Tuesday, January 16, 2018

श्री. ब्रिजमोहन फोफलिया-- जीवन प्रवास

श्री. ब्रिजमोहन फोफलिया
जीवन प्रवास

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला विविध प्रकारचे कंगोरे निर्माण झालेले असतात. या कंगोऱ्यांचेभाव त्या व्यक्तीच्या जीवनाचा स्थायी भाव मानला जातो. तो व्यष्टी आणि सामिष्टी या कल्पनेच्या उदात्तीकरणाला स्पर्श करूनही त्याचे मूळ तत्व जगण्याचा तो प्रयत्न असतो. धर्म, अर्थ काम मोक्ष, या अध्यात्मातील चार पुरुषार्थाशी त्याचा दुरान्वयेही संबध आला नसला तरीया चार पुरुषार्थाच्या कल्पना छेदून तो आपले स्वत्व प्रस्थापित करूच शकत नाही. हे समाज जीवनाचे वास्तव आहे. धर्म धर्माची व्याख्या करताना विविध मतमतांतारची  शाब्दिक उधळण होत असताना आपण पहात असलो तरी धर्मत्व हे प्रत्येक व्यक्तीचे जीवन जगण्याचे मूळ तत्व असू शकते. मग तो धर्माचरण करणारा असो किंवा अधर्माचरण करणारा असो त्याला हे वास्तव सैद्धांतिकदृष्ट्या सोडू शकत नाही. सांगण्याचा भावार्थ एवढाच, की तुमच्या पूर्व जन्मीच्या क्रियमान कार्मानुसारच या जन्मी तुम्हाला सर्व सुभदुखे, ऐश्वर्य मिळणार. किती वृथा खटपट केली तरी एक मिळणार नाही. असे विधान कर्माचा सिद्धांत या वेधांतपर ग्राथांतात श्री.हरीभाई ठक्कर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. आणि हेच माणसाच्या जीवनाचे वास्तव आहे.
      प्रचंड महासागरात पडलेला एकादा पावसाचा थेंब त्या सागरात मिसळून प्रवाहित होत जातो. तसे माणसाचे व्यक्तिगत जीवनही सामाजिक प्रवाहात वाहून जात असते. पण तो पडलेला थेंब मात्र त्या प्रवाहाबरोबर वाहताना स्वताला धन्य समजत असतो. त्यांच्या जीवनशैलीचे ते सत्य असते. असाच समाज्याच्या प्रवाहात व्यक्तीगत जीवन जगत असताना मी समाजाचा एक भाग आहे असा विश्वास बाळगणारे, समाजप्रवाही जीवन जगणारे समाजप्रेमी व्यक्तीमत्व म्हणजे श्रीमान ब्रिजमोहन फोफलिया यांच्या जीवन चरित्राचा आलेख मांडण्यासाठी केलेला हा शब्दप्रपंच. श्री.ब्रिजमोहन फोफलिया यांचे जीवन म्हणजे कधी एकप्रकारे चिखलाची दलदल वाटते. तर त्यांचे एकूण जीवन एकाद्या चित्रपटाला शोभेल असे वाटते. कधी भास होतो की संकटाच्या निखाऱ्यावरून चालनाऱ्यांची कथा वाटते.तर कधी नशिबाशी शिवाशिवीचा खेळ खेळणारा प्रयत्नवादी व्यक्तीची भिंतीवर लटकवलेली तसवीर वात्सवाचे भान ठेऊन चित्रांकित केली असे वाटते. स्वप्नपुर्तीसाठी कट्याकुट्यातून जाणारा एकादा यात्री वाटतो.  एका बोटीतून बसून प्रवासाला निघालेला एका देशाचा शोध लावलेला वाटतो. तर कधी शिस्तीचे बाळकडू पिवून समाजमनावर विशेषता: अठराविश्व दारिद्र्यात खितपत पडलेल्या दरिद्री नारायणचा आश्रय वाटते. यांच्यातच परमेश्वराचे दर्शन घेणारा श्रद्धाळू भाविक भक्त डोकाऊ लागतो. आणि माणसाच्या माणुसकीची प्रचीती देणारा दिपस्थंब वाटतो.
      श्रीमंतीच्या हिंदोळ्यावर आणि सुखसंपनतेच्या शैयेवर झोपणाऱ्यांचे कौतुक करण्याचा आमचा कधीच पिंड नव्हता आणि नाही. पण वास्तवतेचे भान ठेऊन समाजाला दिशा दाखवणारी एकादी पणती स्वता जळत असेल त्यातून कोणाला आधार मिळत असेल तर त्यांच्या कार्याचा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे.  एकादा प्रवाशी महासागरात स्वताला वाहून जाताना समाधानी मानतो आणि हेच वास्तव ब्रिजमोहन फोफलिया यांच्या व्यक्तीमत्वात दिसून येते. वेदांतशास्त्रात निष्काम कर्माला अनन्य साधारन महत्व आहे. सूर्य जगाच्या कल्याणासाठी कोट्यावधी मैलावरून आपले किरण प्रक्षेपित करीत असताना प्रकाश देत असतो. ठरलेल्या वेळी एका क्षनाचाही उशीर न करता तो उगवत असतो आणि रात्रीचा अंधार दूर करून जीवश्रुष्टीला प्रकाश देत असतो. कर्तेपणाचा त्याला कधी स्पर्श होत नाही. पण तो सतत कर्मरत असतो. याच निष्कामकर्माच्या भावनेने श्री.ब्रिजमोहनजी आपले वर्तमानाचे आयुष्य जगताना दिसतात.
      श्री. ब्रिजमोहनजी यांचे जीवन काटेरी गुलाबाप्रमाणे फुललेल दिसते. गुलाबाला जसे काटे असतात पण त्याच्यावर फांदीच्या टोकाला आलेले. गुलाबाचे फुल पाहणाऱ्याला आनंद देते. त्या प्रमाणे काटेरी कुंपणातून बाहेर पडलेले ब्रिजमोहनजी सद्गुणांच्या दरवाज्यातून समाजमनात प्रवेश करताना दिसतात. ब्रिजमोहनजी यांचा जन्म राजस्थानातील ‘रेण’ या गावी ७ मे १९५३ साली झाला. त्यांचे घराणे त्या भागातले एक प्रतीठीत घराणे मानले जायचे. शेतीचा व्याप असल्याने त्यांचे घराणे मालदार म्हणून गणले जायचे. त्यांचे वडील कै.रामनिवासजी आणि माता श्रीमती रुक्मिणीदेवी आपल्या कुटुंबावर वडाच्या वृक्षासारखी छाया धरून वावरत होते. रामनिवासजींचा १९७६ मध्ये देहांत झाला.
माता रुक्मिणीदेवी गृहदक्ष तर वडील शिस्तप्रिय होते. ब्रिजमोहनजी यांना सहा बंधू. यात अल्पावधीतच एका बंधूचा मृत्यू झाला. सत्यनारायणजी, ब्रिजमोहनजी, जुगलकिशोरजी, शामसुंदरजी, राधावल्लभजी, असा भरलेला प्रपंच गोकुळासारखा होता.
                पूर्वी ब्रिजमोहन यांचे मामा बिरदीचंदजी व आजोबा रामकिसनजी कासट हे सोलापूरला रहात असत. फलटण गल्लीत या मामा आणि नानाजींचा कपड्याचा व्यापार होता. यांनी ब्रिजमोहन यांना दोन वर्षाचा असताना सोलापूरला आणले. मामा-नानाजीचे लाड, वासल्य प्रेमाची सावली या मुळे ब्रिजमोहनजी यांना मातृघराण्याची आठवणसुद्धा येत न्हवती. एवढे प्रेम या कासट कुटुंबांनी त्यांच्यावर केले. ब्रिजमोहनजी शिक्षण घेण्यासाठी मोठ्या वयात आले असतानाच जवळच असलेल्या ग.ल.कुलकर्णी विद्यालयात त्यांना घातले गेले. चवथीपर्यंत चे शिक्षण त्यांनी या शाळेत घेतले परंतु त्यांना या बालवयात शिक्षणाची गोडी लागली नाही. नंतर त्यांना रुपाभवानी जवळील कडादी विद्यालयात घालण्यात आले. हे विद्यालय शिस्तप्रिय होते. बालवयात खोडकरपणाला वाह्यातपण प्राप्त आणि शिक्षणातील अभिरुची कमी झाली. पाचवीत तीनवेळा ते नापास झाले. सर्वविषयाची मिळून ३५ मार्क्स मिळत होते. त्यामुळे मामा, नानाजी उदास झाले होते. 
      प्रेमाखातर आणि विश्वासाने इथे आपण आणले परंतु ब्रिजमोहनजी यांची शिक्षणात फारशी प्रगती झाली नाही त्यामुळे वडील श्री.रामनिवासजी यांना सोलापूरला बोलावण्यात आले. सर्वाना ब्रिजमोहनजी यांच्या शिक्षणाची काळजी वाटली. सर्वांच्या निर्णयाने ब्रिजमोहनजी यांना श्रीक्षेत्र पुष्करजवळ ४० किमी अंतरावर असलेले साईनाथ विद्यामंदिरात त्यांना दाखल करण्यात आले. या शाळेत सर्व खोडकर मुले दाखल केली जात होती. हे विद्यालय राजस्थानातच नाही तर संपूर्ण देशात प्रसिद्ध होते. २० एकर वाळवंटात स्थापन केलेले हे विद्यालय शिस्तप्रिय तर होतेच. पण विद्यार्थ्यावर विविधप्रकारचे संस्कार करणारे विद्यालय म्हणून त्याची ख्याती होती. या विद्यालयात छोट्या छोट्या झोपड्या उभ्या केल्या होत्या. या झोपड्यांना म.गांधी, विवेकानंद अशी इतिहास पुरुषांची नावे देण्यात आली होती. पहाटे ४ वाजल्यापासून इथला दिनक्रम सुरु होत असे. अगदी सैनदलात शिस्त असावी अशी शिस्त होती. प्रत्येक विद्यार्थ्याला टोकन देऊन सोडण्यची पद्धत होती.थोडा जरी उशीर झाला तरी त्याची तक्रार विद्यालयाच्या प्रमुखाकाकडे होत असे.  कुटीत सतरंजीवर झोपायचे स्वताची कामे स्वता करायची. कधी उनाड तर कधी अवखळ तर कधी स्वच्छंदपाने वागणाऱ्या ब्रिजमोहन यांच्यावर शाळेच्या शिस्तीचा खूपच प्रभाव पडला. चीकीचे वागणाऱ्या मुलांकडून बैलासारखे विहिरीतून पाणी काढून घेतले जात. वाळवंटातून पळायला लावले जायचे. जेवण बंद केले जायचे. या सगळ्याचा परिणाम ब्रिजमोहनजी यांच्यावर झाला आणि ते सकारात्मक विचार करू लागले. आणि त्यांच्यात परिवर्तन घडू लागले.
      वय वर्ष १६ चंचलबुद्धी अंधारमय भविष्य याचे वास्तव ब्रिजमोहनजी यांच्या मनात घर करून राहिले आणि स्वताच्या पायावर उभे राहून काहीतरी नवीन करण्याची जिद्द त्यांच्या मनात कोरली गेली. म्हणून त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ब्रिजमोहनजी यांच्या जीवनाचा परिवर्तनाचा दुसरा भाग इथे सुरु झाला. एके दिवशी सायंकाळी ५ वाजता निश्चय केला. तो निर्धारात रुपतांतरित झाला. किशात एक पैसा नव्हता अंगावर एक पायजमा, एक शर्ट एवढंच काही घेऊन ब्रिजमोहनजी आपल्या भविष्याचा वेध घेण्यासाठी काळाच्या साक्षीने धावत होते. गावापासून काही अंतरावर जालसु नावाचे एक रेल्वे स्टेशन होते. रात्रीच्या एक वाजल्या होत्या. पोटात अन्नाचा कन नव्हता. तहान लागली होती. जीव व्याकूळ झाला होता. पण अशा परिस्थितीत स्वताच्या पायावर उभा राहण्याचा संकल्प केलेले ब्रिजमोहनजी मध्यरात्री एक वाजता समोर थांबलेल्या मालगाडीत चढले. आणि अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी प्रस्थान करते झाला. रात्रभर गाडीत झोप लागली. सकाळी गाडी अजमेर स्टेशनवर थांबली.
