Wednesday, January 17, 2018

ब्रिजधाम आश्रम येथे मकर संक्राती उत्साहात साजरी

ब्रिजधाम आश्रम येथे मकर संक्राती उत्साहात साजरी  
            सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी मकर संक्राती सणाचे औचित्य साधून  रविवार दि१४ जानेवारी १८  रोजी सायंकाळी  वाजता  ब्रिजमोहन फोफलिया यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्यांच्या धर्मपत्नी सौ. रतनदेवी फोफलिया व सून सौ. अम्रृता फोफलिया हे उपस्थित होते. व  जैन सोशल संगिनी फोरमचे सदस्य या कार्यक्रमासाठी हजर होते. 
     ब्रिजमोहन फोफलिया आपल्या व्याखानात बोलताना म्हणाले “ जुन्या काळात विवाह कसा होत होते. मुलीचे तोंड देखील बघत नव्हते. आज परिस्थिती बदलली आहे. आजकाल विवाह होतात पण मुले आई वडिलांना पहात नाहीत. त्यांची काळजी घेत नाहीत. अशी अनेक उदाहरणे मला सांगता येतील. विवाह झाल्यानंतर घटस्फोट होत आहेत. ही गंभीर बाब आहे. आपण प्रेमाने रहावे. आनंदी रहावे. परिवारामध्ये हसत खेळत रहा. 
     आमच्यावेळी स्त्रियांचे जीवन म्हणजे फार परिश्रमाचे होते. घरातील पूर्ण काम करावे लागत असे. त्यावेळी गिरण्या नव्हत्या. घरी दळून काढावे लागत असे. अशाप्रकारे मार्गदर्शन केले. मुलांना कसे सांभाळावे, त्यांना मार्गदर्शन कशाप्रकारे  करावे. सासू-सासऱ्यांची  सेवा कशी करावी. जेवण घरामध्ये कशाप्रकारचे  घ्यावे जे की आपल्या स्वास्थासाठी उपयोगी असेल. मैदाचे पदार्थ अजिबात खाऊ नयेत. फास्ट फूड पासून दूर रहा. खानपान विषयी  उपस्थितांना मार्गदर्शन केले. घरात बनविलेल्या वस्तूचा स्वाद घ्या. मुलांना सुसंस्कृत बनवा. एकत्र कुटुंब पद्धत हीच चांगली आहे. मोबाईल, दूरदर्शन  अशा काही गोष्टी पासून मुलांनी व मोठ्यांनीही  दूर रहा.
     जीवनामध्ये जीवन जगात असताना आपापसात प्रेम सद्भावना यांची जाणीव ठेवा. लहान सहान  गोष्टीवरून घरात कलह होईल असी वृत्ती ठेवू नका.स्त्रियांनी सुद्धा आपला परिवार आनंदी ठेवा. सासरच्या लोकांशी मिळते जुळते चांगले व्यवहार ठेवा. प्रेम द्या प्रेम घ्या . योगा- व्यायाम करा. व आयुष्य वाढवा. चांगले आरोग्य हीच खरी धन संपत्ती. 
     जैन सोशल संगिनी फोरमच्या अध्यक्ष प्रीती कर्नावट यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  त्यांनी ब्रिजमोहन फाफलिया यांच्या सामाजिक कार्यांची प्रसंशा केली. सवे महिलांना खूप चांगले मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांनी फोफलिया सरांचे आभार मानले.
     यानंतर सुमित चोळे यांनी  हिंदी व मराठी  गाणी सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
     या कार्यक्रमास सर्व ज्येष्ठ नागरिक व महिला  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment