या स्पर्धा, विविध पोषाख स्पर्धा, दांडिया, व अनेक खेळांच्या स्पर्धा त्यासाठी कब्बडी, संगीत खुर्ची, पोत्याची शर्यत, लिंबू चमचा, संगीत बॉल, रस्सीखेच, याचा समावेश असतो. भारतीय परंपरेनुसार सर्व सण साजरी केले जातात. हा कार्यक्रम कोणाकडून ही रक्कम न घेता ब्रिजमोहन फोफलीया हे स्व खर्चाने करीत आहेत. ब्रिजधाम आश्रमातील ज्येष्ठ नागरिक व  शहरातील विविध भागातून भरपूर ज्येष्ठ नागरिक बंधू  भगिनी येतात व कार्यक्रमाचा आनंद घेतात. ज्या महिन्यात ज्यांचा वाढदिवस असतो त्या महिन्याअखेरीस त्या ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा केला जातो.
      कार्यक्रमात बोलताना जोजन सर यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी ब्रिजमोहन फोफलीया हे दर रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. हे कार्यक्रम आयोजन करताना त्यांना अनेक अडचणी येत असतात. नवीन नवीन कार्यक्रम ठरविणे, त्याचे आयोजन योग्य प्रकार करणे, कार्यक्रमानंतर जेष्ठ नागरिकांची  भोजनाची व्यवस्था करणे, लाईट , साऊंडची व्यवस्था करणे, कलाकारांची व्यवस्था करणे, बैठक व्यवस्था करणे, इत्यादी तरी फोफलीया सर हे  सर्व कामे आपल्या व्यवस्थापन कौशल्याने करून घेत असतात. या मागची भावना फक्त एकच असते की, ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य दिसू दे, त्यांना आनंद, समाधान  मिळू दे.
    ब्रिजमोहन फोफलीया यांच्या कार्याचा आढावा देताना ते म्हणाले की फोफलीया यांनी शाळेतील लहान मुळापासून जेष्ठ नागरिकासाठी त्यांनी अखंड कार्य केले आहे. ब्रिजमोहन नेत्रालयातून ९ वर्षात जवळ जवळ १६००० गरजुंचे मोफत आँप्रेशन केले आहेत. ब्रिजधाम आश्रमची स्थापना, सामुहिक विवाह सोहळा, किडनी डायलेसीस, आरोग्य शिबीर, आनंद मेळावा, दंत शिबीर, बिपी. डायबेटीस मोफत तपासणी शिबीर ई.
    या कार्यक्रमात  ज्येष्ठ नागरिक महिलां मीनाक्षी कर्णेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, आम्हांला येथे आश्रमात येवून खूप छान वाटते. नवीन नवीन कार्यक्रम आम्हांला पहायला मिळतात. घरातील कामे आम्ही लवकर लवकर करून आम्ही दर रविवारी येतो. आम्हांला माहेरी आल्याचा आनंद मिळतो. सौ. सुनंदा चनशेट्टी व श्री भानुदास रणशृंगारे यांनी ब्रिजमोहन फोफलीया यांचा सेवाभावी कार्याचा गौरव केला.
    कार्यक्रमाच्या शेवटी श्री. ब्रिजमोहन फोफलीया यांनी आश्रम स्थापनेपासूनची सर्व माहिती दिली. व ते म्हणाले, की दर रविवारच्या कार्यक्रमासाठी शहरातील निरनिराळ्या भागातून ज्येष्ठ नागरिक येत असतात. कार्यक्रमाचा आनंद घेतात.  यातच आपल्याला आनंद मिळतो. त्यानंतर त्यांनी सर्व जेष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या