      गावातला एक मिलीटरीतला माणूस गोविंदसिंग कडबोला हा दिल्लीत होता. दिल्लीतल्या लाल किल्यात लष्करातील एका तळावर तो कामाला होता. तो गावात आला की ब्रिजमोहनजी त्याला सतत सांगत असत की ‘मला मिलिटरीत भर्ती व्हायचं आहे. आणि गोविंदसिंग म्हणाला की तु दिल्लीला ये मी तुला कामाला लावतो. अजमेर येथे परीक्षेसाठी याव लागत असल्याने ते शहर थोडे परिचयाचे होते. तिथे काही विद्यार्थी मित्रही होते. तिकमचंद या मित्राचे दुकान माहित होते. पायी चालत चालत ते दुकानी गेले. त्याला अचानक आपला मित्र आल्याचे पाहून आश्चर्य वाटले. त्यांनी मित्राला सर्व कहाणी सांगितली. मित्राने घरी न्हेले, जेऊ घातले. काहीतरी करून दाखवण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी मित्राकडून पाचशे रुपये घेतले आणि दिल्लीचा रस्ता धरला. मित्राकडून घेतलेले पाचशे रुपये चड्डीच्या नाडीत ठेऊन त्यांनी तिकीट न काढता दिल्ली गाठली. दिल्लीतल्या लाल किल्ल्यात ब्रिजमोहनजी पोहोचले आणि गावातील एका मिलिटरीतील माणसाचा शोधसुरु केला. पण तो माणूस भेटू शकला नाही. ज्या व्यक्तीच्या आधारावर दिल्ली गाठली तोच व्यक्ती भेटला नसल्याने ब्रिजमोहनजीच्या स्वप्नापुढे एक संकट, भिंत उभी राहिली. ब्रिजमोहनजी ओळखीच्या माणसाचा शोध घेण्यासाठी भटकत राहिले, त्याच वेळी मिलिटरीतल्या एका जवानाला त्यांची दया आली. दुसऱ्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांना मेस मध्ये जेवन दिले. दिवसभर त्या माणसाचा शोध घ्य्यायचा, आश्रित असल्यासारखे मेस मध्ये जेवायचे आणि किल्ल्याच्या मैदानावर झोपायचे. पंजाबमध्ये ‘बतरा नावाची एक जमात आहे. त्या जमातीतला एक माणूस मिलिटरीमधील मेस मध्ये आला. तो माल सप्लाय करायचा. त्याच्या मुलाचे करोल बागेजवळ एक दुकान होते. काही लष्करी जवानांनी त्या बतरा जमातीतील व्यक्तीला सांगितले की याला कुठेतरी कामाला लावा. त्या बतरा च्या मुलांनी दुकानात नेले. त्यानाही माणसांची गरज होती. ब्रिजमोहनजी दुकानात दिवसभर काम करायचे आणि ते देतील तेच खायचे आणि त्यांच्याच घरी झोपायचे. ‘डीसीएम बटर’ व ‘ब्रिटानिया ब्रेड’ यांची एजेन्सी या शेठकडे होती. होलशेल व्यापार होता. स्वप्नपुर्ती आणि भवितव्य ब्रिजमोहनजी यांना स्वस्त बसूदेत नव्हते. चार महिन्यानंतर ब्रिजमोहनजी यांनी शेठचा विश्वास संपादन केला. शेठ ब्रिजमोहनजी यांना गावाकडील, घरच्यांविषयी विचारयाचे पण ते काहीतर सांगून विषय बदलायचे. आपल्या विश्वासाला तडा जाऊनये म्हणून दुकानाच्या थोडं लांब जाऊन ब्रिजमोहनजी स्वताच स्वताला घरच्यांच्या नावे पत्र लिहायचे. मजकुराच्या खाली घरातील कुणाचे तरी नाव टाकायचे आणि पत्ता दुकानाचा टाकायचा. यामध्ये स्वताची फसवणूक होत असली तरी मालकाचा दृढ विश्वास बसला. त्यामुळे शेठ जबाबदारीची कामे ब्रिजमोहनजी यांच्याकडे सोपवू लागले. दिल्लीत १५ ते २५ किमीचा प्रवास करून माल सप्लाय ते करू लागले. या सगळ्या मेहनतीबद्दल २५० रुपये पगार ब्रिजमोहनजी यांना मिळत होता.
      दहा महिन्यानंतर त्यांच्या मनात विचार आला कि एकदा गावाकडे जाऊन यावे. शेठचा विश्वास पटला होता त्यामुळे त्यानीही गावाकडे जाण्याची परवानगी दिली. जाताना पगाराचे २७०० रुपये चार ड्रेश, शिदोरी दिली, जाण्याचे तिकीटहि काढून दिले. ब्रिजमोहनजी सकाळी अजमेरला पोहोचले. राजकुमारदास धर्मशाळा तिथे होती. तिथल्या खोलीला २ रुपये भाडे होते.
