Saturday, December 28, 2019

ब्रिजधाममध्ये ए.जी.पाटील महाविद्यालयच्या विध्यार्थीनींचा विविधरंगी जल्लोष

ब्रिजधाममध्ये  ए.जी.पाटील  महाविद्यालयच्या विध्यार्थीनींचा विविधरंगी जल्लोष
सोलापूर: सोरेगाव येथील ब्रिजधाममध्ये दि.३१ मार्च २०१९ रोजी रविवार सायंकाळी ५ वाजता ए.जी.पाटील महाविद्यालयच्या (इंजिनीअरिंग कॉलेज) विध्यार्थीनींचा विविधगुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थीनींचा गायनाचा व नृत्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात २० विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमात फँशन शो, हिंदी व मराठी गाणी, डान्स, कविता, लावणी, भाषण या विविधरंगी कलांचा  आविष्कार सादर केला. यामध्ये गीता वडणे, पूजा सूर्यवंशी, पूजा लेंगरे, ऐश्वर्या कलमनी, सारिका झेंडे पाटील, निकिता कुंभार, सुप्रिया शिवशरण, निकिता म्हमाणे, लक्ष्मी हिप्परगी , कोमल बिराजदार, वर्षा तुलगावकर, लक्ष्मी सौदागर, श्रद्धा वाघमारे, प्रवीणा कसबे, ऋतुजा घुमे, महेर शेख, सरिता जंगमशेट्टी या कलाकारांनी भाग घेतला होता.
        कार्यक्रमाची सुरुवात गणेश स्तवनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थीनींनी फँशन शो केला. यावेळी विद्यार्थीनींनी वेगवेगळ्या डिझाईनचे पेहराव केले होते. व एक एक जण समोर येवून आपल्या पेहरावचे सादरीकरण करत होते. त्यानंतर काही हिंदी व मराठी गीत व  नृत्य  सादर करण्यात आले. “ स्त्री जन्मा ही तुझी कहाणी. – निकिता कुंभार , वडिलांनाचे महत्व – कविता,” आम आदमी कि जिंदगी – कविता , स्वतः च्या मनामध्ये शांती व परमेश्वराचे अस्थित्व कसा प्रकारे आहे याविषयी अमृता चव्हाण आणि महिलांची सद्यस्थिती यावर ऐश्वर्या कालमणी हिने भाषण केले. “आईचे प्रेम “ – कविता, त्यानंतर “ खेळताना ग बाई रंग होळीचा या लावणी गाण्याने ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन केले. उपस्थित  वरिष्ठ नागरिकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. “ घ्यावा माझा सलामीचा मुजरा – लावणी, “ मुंगळा मुंगळा – ग्रुप डान्स
          कार्यक्रमाच्या शेवटी सैराट या गाण्यावर विद्यार्थीनींनी जल्लोष डान्स सादर केला. या गाण्यावर ज्येष्ठ नागरिकांनी ताल धरुन चांगला प्रतिसाद दिला. शेवटी  ब्रिजमोहन फोफलिया यांनी सर्व कलाकारांचा सत्कार व कौतुक  केले. . सर्वांचे आभार मानले आणि  कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
 

ब्रिजधामला यशोधरा नर्सिग इन्स्टिट्यूटच्या परिचारीकांची शैक्षणिक भेट

ब्रिजधामला  यशोधरा नर्सिग इन्स्टिट्यूटच्या  
परिचारीकांची शैक्षणिक भेट
(आश्रमातील आजी – आजोबांचे जाणून घेतले जीवन परिचारिकांनी )
सोलापूर: सोरेगाव येथील ब्रिजधाम आश्रमास यशोधरा नर्सिंग इन्स्टिट्यूट सोलापूर परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय येथील जी.एन.एम तृतीय वर्षात शिकणाऱ्या विध्यार्थीनींनी शैक्षणिक भेट दिली. भारतीय परिचर्या परिषद नवी दिल्ली यांचे अभ्यासक्रमानुसार “कम्युनिटी हेल्थ नर्सिंग” या विषयाला अनुसरून परिचारिकांच्या शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
      परिचारिका प्रशिक्षण इन्स्टिट्यूट मधील या सर्व विध्यार्थीनींनी शैक्षणिक भेट देताना आश्रमातील वातावरण अचूक टिपले. यावेळी श्री ब्रिजमोहन फोफालीया यांनी संपूर्ण आश्रमाची माहिती दिली. व त्याच्या भावी जीवनाविषयी मार्गदर्शन केले. त्यावेळी ते म्हणाले की, “ आई वडील” हेच आपले श्रद्धास्थान तेच आपले दैवत, तेव्हा आई वडिलांन विषयी त्यांची महती सांगून त्यांनी स्वतः थोर विचारवंत, महापुरुष, संत महात्मे त्यांच्या काही पुस्तकामधून त्यांच्या वाचनात आलेली काही सुविचार, चांगले लेखन संग्रहित केले होते, त्या विचारांची चर्चा त्यांनी कथन केले.  मुलींनी आई वडील, आजी आजोबा, व मोठ्यांचा आदर केला पाहिजे. मुली या दोन कुटुंबाना जोडणारा दुवा आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांबरोबर आदरपूर्वक वागले पाहिजे. कुटुंब तोडण्यापेक्षा कुटुंब जोडले पाहिजे. घर कामात मदत केली पाहिजे.तसेच सेवा आणि वाणी यांचे महत्व सांगितले. व सेवेची सुरुवात आपण आपल्या परिवारापासून व आई वडिलांपासून पासून करावे  अशा प्रकारे भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले.
       ब्रिजधाम आश्रमास भेट दिल्यानंतर सर्व विध्यार्थीनीं आनंद व्यक्त केला. काही विध्यार्थीनीं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आश्रमातील वातावरण भारावलेले होते. आश्रम अतिशय स्वच्छ व नीटनेटके आहे. व फोफालिया सरांचे अनमोल मार्गदर्शन आम्हांला भावी आयुष्यासाठी खूप उपयोगी असे आहे. त्यांनी सांगितलेली तत्वांचे आम्ही काटेकोरपणे पालन करू. व आपल्या आई वडिलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करू असे आश्वासन हि या विध्यार्थीनीं दिले.
      सर्व विध्यार्थीनीं आश्रमातील वृध्द आजी आजोबांची  आपुलकीने त्याची विचारपूस केली. त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या. अशा आनंदी वातावरणात विध्यार्थीनीं निरोप घेतला.

ब्रिजधाममध्ये रामनवमीनिमित्त रात्रभर जागरण व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

ब्रिजधाममध्ये रामनवमीनिमित्त रात्रभर जागरण
व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

सोलापूर : निम्बार्क ब्रिजधाम आश्रम येथे दि. १३ व १४ एप्रिल  २०१९ रोजी रामनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “जय श्रीराम, जय श्रीराम....” गजरात भक्तीभावाने दरवर्षीप्रमाणे श्रीरामाची पूजा अर्चना करण्यात आले. दिवसभर अनेक विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते.
         सायंकाळी दीप उत्सव साजरा करून भक्ती  जागरण करण्यात आले. यामध्ये रामायणचे पाठ, रामरक्षा स्तोत्र, राममंत्र, हनुमान चालीसा, बजरंग बाण, सुंदर कांड करण्यात आले. खास रामनवमीसाठी राजस्थानहून अंजना ग्रुप यांना भजन व कीर्तन करण्यासाठी कलाकार बोलविण्यात आले होते. यावेळी  चौधरी व पटेल समाजाचे ६०० ते ७०० महिला व पुरुष यांनी रात्रभर जागरण केले. रात्रभर भाविक भक्तीभावाने तल्लीन होऊन नाचत होते.
    दुसऱ्या दिवसी सकाळची महाआरती करण्यात आली. दांडिया, गरबा, राजस्थानी घुमरचा कार्यक्रम झाला. त्यावेळी राजस्थानी अनेक स्त्री व पुरूष भक्तिभावाने तल्लीन होवून नृत्य करीत कार्यक्रमाची शोभा वाढविली. दर्शन घेण्यासाठी परिसरातील हजारो भक्त येत होते. यावेळी अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भाविकांना दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला
    राजस्थानचे दिपारामजी चौधरी, दिनेशजी चौधरी, नरतीरामजी चौधरी, आखारामजी चौधरी, कमलेशजी चौधरी,- दर्शन झलकी , नारायणजी, रामनरेशजी, अवघडरामजी देवासी, जयरुपारामजी देवासी, राजेशजी पटेल, हरिषभाईजी चौधरी, सुरेशजी चौधरी, पारसजी चौधरी, चनारामजी चौधरी, सीतारामजी परीक, संतोषजी परीक, भगवानरामजी चौधरी, बेलारामजी चौधरी, राजंदजी तुलसे, दिलीपजी देवकुळे, भावनाजी गोमटे पाटील, तनुजा पुरवत, भगारामजी अंजना, हरिषजी पटेल, बाबूलालजो चौधरी, गणेशरामजी, धनराजजी, गंगारामजी, विकासजी, जगदीशजी, प्रवीणजी, जसारामजी, जितेंद्रजी  यांनी भजन संध्या कार्यक्रम केला. भाविक लोक भजन ऐकण्यात तल्लीन झाले होते. भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
 
