Wednesday, December 25, 2019

ब्रिजधाम आश्रम येथे अक्कमादेवी लघुचित्रपटाचे चित्रीकरण 7/2/2018


 ब्रिजधाम आश्रम येथे अक्कमादेवी लघुचित्रपटाचे चित्रीकरण
            
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य ठिकाणी अक्क्मादेवी लघुचित्रपटाचे चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. या लघुचित्रपटाचे चित्रीकरण सकाळी ते सायंकाळी पर्यत जवळजवळ दिवस चालले. या चित्रीकरणासाठी जवळजवळ २०० पेक्षा जास्त कलाकार आले होते. या लघुपटाचे वैशिष्ट म्हणजे यात सर्व किरदार लेडीज कलाकारांनी सादर केले आहेत.
     लघुचित्रपटाची सुरुवात कँमेराची पूजा ब्रिजमोहन फोफलिया यांच्या हस्ते करून मुहूर्त करण्यात आला. या मुहूर्त प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. पोलीस आयुक्त महादेव तांबडे, ग्रामीण पोलीस अधीक्षक  वीरेश प्रभू हे उपस्थित होते.
बाराव्या शतकातील महान संत, कवयित्री आपल्या वचन साहित्यातून विश्वाला शांती संदेश व गुरु महिमा भक्तीतून जीवन उद्धार करून अक्क्मादेवी हे नाव जगात केलेल्या महादेवीचे जीवन कार्यातून अमर ज्योती अक्कामादेवी सिनेमा लोकांना व महिलांना प्रेरणादायी ठरणार आहे. या लघुचित्रपटाव्दारे अक्क्मादेवीचे जीवनचरित्र सर्वासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा बसवेश्वर स्थापित अनुभव मंडपात ७७ शरणी व ७०० शरण होते. त्यामध्ये अक्क्मादेवी यांचे कार्य व त्यांनी लिहिलेले वचन साहित्य जगाला प्रेरणा देणारे आहे. गुरु महिमा, गुरुभक्ती व त्यागमय जीवन जगून महादेवी यांनी सर्वांची अक्क (बहीण) म्हणून कीर्ती मिळवली होती.त्यामुळे नवीन पिढीला त्यांच्या जीवनचरित्राची ओळख होण्यासाठी अमर ज्योती अक्क्मादेवीहा लघुचित्रपट बनविण्यात येत असल्याचे चित्रपट दिग्दर्शक शंकर विजापूर यांनी दिली.
अमर ज्योती अक्क्मादेवी हा लघुचित्रपट कन्नड व हिंदीमधून तयार केला जाणार आहे. यामध्ये अक्क्मादेवीच्या प्रमुख भूमिकेत राजश्री थळंगे, अल्लमप्रभूच्या भूमिकेत मीनाक्षी बागलकोटी तर अक्क्महादेविच्या बाल भूमिकेत ख़ुशी गुणकी या असणार आहेत. लेखक, छायाचित्रकर, छायाचित्रकरण हे सर्व बेंगलोर चे आहेत.
अमर ज्योती अक्क्मादेवी लघुचित्रपटाचे चित्रीकरण पहाण्यासाठी सोलापूर वाशियानी ब्रिजधाम आश्रमात गर्दी केली होती. व चित्रीकरणाचा आनंद घेतला.