      या दरम्यान ब्रिजमोहनजी घरातून निघून गेल्याने त्यांचे कुटुंब अस्वस्थ झाले होते. सर्व सुख साधन घरात असताना मुलगा निघून गेला याचे दुख कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला होते. वडिलांनी ब्रिजमोहनजीना शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना यश मिळाले नाही. ज्या धर्मशाळेत ब्रिजमोहनजी उतले होते त्याच धर्मशाळेत त्यांच्याच गावाचे काही शिक्षक आले होते. त्यांनी ब्रिजमोहनजी यांना पहिले आणि त्यांच्या वडिलांशी संपर्क साधण्या प्रयत्न केला. ब्रिजमोहनजी यांच्या मनात घरी जायचं नाही हा निश्चय झाला. ते तिथून निघून नंदकिशोर सोनी यांच्याकडे ते गेले. त्यांनीही घरच्यांशी संपर्क साधण्यचा प्रयत्न केला. पुन्हा तिथून ते बावर ला गेले. आठ दिवसाच्या मुक्कामानंतर ते पुन्हा अजमेरला आले. ज्या मित्राकडून पाचशे रुपये घेतले होते ते साभार परत केले. परत आपल्या दिल्लीतल्या शेठकडे निघाले. जाताना त्यांनी कारल्याचे लोणचे, आवळ्याचे लोणचे, मिरचीचे लोणचे, पापड घेऊन ते दिल्लीला पोहोचले. ब्रिजमोहनजी ने आणलेले लोणच्याचे प्रकार पाहून त्यांनी शेठच्या पत्नीने डोक्यला हात लावला आणि म्हणाल्या ‘मोहन तुझ्या घरी लोणचे बनवण्याचा कारखाना आहे काय, तुझ्या आईला इथे बोलव आपण लोणच्याचे दुकान टाकू. आणि मग पुन्हा दुकानदारीचा प्रवास सुरु झाला.
      ब्रिजमोहनजी चे ध्येय स्वताच्या पायावर उभे राहून काहीतरी करून दाखवायचे होते. त्यासाठी सुरु असलेले प्रयत्न त्या ध्येयाचे साधन होते. दिल्लीच्या जुन्या शेठच्या घरी पुन्हा बस्तान बसत चालले होते. आणि अचानक एके दिवसी वडील आणि बंधू दुकानाकडे येताना दिसताच ब्रिजमोहनजी म्हगाच्या दारातून पळून गेले. रोज गुरुद्वारातील लंगरमध्ये जेवायचे धर्मशाळेत झोपायचे पण आर्थिक प्राप्ती काहीतरी केली पाहिजे म्हणून त्यांनी एक विलक्षण मार्ग शोधला. त्यावेळी धर्मेद्रचा ‘शिकार’ चित्रपट लागला होता. गर्दी होती, त्यांनी ५ तिकिटे काढली आणि जास्तीच्या किमतीने विकली. रोज स्वताच्या कष्टाने ५० रुपये हातात येत होते. गुरुद्वारच्या लंगरमध्ये जेवण मोफत असल्याने खर्च जास्त होत नव्हता.
      एके दिवसी रात्री अमृतसरचे एक कुटुंब त्या धर्मशाळेत आले. धर्मशाळा पूर्ण भरली होती. त्यामुळे त्या कुटुंबियांना रूम मिळाली नाही. रात्री आता कुठे जायचे हा प्रश्न त्या कुटुंबियांना पडला. मग ब्रिजमोहनजी  यांनी त्यांना विनंती केली की ‘रूम खाली नही तो आप इस रूम मे ठहरीये’ याचा त्यांना संकोच वाटला. तरीही ते आग्रहा खातर राहिले. सकाळी ते कुटुंब त्यांच्यावर खुश होते. ब्रिजमोहनजी यांना ते म्हणाले की, ‘ हम लोग वैष्णवी माता जा रहे है, तुम चलिये हमारे साथ’ त्यांनी जास्त आग्रह केल्याने ब्रिजमोहनजी त्यांच्या सोबत निघाले. चार दिवसांच्या कुटुंबियांच्या सहवासाने बैचेनी वाढत गेली. जम्मूत काही दिवस काढल्यानंतर श्रीनगरला गेले. पण पैसे कमवण्यासाठी त्यांनी पुन्हा चित्रपटाची तिकिटे विकायला सुरवात केली. श्रीनगर मध्ये काही साधू त्यांना भेटले. ते त्यांच्या सोबत अमरनाथला निघाले. अमरनाथला शुभ्र वलयांकित शिवाजीची पिंड पाहून  स्वताला धन्य समजले आणि वाटचाल याश्वस्वी होण्यासाठी प्रार्थना केली. अमरनाथला कडाक्याची थंडी, हवामानात झालेला बदल त्यामुळे ते आजारी पडले. ५-६ दिवसाच्या मुक्कामानंतर आजारी पडलेल्या अवस्थेत ते श्रीनगरला आले. एक महिना श्रीनगरमध्ये मुक्काम केला. तिकिटे विकणे सुरूच होते. या कालावधीत एका ट्रक ड्रायवरशी भेट झाली. त्याला माझी ट्रक शिकण्याची इच्छा आहे असे सांगितले. तसा थोडाफार प्रयत्नही झाली. पुढे एका मिस्त्रीजवळ राहिले. ते दिल्लीतील सुभाष नगर ला रहात होते. ते एका मोठ्या थिएटरमध्ये काचेचे फर्निचर करण्याचे काम करत होते.  त्यांनी ब्रिजमोहनजी अत्यंतप्रेमाने जवळ ठेऊन घेतले. मिस्त्री रोज गरम गरम पराठे, हलवा रोज ब्रिजमोहनला खाऊ घालायचे. त्यांनी ब्रिजमोहनचा प्रामाणिकपणा पहिला होता. मिस्त्री ने ब्रिजमोहनजी यांना त्यांच्या थिएटर मालकाकडे घेऊन गेले आणि ब्रिजमोहनला नोकरी द्यायला सांगितले. शेठनी होय नाही करत ते नोकरी द्यायला तयार झाला. थिएटरमध्ये ब्रिजमोहनजीकडे अप्पर क्लासची बैठकव्यवस्था सोपवण्यात आली. येणाऱ्या प्रेक्षकाला ब्याटरी दाखवून त्यांच्या शिटनंबरवर बसवण्याचे काम ते चोख बजावत होते.