ब्रिजधाममध्ये अनुपम पुरवत यांचा सदाबहार गीतांचा कार्यक्रम
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि.  ९ जून २०१९  रोजी सायंकाळी  ५ वाजता  गायक अनुपम पुरवत याचा सदाबहार हिंदी व मराठी गीताच्या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुरवत यांनी एकापेक्षा एक सरस अशी गाणी सादर करून ज्येष्ठ नागरिकांकडून  दाद मिळविली.
     कार्यक्रमाच्या सुरुवातीला “देहाची तिजोरी भक्तीचा ठेवा, उघड दार देवा आता या भक्ती गीतांनी करण्यात आली. त्यानंतर मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यामध्ये गंध मोहरते...”, “ दाम करी काम येड्या दाम करी काम...”, शोधिशी मानवा राउळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी...”, गालावर खळी डोळ्यात धुंदी ओठावर खुले लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू...”, “खाइके पान बनारस वाला खुल जाए बंद अकल का ताला फिर तो ऐसा करे धमाल सीधी कर दे सबकी चाल ओ छोरा गंगा किनारे वाला खाइके पान बनारस...”, ये शाम मस्तानी मदहोश किये जाये...”, “ मेरे मितवा, मेरे मित रे आज तुझ को पुकारे मेरे गीत रे ओ मेरे मितवा...”, “ कभी कभी मेरे दिल मै ख्याल आता है...”, “ रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन ...”, “ मै जिंदगी का साथ निभाता चला गया...”, “ आने से उसके आये बहार, जाने के उसके जाये बहार, बडी मस्तानी है मेरी दिलरुबा...”, “ किसी की मुस्कराहटो पे हो फिदा...”, अशी सदाबहार गाणी सादर केली. “झिंग झिंग झिंगाट या गाण्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. खमितकर यांनी अत्यंत सुंदररित्या केले.
          कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी अनुपम पुरवत यांचा सत्कार केला.सर्वांचे आभार मानले आणि  कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

ब्रिजधाम आश्रममध्ये उपप्रवर्तक पारसमुनीजी महाराज यांचे संघासहित आगमन व विहार


ब्रिजधाम आश्रममध्ये उपप्रवर्तक पारसमुनीजी महाराज  
     यांचे संघासहित आगमन व विहार

सोलापूर: ब्रिजधाम आश्रम सोरेगाव येथे दि. २५ एप्रिल १९ रोजी उपप्रवर्तक पारसमुनीजी महाराज यांचे संघासहित आगमन व विहार झाले. महाराजांच्या आगमनामुळे आश्रामातील वातावरण भक्तिमय झाले होते.
     उपप्रवर्तक पारसमुनीजी महाराज व त्यांचा संघ हे बेंगलोरहून पुण्याला जाणार आहेत. त्यावेळी त्यांचे  ब्रिजधाम आश्रम येथे आगमन झाले. महाराजांनी आश्रमाची पाहणी केली. आश्रमातील प्रसन्न वातावरण बघून समाधान व्यक्त केले.
      त्यांनी ब्रिजमोहन फोफलिया यांच्या कार्याबद्दल स्तुती केली आणि  म्हणाले “ तुम्ही अथक प्रयास करून अलौकिक असा वृद्धाश्रमाची निर्मिती केली. येथे येवून आम्हांला हार्दिक आनंदाची अनुभूती झाली. आज ही तुमच्या सारखी मुले आहेत की जे निराधार आई वडीलांची मुलगा बनून  सेवा करत आहेत. त्यामुळे आमच्या ह्दयातून हे बोल येतात की धन्य आहेत तुमचे आई व वडील ज्यांनी तुमच्या सारख्या सेवाभावी मुलाला जन्म दिला. आणि हे सेवाभाव तुम्हांला पुढील जन्मात पण सुख सुविधा संपन्न बनवतील असा आशीर्वाद हि दिला.  
     उपप्रवर्तक पारसमुनीजी महाराज यांच्या संघात उपाध्याय रविंदमुनीजी महाराज सा, रमणिक महाराज ऋसंब मुनी, प्रदीप मुनी, ऋषी मुनी, पुष्पपेंद्र मुनी, वैभव मुनी, अरहम मुनी होते.
      उपप्रवर्तक पारसमुनीजी महाराज  यांच्या दर्शनासाठी जैन समाज व भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ब्रिजधाममध्ये बाल चमुंचा “नृत्य आविष्कार” व फॅशन शो


