ब्रिजधाम आश्रम येथे आधार स्नेह मेळावा संपन्न
सोलापूर- ब्रिजधाम आश्रम सोरेगाव येथे, रील लाईफ युथ फौंडेशन व लायन्स क्लब सोलापूर सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने “आधार स्नेह मेळावा” संपन्न झाला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते नटराज प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर श्री.ब्रिजमोहन फोफलीया, प्रमुख अथिती डॉ.कांतीलाल डागा, डॉ.माधुरी अवसेकर, डॉ.श्रीकांत शृंगारपुरे, लायन कांचन बाकळे, लायन प्रतीक्षा गुळगी, व्यंकटेश पडाल, यशवंत इंदापुरे, राहुल चवरे आदि मान्यवर उपस्थित होते. काशिनाथ गुंडला निर्मित आर्केष्ट्रा मध्ये हिंदी मराठी गीते सादर करण्यात आली. अनुराधा गंगुल यांनी “देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा” हे गाणे सादर करून उपस्थितांना डोलायला लावले. काशिनाथ गुंडला यांनी “सोचेंगे तुम्हे प्यार” हे गाणे सादर केले. यानंतर बाळकृष्ण मंदुरे, विठ्ठल गवळी, कांतीलाल डागा आदींनी विविध गाणी सादर करून उपस्थितांची मणे जिंकली.
आधार स्नेह मेळाव्यात गायनाच्या कार्यक्रमानंतर हास्य कलाकार अजिंक्य वाईकर यांनी विनोद, नकला सादर करून श्रोत्यांना खळखळून हसायला लावले.
रमेश परशी दिग्दर्शित ‘वृद्धाश्रम’ हे नाटक सादर करण्यात आले. या मध्ये आई वडील आपल्या मुलांना जीवाचे रान करून शिकवतात. तीच मुले आई-वडिलांना आश्रमात ठेवतात. आईला फोनवर बोलायला सुद्धा त्यांना वेळ मिळत नाही. आई वडील मुलांची वाट पाहत आश्रमात मरून जातात. ह्या नाटकाने श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आणले. या नाटकामध्ये रमेश परशी, श्रीहरी मादगुंडी, लक्ष्मी मादगुंडी, अर्चना आकेन, आदि कलाकारांचा सहभाग होता. यावेळी इरान्ना कचेरी, तुकाराम चाबुकस्वार, काशिनाथ गुंडला, बाळकृष्ण मदुरे,प्रशांत गुर्रम, शिवराज जमादार, जितु पवार, बसू डोंगराजे, आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री.ब्रिजमोहन फोफलीया यांच्या हस्ते सर्व कलाकरांचा सत्कार करून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेधना हरिहर यांनी केले तर आभार तुकाराम चाबुकस्वार यांनी केले.
No comments:
Post a Comment