      अंधारातून प्रकाशाकडे जीवनाचा प्रवास सुरु करणारे ब्रिजमोहनजी अंधारातल्या प्रेक्षकांना ब्याटरीचा प्रकाश दाखवून त्यांच्या जागेवर बसवत होते. दुसऱ्याला प्रकाश दाखवणारे मोहनजी स्वता अंधारात होते. ते उजेडात जाण्याचा खूप प्रयत्न करत होते. आणि तो प्रयत्न यशस्वी ठरला.
      जम्मूहून जालंदर दिल्ली येताना तिकीट तपासणीचे एक पथक गाडीत चढले. ब्रिजमोहनजी नेहमीप्रमाणे विनातिकीट प्रवास करीत होते. सोबत एक पिशवी होती. त्यात जम्मू काश्मीर मध्ये घेतलेले स्वेटर, हातमोजे, पायमोजे होते, ते सगळं तिथेच टाकून ब्रिजमोहनजी पळून गेले. आणि कशीतरी दिल्ली गाठली.
      ब्रिजमोहनजी अजंठा थिएटरमध्ये तिकीट विक्री करत असताना पूर्वी दिल्लीमध्ये ज्या शेठकडे काम करत होते. ते शेठजी कुटुंबासोबत चित्रपट पहायला आले होते. ते ब्रिजमोहनजी यांना पाहून आश्चर्यचकीत झाले. ब्रिजमोहनजी नी सगळा प्रवास सांगितला. ते ब्रिजमोहनला घरी घेऊन गेले. काश्मिरी गेटजवळ या शेठ्जींचे छोटे हॉटेल होते. त्या हॉटेलवर व्यवस्थापक म्हणून तिथला बाजारहाट करण्याची जबाबदारी ब्रिजमोहनजी यांच्यावर सोपवण्यात आली. ते हॉटेल विद्यार्थ्यांसाठी असल्याने ५.३० ला बंद होत असे. उरलेल्या वेळात ६ वाजता त्यानी जवळच्या थिएटरवर ब्ल्याक ने तिकीट विक्री सुरु केली. काही दिवसांनी शेडजींना कळले. आणि तिकीट विक्री बंद करण्यासाठी खडसावून सांगितले. ब्ल्याक ने तिकीट विक्रीकरून मिळवलेले सात हजार रुपये त्यांनी शेठजींकडे सुपूर्द केले. प्रत्येक ठिकाणी त्यांना काहीतरी शिकायला मिळत होते.
      ब्रिजमोहनजी यांचा खडतर प्रवास सुरु होता. दिल्लीतील गुरुद्वारमध्ये ते रोज प्रसाद खात होते. ब्रिजमोहनजी यांच्या मनात सेवाभाव गुरुद्वारमध्येच निर्माण झाला. गुरुद्वारमध्ये विलक्षण दृश पहिले. सेवेचा-श्रीमंतीचा, धनिकांचा-सेवाभावाचा अतूट संबध असणारी अनेक उदाहरणे तिथे पहायला मिळाली. मोठ-मोठ्या किमतीच्या कारमध्ये शिखबांधव कुटुंबासमवेत येत असत आणि तिथल्या मंदिराबाहेरील चप्पला, बूट पॉलिश करताना पाहिले. अनेक माता भगिनी किचनमध्ये जावून काम करीत होते. कोणी पत्रावळी उचलत होते. कोणी पाणी देत होते. या सेवाभावात त्यांची श्रीमंती कुठेही आडवी येत न्हवती. ज्यांच्या घरी १०-२० नोकर आहेत असे लोकसुद्धा सगळ्या प्रकारची सेवा गुरुद्वारात करीत होते. गृरुद्वारातील हा सेवाभाव ब्रिजमोहनजी यांच्या अंतकरणात खोल रुतून बसला. त्यावेळी त्यांचा मनात सुधा नव्हते की पुढे आपल्या हातून काही समाजसेवा घडेल.
      दिल्लीच्या या प्रवासात ब्रिजमोहनजीनी व्यापारातले अनेक बारकावे, व्यापारातला चढ-उतार, खरेदी-विक्रीचे व्यवहार याचा फार मोठा अनुभव घेतला. हॉटेलची भाजी आणण्यापासून ते अनेक मोठे व्यवहार ब्रिजमोहनजी करत असत. हॉटेलच्या मालकानी दिलेली एक सतरंजी आणि पांघरायला दिलेली एक चादर त्यांचा जीवनाचा आसरा ठरली. ब्रिजमोहन अतिशय प्रामाणिकपणे शेठजींच्यात नोकरी करीत असताना  शेठजींना ब्रिजमोहन घरातून पळून आल्याची कुन-कुन लागली होती. माझ्या वडिलांचा पत्ता शेठजींच्याकडे होता. ऐन उमेदीत मुलगा घर सोडून गेलाय याची ब्रिजमोहनच्या कुटुंबियांना किती काळजी लागली असेल याची जाणीव शेठजींना झाली आणि त्यांनी ब्रिजमोहन यांच्या घरी एक पत्र पाठवले. पत्र मिळताच ब्रिजमोहन यांचे वडील, बंधू दिल्लीला आले. आणि ब्रिजमोहनला  घराकडे म्हणजेच राजस्थानमधील रेण या गावी घेऊन गेले. रेल्वेतून खाली उतरले तर सोमोर गावकरी, तरुण ढोलवाजवत ब्रिजमोहनच्या स्वागताला हजर होते. वाजत गाजत मिरवणूक घरापर्यंत पोहोचली. काही शुभ घडले की बत्तासे आणि गुळ वाटण्याची एक पद्दत आहे. ब्रिजमोहनच्या आई वडिलांनी संपूर्ण गावात बात्तासे गुळ वाटला. आणि आपला आनंद व्यक्त केला. थोड्याच दिवसात कासट मामा घरी आले. वडिलात आणि त्यांच्यात चर्चा झाली १९७० साली सिद्धरामेस्वराच्या पवित्र भूमीत आले.
      कासट मामाचे फलटण गल्लीत दुकान होते. ब्रिजमोहनजी त्या दुकानात बसू लागले. व्यवहाराची माहिती करून घेतली. एके दिवसी त्यांनी मामाला म्हणाले कि ‘मला स्वातंत्र्य उद्योग करायचा आहे’ एक प्रयत्न म्हणून २५ हजार रुपयांचे कटपीस आणले. सोलापुरातल्या रेडीमेड दुकानदारांना तो विकत गेलो. वेळच्या वेळेला मुंबईच्या व्यापाऱ्यांचे पैसे दिले. त्यामुळे व्यवसायात सर्वांचा विश्वास संपन्न केला. १९७३ मध्ये श्री.राधा सर्वेश्वर कंपनी स्थापन केली. इकडे कपड्याचा व्यापार सुरूच होता. मुंबईचे व्यापारी ५ लाखापर्यंत उधारमाल देऊ लागले. व्यवसायात जम बसला. या दरम्यान एक घटना घडली. मामानी ३० हजार टोप्या व्यापारासाठी आणल्या होत्या. या टोप्या कानाला थंडीत सौरक्षण देत होत्या. आणि उन्हापासून सौरक्षण होत होते. टोपीची मागील बाजू मानेपर्यंत येत होती. मामाकडून माफक नफा देऊन त्या टोप्या घेतल्या. दोन चार मुल सोबत घेतली. प्रत्येकाला सायकल भाड्याने दिली. भारत सरकारची योजना आहे स्वस्तात टोपी घ्या असा प्रचार केला. विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत गेला.  प्रत्येक शाळेत जाऊन शिक्षकांना भेटून सर्वाना टोप्या घ्यायला सांगितले. सगळ्या टोप्या विकल्या गेल्या. न विकणारा माल चांगल्या किमतीने विकला त्यामुळे ब्रिजमोहन यांना व्यवसायाचा आत्मविस्वास वाढला. या दरम्यान राधासर्वेश्वर कंपनी मध्ये पैसे देणाऱ्यांची आणि घेणाऱ्यांची संख्या वाढली. व्यवसाय वाढला. कंपनीतून चांगले उत्पन्न मिळत गेले. त्यामुळे कापडाचा व्यवसाय बंद केला. आणि बिशीचे २ ग्रुप १९७८ मध्ये तयार केले. अत्यंत बारकाईने लक्ष घातले. अहोरात्र कष्ट केले लोकांचा विस्वास संपादन केला. सत्य आणि प्रामाणिकपणाला जरासुद्धा धक्का न लावता १९८६ सालापर्यंत ५० बिशीग्रुप तयार झाले. अत्यंत प्रामाणिक आणि शिस्तीने व्यवसाय केल्याने २ मे १९९५ पर्यंत हा व्यवसाय १०० कोटी पर्यंत गेला. लोकांचा विश्वास असल्याने पैसे लावणाऱ्यांची संख्या वाढली. व्यापाऱ्यांची पैसे लावण्यासाठी रांग लागली. याचं कारण एक होत की पैसे मागण्यासाठी आलेला माणूस हा प्रामाणिक आहे का ?, याचा १०० % अंदाज येत होता. नजरेत बसलेल्या माणसाचा अंदाज कधीच चुकीचा ठरला नाही.
      ब्रिजमोहन यांचा १८ नोव्हेंबर १९७१ रोजी जोधपुर येथील अमरचंदजी लालचंदजी राठी यांची कन्या रत्नाबाई यांच्याशी विवाह झाला. खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनात लक्ष्मि स्थिरावली आणि त्यात वृद्धी झाली.
      ब्रिजमोहन म्हणतात आजपर्यंत मी कधी भागीदारीत कधी व्यवसाय केला नाही. त्यामुळे मला घात कुणाचा झाला नाही. माणूस ओळखण्याची परमेश्वराने दिलेली बुद्धी आणि पूज्य सलेमाबाद निम्बार्क गुरु यांच्या आशीर्वादाने व्यवसायात खूप प्रगती झाली आणि आज तागायत होत आहे.
      पूज्य निम्बार्क गुरूंच्या सानिध्यात राहताना  अनेक साधूंची सेवा करण्यात त्यांना आनंद वाटत असे. तेथील साधू आरोग्य संपन्नतेने जीवन जगतात. त्यांना घर नाही, संसार नाही तरी ते आनंदी आरोग्यदाई जीवन जगतात. याचे आश्चर्य ब्रिजमोहनजी यांना वाटले . तेव्हापासून ज्याचे स्वास्थ्य चांगले तो सर्वात श्रीमंत माणूस.  त्या दिवसापासून त्यांनी आहारावर नियंत्रण ठेवले.
      जीवनात पैश्यापेक्षा एक वेगळ दिव्यभव्य आहे ते मानशिक समाधान.  व्यवसायातून अर्थप्राप्ती मोठ्या प्रमाणात झाली .  त्याचबरोबर समाजातल्या दुःखाची बोचणी त्यांना होत होती. गरिबांना कोणीतरी मदत करणारा, त्यांचे जीवन उभं करणारा, त्यांच्या फाटलेल्या संसाराला ठिगळ जोडणारा असला पाहिजे. जगात शेकडो श्रीमंत आहेत. तेही आपल्या आपल्या परीने मदत करत असतात. असा मनोभाव असणारे ब्रिजमोहनजी समाज सेवेसाठी कार्यरत झाले. श्रीमंतीचा तोरा थाट माट कधी त्यांनी दाखवला नाही. त्यांना गरिबांच्या सुखाची भूक लागली होती. अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले. समाज सेवेतूनच परमेश्वराचे दर्शन त्यांना मिळाले . श्रीमंती हि मनाची असावी लागते. आपल्या एकाद्या छोट्याशा मदतीने त्याला समाधान वाटत असेल तर तो आनंद कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीपेक्षा जास्त असते.