ब्रिजधाम आश्रम येथे नववर्षाचे स्वागत मुस्तफा मुल्ला यांच्या भजनाने 2/1/2018


ब्रिजधाम आश्रम येथे नववर्षाचे स्वागत मुस्तफा मुल्ला यांच्या भजनाने
                
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी नववर्षाचे औचित्य साधून  रविवार दि३१ डिसेंबर १७ रोजी सायंकाळी  वाजता  मोरेश्वर भजनी मंडळ माचनूर यांच्या भक्तिगीते, भावगीते, गवळण, कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले  होते.  या कार्यक्रमाचे प्रमुख मुस्तान मुल्ला व त्यांच्या सह कलाकारांनी कार्यक्रम सादर केला. व उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस गणेश वंदना – “ॐकार स्वरूपा सद्गुरू समर्था अनाथाच्या नाथा तुज नमोया गीताने करण्यात आली. त्यानंतर घेई घेई घेई नाम वाचे, नाव तुझे घेता विठ्ठला ..हा तुकाराम महाराजांचा  अभंग सादर करण्यात आले. मन लगो रे लागीदत्त दिगंबराचा अभंग, “सिद्धराम चिन्मया करुणा मूर्ती ..” , अहो अहो ओ सासूबाई गवळण , “ चढता सुरज धीरे धीरे” – कव्वाली, “ हे ची दान दे ग देवा भैरवी , इत्यादी गाणी सादर करून सर्व ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्घ केले. त्यामुळे सर्व वातावरण भक्तिमय झाले होते.
  मस्तान मौल्ल्ला व शाम रिधुर यांनी जी भक्तिगीते, भावगीते, गवळण, कव्वालीसादर केली. त्याच्या पहाडी आवाजाची, पंडित भीमसेन जोशी, बालगंधर्व, प्रल्हाद शिंदे त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या आवाजाची आठवण करून दिली. मस्तान मुल्ला यांना शाम, नंदकुमार बाबर ( मृदंगाचार्य) , फैसर शेख, परवेझ मुलानी, शकील मुलानी, प्रकाश जाधव  या कलाकारांनी साथ दिली.  
  
या कार्यक्रमास सर्व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतेकार्यक्रमाच्या शेवटी  जुगलकिशोर तिवाडी यांनी सर्व कलाकारांचे कौतुक करून यांचा सत्कार केलाव भारतीय संस्कृतीमध्ये कृष्ण भक्त मुस्लीम समाजाचे भरपूर होते. त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा. सर्वांचे आभार मानले आणि  का
र्यक्रमाची सांगता झाली


ब्रिजधाम आश्रमास शंकरलीला भजनी मंडळाची सदिच्छा भेट 1/3/2018


ब्रिजधाम आश्रमास शंकरलीला भजनी मंडळाची सदिच्छा भेट

सोलापुर : सोरेगाव येथील ब्रीजधाम आश्रमास शंकर लीला भजनीमंडळांनी सदिच्छा भेट दिली. या मंडळातील सर्व महिलांनी ब्रिजधाम आश्रमाची पाहणी केली. ब्रिजमोहन फोफलिया यांनी ब्रिजधाम आश्रमाची सविस्तर माहिती मंडळातील सदस्यांना दिली. आश्रमातील निसर्गरम्य वातावरण पाहून महिलांनी खूप आनंद व्यक्त केला.
    “ शंकर लीला भजनीमंडळांतील महिलांनी अनेक भक्तिमय भजन, कींर्तन सादर केले. त्यानंतर सौ. सिंधूताई कडादी यांनी मंडळातील महिलाच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. सिद्धेश्वर महाराजांचा जयजयकार केला. या महिला भक्तिमय जीवन जगतात. सासुपासून सुनेपर्यत हा भक्तिमय वारसा जपत आहेत.  सिंधूताईंनी विभूतीचे महत्व व महात्म सांगितले.त्यानंतर सिंधूताईनी सामुहिक विवाहाचे प्रणेते ब्रिजमोहन फोफलिया यांच्या कार्याची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या ब्रिजम्हणजे अनेक लोकांना जोडणारा महान व्यक्ती असे कौतुकास्पद उद्गार काढले. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची आजच्या तरून पिढीने आदर्श घ्यावा.
    त्यानंतर सौ. लीलावती मडकी यांनी ब्रिजमोहन फोफलीया यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की फोफलिया यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक कार्य केले. आणि पुढे ही अशीच सामाजिक कार्य त्यांनी करावीत. अशी सिध्दरामेश्वराला प्रार्थना केली.
    या कार्यक्रमास मल्लिनाथ थलंगे, काशिनाथ भातगुणकी, सौ सिंधूताई काडादी, सौ. लीलावती मडकी, राजश्री थलंगे, इंदुमती हिरेमठ, मीनाक्षी बागलकोटी, संगीता भातगुणकी, विकास हेरलगी , शंकर विजापुरे , आदित्य अरुणकुमार, श्रीधर, सुहास हे उपस्थित होते.
    ब्रिजधामच्या वतीने  सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला.