ब्रिजधाम आश्रम भक्तिरसात रंगले
सोलापुर : सोरेगाव
येथील ब्रीजधाम आश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रीमती कांबळे (गायिका) व त्याची वाघ्यामुरळी पार्टी
यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व रंगपंचमीचे औचित्य साधून भक्तीमय वातावरणात ज्येष्ठ नागरिकांनी गुलाल व रंगाची उधळून करून
रंगपंचमीचा आनंद घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश स्तवनाने करण्यात
आली. त्यानंतर खंडोबा, अंबाबाई, काळूबाई या देवी देवतांचे भजन सादर करण्यात
आले. “ अहो धनी मी सांगू व्यथा कुणाला...
अंबाबाई आता मी सांगू कुणाला...”, बानू चल चल देवाला जाऊ खंडोबाचा दर्शन घेऊ,
भंडारा खोबर वाहू .....”, “सपनात अंबा आली हितगुज सांगून गेले. छबिण्याला स्वार
झाली वाघावर....”, “माझ्या मनाची इच्छा झाली पुरी......”, “जोवर आहे जीवात जीव आई
आई म्हणून कोणी हाक मारी....”, “ स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी...” अशा
प्रकारची सदाबहार भजने सादर करून ज्येष्ठ नागरिकांची मने जिंकली.
या कार्यक्रमात गायिका कांबळे यांना गणेश
लक्ष्मन सरवदे - ढोलक वादक, की बोर्ड व गायक – तानसेन लोकरे, झांज वादक –
माधव शिंदे. या कलाकारांनी उत्तम साथ दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी जेष्ठ नागरिक वामनराव
सातपुते व सुहास माने यांनी ढोलकीच्या तालावर या गाण्यावर नृत्य करून उपस्थित
ज्येष्ठ नागरिकांची दाद मिळवली. व त्यांचा सोबत थेका धरत नृत्य केले.
श्री.ब्रिजमोहनजी
फोफलीया यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. आणि कार्यक्रमाची सांगता
झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संखेने उपस्थितीत होते.
No comments:
Post a Comment