      ब्रिजमोहनजी म्हणतात , मला श्रीमंतीचा डोलारा पुढे उभे करायचा नाही. सेवेचा देखावा’ तर’ मुळीच नाही. प्रतिष्ठा मिरवण्याचे सोंग मला करायचे नाही. अत्यंत प्रामाणिकपणे मिळवलेल्या संपतीचा काही वाटा गरिबांसाठी उपयोगी पडला पाहिजे. ‘समाजकार्य हे ईश्वराचे कार्य आहे’ यावर माझा विश्वास आहे. माझ्या या समाजकार्यात मला जे पाठबळ मिळाले ती माझी पत्नी सौ.रत्नाबाई ही माझ्यापेक्षा एक पाउल पुढे आहे, घरातल्या कामवाली बाईला ती आधी जेऊ घालते.  जे अन्न माझ्या पत्नीच्या ताटात असे तेच अन्न नोकर-चाकारांच्या ताटात असे. आजही तिने हा नियम काटेकोरपणे पाळला आहे.
      ब्रिजमोहनजी यांनी लावलेले सामाजिक सेवेचे रोपटे आज अनेक संस्था उभ्या करून त्याचा वटवृक्ष बनला आहे. सेवाकार्य हे ब्रिजमोहनजींचे सांस्कृतिक संचित आहे. त्यांचे समाज कार्य हे एक आदर्श कार्य आहे. त्यांच्या जीवनाचा सखोल अभ्यास केला , चिंतन केले तर भारतीय संस्कृतीचा प्रतक्ष अप्रतक्ष सेवाभावाचा अविष्कार वाटतो. चंगळवादाच्या तुफानात मोहनजींचे चरित्र आदर्शाचा दीपस्थंब वाटतो.
      धर्मही माणसाच्या खासगी जीवनाची, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाची मोलाची बाब वाटते. ब्रिजमोहनजीनी सेवाभाव हाच आपला धर्म मानला. या धर्माचे ते निष्ठेने पालन करतात. माणूस जादूच्या एका दुनयेत जगत असतो तो जादुगार आपल्याला दिसत नाही पण तो लाखो चमत्कार करताना दिसतो. अतिशययोक्तीचे भान ठेऊन म्हणावे लागते की ब्रिजमोहनजी हे एक त्याच जादूची निर्मिती आहे.
      घरात एकादे आपत्य असावे त्याला चांगले संस्कार द्यावेत वंशाचा वृक्ष नेहमी बहरत राहावा ही प्रत्येक श्री-पुरुषांची इच्छा असते. पण नियतीने मांडलेली काही गणिते असतात. त्यांना आपत्य झाले नाही आणि याचे दुख त्यांना कधी झाले नाही. त्यांनी अप्तातील तीनमुली दत्तक घेतल्या त्यांच्यावर संस्कार केले त्यांचे पालन पोषण केले. चांगल्या घराण्यात त्यांना सून म्हणून पाठविले. फोफलिया घराण्याला शोभेल असा त्यांचा असा विवाह सोहळा संपन्न केला. वंश पुढे चालावा या पेक्षा मोठ्या प्रमाणात उभे केलेले सामाजिक कार्य असेच पुढे चालावे यासाठी त्यांनी स्वताच्या नात्यातला मुलगा दत्तक घेतला. त्याला पूर्ण संस्कारित केले. त्याचे नाव मनीष. आता श्री.मनीष यांनी व्यवसाय चांगल्या प्रकारे सांभाळला आहे. सर्व व्यवहार तो प्रतक्ष पहात असतो. अक्कलकोट येथील सौ.अमृता ही संस्कारक्षम घराण्यातील आहे. केवळ एक वडील म्हणून ती माझ्याकडे पाहत असते. वेळच्या वेळेला औषधे देणे, हा अमृताच्या जीवनाचा एक अविभाज्य दिनक्रम. घरात येणाऱ्या सर्वांचा पाहुणचार करताना ती आनंदी असते. म्हणून अमृता ही सून नसून मुलगी आहे असे ब्रिजमोहनजी म्हणतात.
      सर्वसामान्य माणसाला आपल्या मुलीचा विवाह करणे महागाईमुळे आणि आणि आर्थिक अडचणीमुळे अनेकदा अवघड जाते. विवाहासाठी त्यांना जमीन गहाण ठेवावी लागते. कुटुंब प्रमुख कर्जाने दबला जातो. यातूनच सामुदायिक लग्नाची संकल्पना सुचली. ग्रामीण भागात याचा प्रचार करण्यासाठी एक बैलगाडी घेऊन त्याला सामुदायिक विवाहाचे पोष्टर लावले. अनेक घेडेगावात स्वतः बैलगाडीत बसून प्रचार केला. १९९१ साली  सेंट जोसेफ मध्ये ३२ जोडप्यांचा सामुदायिक विवाह अत्यंत आनंदात पार पडला. या संकल्पनेचे सगळीकडे स्वागत झाले. दुसरा सामुदायिक विवाह सोहळा १९९४ साली आयोजित केला. सगळीकडे चांगला प्रचार झाल्याने या सोहळ्याला प्रतिसाद हि उत्तम मिळाला. या सोहळ्याला १५२ विवाहाची नोंद झाली. पार्क मैदानावर भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन केले.आणि नार्थकोट मध्ये भोजन व्यवस्था धार्मिक विधी यांचे आयोजन केले. या सोळ्यात सर्व जाती धर्माचे वधूवर समाविष्ट होते.प्रत्येक जोडप्याला वस्त्र, मणी मंगळसूत्र, बांगड्या, जोडवी, संसारउपयोगी भांडी, यासाठी कोणाकडून आर्थिक मदत घेतली नाही. आजपर्यंत एक हजारहून अधिक जोडप्यांचा विवाह या संकल्पनेतून साकार झाला. आपल्या जवळच्या संपतीचा उपयोग सामाजिक कार्यासाठी होताना खूप समाधान मिळत होते असे ब्रिजमोहन म्हणतात. या सामुदायिक विवाह सोहळ्यातून तसेच अनेक अन्नछत्रातून विविध समारंभातून सुमारे १२ ते १३ लाख लोकांना अन्नदान त्यांच्या हातून झाले.
