Monday, January 29, 2018

ब्रिजधाम आश्रम सोरेगाव येथे हास्य काव्यमैफिल संपन्न

ब्रिजधाम आश्रम सोरेगाव येथे हास्य काव्यमैफिल संपन्न

    ब्रिजधाम अश्रम सोरेगाव येथे हास्य काव्यमैफिल आयोजित करण्यात आली होती. या हास्य काव्यमैफिलीत कवी डाॅ.राजदत्त रासोलगीकरकवी आनंद घोडकेकवी कालिदास चौडेकरकवी वसुंधरा शर्माकवी नागेंद्र मानेकरीकवी कृष्णा शिंदेकवी माळी गुरुजीकवी विजयकुमार देशपांडे आदि कवींनी भाग घेतला होता. ब्रिजधाम आश्रमाची हिरवळ सायंकाळच्या वेळी अधिकच बहरली होती. अशा बहरलेल्या हिरवळीवर बहारदार हास्य कविता सादर करून कवींनी उपस्थिताना पोटधरून हसायला लावले. कवी कालिदास हे हजलकार म्हणून प्रसिध्द आहेत.त्यांनी आपल्या कवितेतून बायकोला माहेरी सोडून आल्यावर होणारा आनंद आणि दुख: याचे हाश्य चित्रण केले. ते म्हणतात,

हवेवर स्वार झालो मी हिला सोडून आल्यावर

सुखाने ठार झालो मी हिला सोडून आल्यावर

डबे शोधून थकलो मीरिकामे वाजती ठणठण

उपाशी घार झालो मी हिला सोडून आल्यावर

कवी डाॅ.राजदत्त रासोलगीकर यांनी कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या नवर्‍याने बायकोसमोर व्यक्त केलेले मनोगत विनोदी कवितेच्या माध्यमातून सादर केलेते म्हणतात ,

किती सहन करायचे सखे
असह्य झाला उन्हाळा
चल आता फिरू जोडीने
लोणावळा नाहीतर खंडाळा..

कडक उन्हाने बघ गं सखे
गोर्‍याचा मी झालो काळा
मित्र समजून बोलावी मला
झाडावरचा कावळा काळा ..

              कवी शहाजी कांबळे आपल्या "तिसरे महायुद्ध" ही  कविता सादर करताना म्हणतात ,

कोण केसावरकोण डोळ्यावर कोण गालावर

अखं गाव तुझ्यावरच मारतंय

जागाच शिल्लक नाही

आता तिसरं महायुद्ध हुतंय



तू एस.टी. मधी चढली कि

 म्हतार उठून तुला जागा देतय

तुझं तिकीट काढताना

 कंडक्टर हिशोब चुकतंय



गल्ली बोळातल्या भिंतीवर तुझं नाव

कोण खडूनं तर कोण चुन्यान काढताय

दिवसभर तुझ्या नावचं नामस्मरण करून

रातभर काकड आरती करतंय

कवी आनंद घोडके यांनी "वाटलं एकदा" या कवितेतून नवरा-बायकोच्या नात्यातील विनोद सादर केले

कार्यक्रमाच्या शेवटी श्री.ब्रिजमोहनजी फोफलीया यांनी उपस्थित सर्व कवींचे भेटवस्तूप्रमाणपत्र देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाला  जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment