Monday, March 11, 2019

ब्रिजधाम आश्रम येथे शांतवीर भजनी मंडळ यांचा “भजन संध्या” कार्यक्रम










ब्रिजधाम आश्रम येथे शांतवीर भजनी मंडळ यांचा “भजन संध्या” कार्यक्रम  
                सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य हिरवळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी रविवार दि १०  मार्च  २०१९ रोजी सायंकाळी   वाजता शांतवीर   भजनी मंडळ, कोंगाड, कुंभार गल्ली लष्कर  यांच्यावतीने भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले  होते.  या कार्यक्रमामध्ये भजन, गवळण, भारुड, अभंग  कार्यक्रम सादर करण्यात आला. भजनी मंडळातील कलाकारांनी मराठी  व कन्नड  भजनगीत ज्येष्ठ नागरिकांसमोर सादर करून प्रशंसा मिळवली. सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनी या भजन संध्येत मंत्रमुग्ध झाले.   
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली  त्यानंतर “ दर्शन दे रे श्रीहरी ...”  या भजनाने करण्यात  आली. “कोण्या जन्माची का ग वैरीण झालीस, बंधू रामाला तू वनवासी धाडिली   .....”  “ पधारो अब तो राधे श्याम...”  “राधा तेरे चरणो मे श्यामा तेरी चरणो में .....”, “सुख दुःखाचा जिथे चालतो ते हि मंदिर पार अनुभवला संसार  ....”, “ गाडी चालली घुंगराची बात बाई डोंगराची ....”, “ पदर असा माझा ओढू नको भरला घडा माझा फोडू नको....”, “ सिद्धाराम द्या सागरा .... ( कन्नड मध्ये ) ”, “ भर दिवस दुपारी शोधून गेला हरी ...”, “ एक दोन तीन चार आला पंढरीचा वार ...”, “देव नू वंदे यल्ली  इरवरू ...- ( कन्नड मध्ये ) ”, “ ये भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, बेलाच्या पानांची .....”, “ धाव धाव स्वामी समर्था आलो मी तुला शरण आलो...”, अशा प्रकारे एकापेक्षा एक भावगीत, भक्तीगीत सादर करून ज्येष्ठ नागरीकांना प्रबोधनाची मेजवानी दिली.  प्रसंगी मल्लेश पेट्टी – हार्मोनियम , रायडू म्हेत्रे – पकवाज, दशरथ सज्जन व मल्लेश बागलकर – दुमडी वादक, राजू पेट्टी – झांज या कलाकारांनी गायक कलाकारांना साथ दिली.
त्यानंतर व्यंकटेश गवंडी समाज सोलापूर महिला मंडळ यांनी क्रांती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून महिला दिनानिमित्त मंडळाचे अध्यक्ष सौ. सुरेखा चंचलकर यांनी व त्यांच्या पदाधिकारी तर्फे शिंदे ताई , कमल पवार, अनुसुया रणसुबे, पुष्पा ताई, निकिता गोरे, अमृता चेतावली यांचा श्रीफळ व हार शाल देवून सत्कार करण्यात आला.व ब्रिजमोहन फोफलीया यांनी भाषण करताना म्हणाले कि या महिलांचे कार्य कौतुकास्पद आहे व त्यांनी यापुढे असेच कार्य करत रहावे. अशा शुभेच्छा दिल्या.
   तद प्रसंगी श्री रघुवीर शिराळकर ( पुण्यनगरी उप संपादक) यांनी श्री ब्रिजमोहनजी फोफलिया यांचा सत्कार केला.  
          कार्यक्रमाच्या शेवटी  ब्रिजमोहन फोफलिया यांनी सर्व कलाकारांचा सत्कार केला. व  सर्वांचे आभार मानले आणि  कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment