Monday, April 9, 2018

ब्रिजधाममध्ये “स्वर उत्सव” चे आयोजन

ब्रिजधाममध्ये “स्वर उत्सव” चे आयोजन  
सोलापुर : सोरेगाव येथील ब्रीजधाम आश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी अशोक चोळळे व त्याची टीम कलाकार यांचा “स्वर उत्सव” मनोरंजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कर्यक्रमात नवीन व जुनी हिंदी व मराठी गीतांचा समावेश होता.
     कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना “एक दन्ताय वक्रतुंडाय” या गाण्यावर आकांक्षा वाडे हिच्या कत्थक नृत्याने करण्यात आली. त्यानंतर सुमित चोळळे यांनी “शोधीशी मानवां राहुळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी” हे सदाबहार गाणे सादर केले. “ आने से उसकी आयी बहार, जानेके उसके जाये बहार.....”, “अब मुझे रात दिन तुम्हारा ही ख्याल है क्या कहूँ प्यार में दीवानों जैसा हाल हैदीवानों जैसा हाल है तुम्हारा ही ख्याल है” सोनू निगमच्या दिवाना या अल्बमच्या गाण्यांनी ज्येष्ठ नागरिकांची मने जिंकली. “ ऐसे ना मुझे तुम देखो सीनेसे लगा लुंगा तुमको मे चुरा लुंगा....”, “ जब से तेरे नैना मेरे नैनो सें लागे, तब से दिवाना हुआ, सबसे बेगाना हुआ रब भी दिवाना लागे रें..” , “ चेहरा है या चाँद खिला है, जुल्फ घनेरी शाम है क्या, सागर जैसी आँखोवाली  ये तो बता तेरा नाम है क्या....”, “ तेरा नाम है क्या ....” , “ कहना है कहना हैं आज ये तुमसे  पहेली बार, तुम हि तो लई हो जीवन मे मेरे प्यार, प्यार, प्यार...”, “ वादिया मेरा दामन, रस्ते मेरी बाहे, जावो मेरे सिवा, तुम कहाँ जाओगे...”  अशा अनेक सदाबहार  मराठी, हिंदी, कन्नड गाणी सादर करून ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज कोडमूर यांनी केले.             
     कार्यक्रमाच्या शेवटी आकांक्षा वाडे हिने शिव तांडव नृत्य कत्थक नृत्यात सादर केले.     श्री.ब्रिजमोहनजी फोफलीया यांच्या हस्ते सर्व कलाकारांना भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला. आणि कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संखेने उपस्थितीत होते.

No comments:

Post a Comment