Thursday, March 21, 2019

वंदना महोत्सव एक श्याम बन्सीवाले के नाम

एक श्याम बंसीवाले के नाम कार्यक्रमाने हजारो भाविकांची मने जिंकली ; भाविकांनी भजनाच्या तालावर धरला ठेका : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तांची हजेरी : सोलापूरकर झाले पावन

एक श्याम बंसीवाले के नाम कार्यक्रमाने 
हजारो भाविकांची मने जिंकली ; भाविकांनी भजनाच्या तालावर धरला ठेका : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तांची हजेरी : सोलापूरकर झाले पावन 
सोलापूर - श्री.श्याम मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर आणि वीर बर्बरिक सेवा समिती दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने रुपाभवानी मंदिर जवळील पर्ल गार्डन येथे श्री.श्याम वंदना महोत्सव समितीचे अध्यक्ष ब्रिजमोहन फोफलिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एक श्याम बंसीवाले के नाम कार्यक्रमाने 
हजारो भाविकांची मने जिंकली . भाविकांनी भजनाच्या तालावर ठेका धरला . महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्तांची हजेरी हे या वंदना महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.
     पर्ल गार्डन येथे दोन दिवस आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची सोलापूरसह बाहेरील जिल्ह्यातील भक्तांनासुद्धा ओढ लागून राहिली होती.शनिवारचा दिवस उजाडला आणि भक्तांची प्रतीक्षा संपली.शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पाचही देवदेवतांची मंदिरांमधे प्रतिष्ठापना करण्यात येऊन मंदिर दरबार भरविण्यात आला.त्यानंतर म्हणजेच रविवारी प्रमुख कार्यक्रमाला दुपारपासून सुरुवात झाली.खऱ्या अर्थाने या धार्मिक सोहळ्याला भक्तांची अलोट गर्दी होणार याची माहिती असल्यानेच दुपारपासूनच भक्तांची रीघ लागली होती.महोत्सवाचे अध्यक्ष ब्रिजमोहन फोफालिया यांच्या हस्ते अखंड श्याम ज्योत प्रज्वलित करण्यात आली.त्यानंतर ज्योत दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या.
    या सोहळ्यासाठी गेल्या महिनाभरापासून तयारी सुरू होती.अनेक समित्या  नेमण्यात आल्या होत्या.त्यांच्या माध्यमातून हा सोहळा पार पडला.रविवारी दुपारी ज्योत प्रज्वलित झाल्यानंतर दिल्लीचे गोपाल शर्मा,शशी कुमार आणि त्यानंतर अनिल आणि रजनीश शर्मा यांच्या भजनात श्रोते तल्लीन झाले.तत्पूर्वी महोत्सवाचे अध्यक्ष ब्रिजमोहन फोफलीया यांनी या कलावंताचा फेटा बांधून आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.त्यांनंतर रंगलेल्या भक्तिरसात श्रोते न्हाऊन गेले होते.
      जसजशी रात्र होत होती तस तसा भक्तांचा उत्साह वाढतच होता.संपूर्ण मैदान गर्दीने फुलून गेले होते.येणाऱ्या प्रत्येक भक्ताला समितीचे पदाधिकारी आदर देत त्यांचे स्वागत करत होते.
  सर्वांना उत्सुकता होती ती म्हणजे श्याम रत्न पप्पूजी शर्मा खाटू वाले यांच्या रसाळ वाणीतील भजनाची .तीसुद्धा वेळ आली.पप्पूजी शर्मा यांनी आपल्या भजनातून शिश के दानी की अमर कहानी सर्वांपर्यंत पोहोचविली.ते कधी व्यासपीठावर तर कधी भक्तांमध्ये येऊन भजन गात होते,तेव्हा भक्तही त्यांच्यासोबत तल्लीन होऊन नाचत होते.दिल्ली येथील सर्व १६ कलावंतांनी सादर केलेल्या नृत्य नाटिका अर्थात झाकिया यांनी सर्वांची मने जिंकली.कृष्ण सुदामा,राधा कृष्ण रास, मा दुर्गा,महाकाली आदी नाटिका सादर करत सर्वांची वाहवा मिळविली.
    सोलापूरकरांसाठी प्रथमच भारतातील पहिल्या थ्रीडी ऍनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्सचा अनुभव घेता आला.डायनसोर,हत्ती,सिंह,मासे,अंतरिक्ष ग्रह यासह विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.सोलापूरकरांनी या अनिमेशन कार्यक्रमाला अक्षरशः डोक्यावर घेतले. रात्री स्वतः महोत्सवाचे अध्यक्ष ब्रिजमोहन फोफालिया भक्तिरसात न्हाऊन गेले होते.त्यांनी खूप वेळ भक्तांसोबत नाचून आनंद लुटला.
-----------------------------------------------------------
चौकट - सोलापूरकरांचे कायम ऋणी ----
सोलापूरकरांनी धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सेवा करण्याचे भाग्य आपणास मिळत असल्याबद्धल सामुदायिक विवाहाचे प्रणेते ब्रिजमोहन फोफालिया यांनी सोलापूरकरांचे ऋण व्यक्त केले.आपला कोणताही कार्यक्रम असला की सोलापूरकरसुद्धा हा आपलाच कार्यक्रम समजून परिवारासारखे सहभागी होतात याचा आपणास मनोमन आनंद वाटतो.सोलापूरकर उदंड प्रेम देतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळत असल्यामुळे आपल्याला कार्यक्रम घेण्यासाठी ऊर्जा मिळते.सोलापुरकारांच्या सेवेचे ऋण आपण कधीही विसरू शकत नाही.सोलापूर हे धार्मिक पर्यटनस्थळ आहे.ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज,ग्रामदेवता रूपा भवानी यासह अन्य देवदेवतांच्या सान्निध्यात राहण्याचे आपल्याला भाग्य लाभले आहे.आणि याच सोलापूर नगरीत आयोजित केलेल्या दोन दिवसीय श्याम वंदना महोत्सवाला सोलापूरसह अन्य राज्यातील भाविकांनी उपस्थिती दर्शवून हजेरी लावली त्याबद्धल त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत.त्यामुळे जीवात जिवमान असेपर्यंत सोलापूरकरांची सेवा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे समाजसेवक ब्रिजमोहन फोफालिया यांनी सांगितले.सोलापूरकरांच्या सहयोगामुळे हा धार्मिक सोहळा पार पडला आहे,सोलापूरकर भक्तांनी अशीच सेवा चालू ठेवावी असे आवाहनही ब्रिजमोहन फोफालिया यांनी केले आहे.सोलापुरात आपण कायमच विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी दिली आहे.सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून अनेकांचे संसार उभारले आता सोलापूरकरांची धार्मिक भूक भागविण्याचा प्रयत्न करत आहे.पर्ल गार्डन येथे आयोजित दोन दिवसीय सोहळ्याने सार्थक झाल्याचे समाधान वाटत आहे.सोलापूरकरांना नतमस्तक होतो अशा शब्दात समाजसेवक ब्रिजमोहन फोफालिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
---------------------------------------------------------
 चौकट - सोहळा यशस्वी करण्यासाठी 
हजारो  हात राबले -----
श्याम वंदना महोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी हजारो हात राबले.ज्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते,महिला मंडळ,कार्यकर्ते,सामाजिक संघटना,भजनी मंडळ,लोकप्रतिनिधी, समाजबांधव, प्रजापती ब्रम्हाकुमारी,राजस्थानी समाज,इस्कॉन,वारकरी संप्रदाय, पध्मशाली समाजातील पंतुलु यासह पर्ल गार्डन परिवार,पोलीस प्रशासन,महापालिका परिवहन विभाग तसेच सामान्य कार्यकर्त्यांनी केलेल्या सेवेमुळे धार्मिक सोहळा नेटकेपणाने पार पडला.विशेषतः गोपाल खंडेलवाल यांनी परिश्रम घेतले.या सर्वांचे समाजसेवक ब्रिजमोहन फोफालिया यांनी आभार मानले आहेत.
---------------------------------------------------------चौकट - पाच हजार भक्तांना महाप्रसाद - 
फोफलिया परिवारातर्फे आयोजित करण्यात येणार कोणताही कार्यक्रम महाप्रसादाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही.मोठा आयोजित केल्यानंतर त्यातील समारोपाच्या दिवशी भाविकांना महाप्रसाद देण्याचे पुण्य काम फोफलिया परिवार अनेक वर्षांपासून करत आहे.पर्ल गार्डन येथे रविवारी दिवसभर आणि रात्रीपर्यंत चाललेल्या सोहळ्यानंतर आणि मध्यंतरास सुमारे ५ हजाराहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा मनसोक्त लाभ घेतला.
-----------------------------------------------------------
एहसान मेरे दिल पे आपका है दोसतो 
ये दिल आपके प्यार का मारा है दोसतो
बनता है मेरा काम आपके ही काम से
होता है मेरा नाम आप हे साथ से
आप जैसे मेहेरबान का सहारा है दोसतो
जब आ पडा है कोई भी मुश्किल का रास्ता
आपने दिया है मुझे प्यार भरा वासता
हर हाल मे अपको ही पुकारा है दोसतो
आपने मेरे वासते क्या कुछ नहीं किया
सौ बार नमन , सौ बार प्रणाम
--------------------------------------------------------
* समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया यांच्या नेतृत्वाखालील नेटक्या नियोजनाचे कौतुक
* हजारो भाविक मात्र कोठेही व्यत्यय नाही
* सोलापूरसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची सोलापुरात मांदियाळी
* सिद्धेश्वर महाराज,गणपती,हनुमान,श्रीकृष्ण यासह खाटू श्यामजी महाराजांच्या मंदिरातील मूर्ती लक्षवेधी
* आंतरराष्ट्रीय भजन सम्राटांची भक्तांवर मोहिनी
* थ्रीडी इफेक्ट्सच्या माध्यमातून मंदिर दरबारात रंगला थरार
* झं।कियाच्या माध्यमातून सादर झालेल्या कलांना सोलापूरकरांची उत्स्फूर्त दाद
* संपूर्ण मैदानावरील हिरव्या गालिच्यावर हजारो भक्तांची मांदियाळी
* बोलो खाटू श्याम बाबा की जय च्या जयघोषाने आसमंत दुमदुमला
* श्याम वंदना महोत्सव शहराच्या बाहेर असूनही
 भक्तांच्या दुपारपासून रांगाच रांगा
* समाजसेवक ब्रिजमोहन फोफालिया यांच्यासाठी हजारो लोकांची सेवा





























No comments:

Post a Comment