      काही लोक ब्रिजमोहनजीकडे यायचे आणि त्यांना घरात होणाऱ्या त्रासाबाबत सांगायचे.  ज्यांच्या घरची परिस्थिती चांगली आहे, ज्यांना एक-दोन मुलं आहेत, ज्यांचे घर भरलेले आहे. अश्या घरातील वृद्ध लोक येयून आपली करून कहाणी सांगायचे. यातले कित्तेक निराश्रित झाले. यांना काहीतरी मदत केली पाहिजे असा विचार ब्रिजमोहनजीना सतावत होता. यातूनच ब्रिजधाम आश्रमाचा जन्म झाला. संकल्प सत्य असला – प्रामाणिक असला तर त्याला यशाचे दरवाजे उघडे असतात. १९९८ साली सोरेगाव येथे १-२ पत्र्याच्या खोलीत ‘निम्बार्क ब्रिजधाम आश्रम या नावाने’ वृधाश्रम सुरु केला. आत हा आश्रम खूप मोठा झाला आहे. आश्रमात ३-४ भव्य वस्तू उभ्या आहेत, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष बांधले. भव्य किचन बांधले. चार एकराच्या परिसरात सगळीकडे झाडे लाऊन नंदन वन उभे केले आहे. भव्य व्यासपीठ , मंदिर, बगीचा, असा दिमाखदार आश्रम उभा आहे. या साठी कुणाकडून एक रुपयांची मदत घेतली नाही. आश्रमातील वृद्धाना सकाळ संध्याकाळ चहा, नास्था, जेवण, मोफत औषधे, एक आयुर्वेदिक डॉक्टरांची नियुक्ती केली. रोज सकाळी ब्रिजमोहनजी स्वता तिथे जाऊन सगळ्यांची जातीने काळजी घेतात.
      १९९० साली वृंदावन रासबिहारी ललित स्वामीजी यांच्या प्रवचनाचे शिवानुभव मंगल कार्यालयात सातदिवस अध्यात्मिक नियोजन केले. १९९१,१९९५ साली सामुदायिक विवाहाचा उच्चांक त्यांनी केला.१९९७ साली डॉ शशिकांतजी महारज यांच्या उपस्थितीत मोफत दंतयज्ञ चिकित्सा शिबीर चे आयोजन केले होते. या शिबिरात ११०० लोकांनी फायदा घेतला. २००१ साली ब्रिजधाम प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. यातून प्रत्येक रविवारी वृद्धांसाठी विविध कार्यक्रम केले जातात. २००१ साली ४०२ सामुदायिक विवाहाचा इंदिरा गांधी पार्क स्टेडीयमवर  ऐतिहासिक नियोजन करण्यात आले. २००२ साली सोलापूर येथे एका प्रसंगाच्या निमित्ताने संचार बंदी लागू करण्यात आली होती. या संचार बंदीच्या कालावधीत सातत्त्याने ९ दिवस पोलीस कर्मचारी टास्कफोर्स  आणि सिव्हील हॉस्पिटल मधील रुग्ण आणि त्यांच्या परिवारांना दोनवेळचे मोफत भोजन देण्याची व्यवस्था केली. २००२ साली शेकडो अपंगाना जयपूर फुट बसविणारे शिबीर आयोजित केले.  २००३ साली सोलापुरात यंत्रमाग कार्कांदाराच्या वतीने संप पुकारण्यात आला होता. त्यामुळे हजारो मजदूरांची उपासमार होत होती. या बाबत सातत्याने १३ दिवस सुमारे ४ लाख मजुरांना सकाळपासून मध्यरात्री पर्यंत भोजनाची व्यवस्था करण्यात आली.  २००४ साली मुंगी पैठण येथे जगदगुरु भगवान निम्बर्कचार्य तसेच राधा माधव  मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त मुख्य यजमानपद स्वीकारले. शहरातील व्यक्तींच्या अंत्य यात्रेसाठी पुष्पक रथ चे समर्पण करण्यात आले. २००६ साली मराठा समाज मंदिरात ज्येष्ठ व्यक्तींसाठी आनंद मेळ्याचे आयोजन केले. २००७ साली श्री योगगुरु रामदेव बाबा यांच्या उपस्तीतीत ८ दिवसांचे प्राणायाम व नवचैतन्य शिबिराचे आयोजन केले.  २००८ साली पंढरपूर येथील  श्री.राधा माधव मंदिर प्राणप्रतिष्ठा समारंभाचे अध्यक्ष पद स्वीकारले. २००९ साली सोलापुरात मूकबधिरांच्या राष्ट्रीयस्तरावरील क्रीक्रेट स्पर्धेचे आयोजन केले. २०१० साली ब्रिजमोहन फोफलीया नेत्रालायाची स्थापना केली.  २०१० साली जगतगुरु शंकराचार्य जैन साधूसंत ४०० साधूसंताचे आश्रमात प्रदीर्घ वास्तव्य. २०११ साली नानिबाईका मायरा राधाकृष्ण महाराज यांच्या उपस्थितीत तीन दिवस कडाडी हायस्कूल मध्ये आयोजन. २०१३ साली पंढरपूर येथे श्री. किरीटभाईजी यांच्या उपस्थितीत  १२ जोडप्यांचा सामुदायिक विवाहाचे आयोजन. ६२ व्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब व गरजू लोकांना मोफत डायलेसिस व फोफत उपचार शिबिराचे आयोजन.  २०१५ साली ‘सामुदायिक विवाहसोहळा अपने द्वार’ या नवीन उपक्रमाची सुरुवात. या उपक्रमाद्वारे सुरुवातीला कुमठे गावात ११ सामुदायिक विवाह संपन्न झाले. देशातल्या धनिकांच्या पुढे ब्रिजमोहनजी एक आदर्श आहेत.


No comments:

Post a Comment