ब्रिजधाममध्ये बाल चमुंचा “नृत्य आविष्कार” व फॅशन शो
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि.  १९ मे २०१९  रोजी सायंकाळी  ५ वाजता  युसुफ पिरजादे  तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युसुफ पिरजादे व त्यांच्या बाल कलाकारांनी आपला कला आविष्कार सादर केला. सोलापुरातील विविध शाळेतील वय वर्ष ७ ते १५ वयोगटातील लहान मुलांनी व मुलींनी फॅशन शो चे सादरीकरण केले.  सिद्धेश्वर प्रशाला, के.एल .ई , हरीभाई देवकरण, आय.एम.एस , मुक्तांगणा, संभाजी शिंदे विद्या मंदिर, मॉडेल स्कूल इत्यादी शाळेतील मुलांनी सहभाग घेतला होता.
     त्यानंतर गायक युसुफ पिरजादे यांनी काही हिंदी सिनेमामधील विविध गायकांची गाणी म्हणून ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले. “ पल पल दिल के पास तुम रहती हो”, शिर्डी वाले साई बाबा आया है तेरे दर पर सवाली इत्यादी.
     श्रेया बनशेट्टी हिने “ दिवानी हो गयी या गाण्यावर नृत्य केले. सर्व जेष्ठ नागरिकांनी टाळ्या वाजवून श्रेयाचे कौतुक केले. नृत्य सादर करू बाल चमुनी ज्येष्ठ नागरिकांची मने जिंकली.  त्यानंतर दादा कोंडके, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, राजकुमार, निळू फुले, यांचे आवाज काढून कार्यक्रमाची शोभा वाढविली. अनेक हिंदी व मराठी गाणी सादर करून ज्येष्ठ नागरिकांना मंत्रमुग्ध केले. ज्येष्ठ नागरिकांनी हि बाल कलाकारांचे कौतुक केले.
     कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी सर्व कलाकारांचा सत्कार केला. सर्वांचे आभार मानले आणि  कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

ब्रिजधाममध्ये वैष्णवी स्वामी हिचे भरतनाट्यम

ब्रिजधाममध्ये वैष्णवी स्वामी हिचे भरतनाट्यम
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि.  २ जून २०१९  रोजी सायंकाळी  ५ वाजता  नर्तिका वैष्णवी बसवराज स्वामी हिच्या गुजराती गरबा आणि राजस्थानी घुमर नृत्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वैष्णवी हिने भरतनाट्यम ही सादर करून ज्येष्ठ नागरिकांकडून  दाद मिळविली.
     कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैष्णवी हिने राजस्थानी घुमर नृत्य सादर केले. त्यानंतर तिने  “ओ राधा तेरा झुमका, ओ राधा तेरा छल्ला....”, आयो रे आयो म्हारो ढोलना ....” या सुपर हिट गाण्यावर नृत्य सादर केले. 
त्यानंतर गायक अनुपम पुरवत  ह्यानी काही सदाबहार हिंदी गीत सादर केले. “लाखो यहा दिलवाले और प्यार नहि आखो मै किसी की वफा का इकरार नहि मिलता...”, “आया है मुझे फिर याद वो ज़ालिम गुज़रा ज़माना बचपन का हाय रे अकेले छोड़ के जाना और ना आना बचपन का आया है मुझे फिर याद वो ज़ालिम....”, तुम हो मेरी दिल की धडकन तुम बिन लागे न मन तुम को हि धुंडा करते है...”,  “ नीले नीले अंबर पर चांद जब आये..” अ आ ई उ उ ऊ मेरा दिल न तोड़ो रूठ के न जाओ मेरी जां पास मेरे आओ मेरी जां मैं अंगूठा छाप पढ़ना और लिखना जानूं न अ आ ई उ उ ऊ इसका दिल न तोड़ो...”, “ तेरे जैसा मुखडा तो पहले कभी देखा नही...”, “ छुपाना भी नहि आता, जताना भी नही आता मुझे तुमसे मोहब्बत है...” अशी सदाबहार गाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी सादर करून त्यांची मने जिंकली.  
          कार्यक्रमाच्या शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी वैष्णवी स्वामी आणि अनुपम पुरवत यांचा सत्कार केला.सर्वांचे आभार मानले आणि  कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.