सोलापूर/ प्रतिनिधी
समाजकार्य करण्याची संधी सवांर्ना मिळत असते. पण कोणी समाज कार्य करत नाही.मात्र ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया यांच्यामध्ये समाजाच्या प्रति उदारभाव आहे. ते परिवारापेक्षा जास्त वेळ समाजकार्याला देत असतात. त्यामुळेच मुंबईची संस्था सोलापुरात येवून त्यांना पुरस्काराने सन्मानित करते. ब्रिजमोहन फोफलिया यांना पुरस्कार मिळणे हे सोलापूरकरांचे भाग्य आहे, असे प्रतिपादन होटगी मठाचे डॉ. मल्लिकार्जून महास्वामीजी यांनी केले.
नेताजी चंद्रदत्त पुरोहित स्मृती संस्थान मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा स्वातंत्र्य सेनानी चंद्रदत्त पुरोहित राष्ट्रीय पुरस्कार सोलापूरचे सामूहिक विवाहाचे प्रणेते ब्रिजमोहन फोफलिया यांना डॉ. मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामीजींच्या हस्ते मंगळवारी सम्राट चौकातील त्यांच्या राधेे राधे निवासस्थानी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पुरोहित उपस्थित होते.
मांन्यवरांच्या हस्ते ब्रिजमोहन फोफलिया यांचा चंद्रदत्त पुरोहित राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, रोख 5,100 रुपये रोख असे या पुरस्काराच स्वरूप आहे. श्री.राजदत्त पुरोहित यांनी सोलापूर येथे येयुन श्री.फोफालिया यांच्या कार्याचे कौतिक पुरस्कार देऊन केले त्यामुळे त्यांचा हि सत्कार महास्वमिजींच्या हस्ते करण्यात आला.
महास्वामी पुढे म्हणाले, फोफलिया यांनी कुठलेही सामाजिक काम करतो असे सांगत नाहीत तर ते काम करतात पण ते केल्याचे सांगत नाहीत.हेच त्यांच्या सामाजिक कार्याचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्यामुळे अनेकांचे संसार थाटले आहेत. सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखे त्यांचे व्यक्तीमत्व आहे. त्यांनी निस्वार्थी भावनेने काम केले आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई काडादी म्हणाल्या, हा पुरस्कार फोफलिया यांना मिळाला, हे खरे तर सोलापूरकरांचे भाग्य आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
यावेळी प्रा. नसिमा पठाण म्हणाल्या, थेंबापासून त्यांनी समाजकार्यांची सुरूवात केली पण आज या थेंबाचे रुपांतर समुद्रामध्ये झाले आहे. ब्रिजमोहन फोफलिया हे नाव नसून एक तत्वज्ञानी विचार आहे.
सत्काराला उत्तर देताना ब्रिजमोहन फोफलिया म्हणाले, हा पुरस्कार जेव्हा मला जाहीर झाला, तेव्हा मलाही खूप आनंद झाला. पण मी आरोग्याच्या कारणामुळे येणार नाही, असे सांगितले. पण संस्थेने हा पुरस्कार सोलापुरात येऊन दिला. याबद्दल संस्थेचे मी आभार मानतो. आणि हा पुरस्कार मला महास्वामींच्या हस्ते मिळाला हे तर माझे भांग्यच समजतो. 1991 पासून मी सामुदायिक विवाह सोहळ्यांची सुरवात केली. अनेक शेतकर्यांच्या मुलांचे विवाह माझ्याकडून घडले, हे सर्व साधू संताच्या आशीर्वादामुळे घडले.
सूत्रसंचालन महावीर पुरोहित यांनी केले. यावेळी आयडल स्कूलच्या वतीने सचिन चव्हाण यांनी फोफलिया यांचा सत्कार केला. याच बरोबर जेष्ठ नागरीक संघासह अनेक संघटनांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राजवल्लभ जाजू, युवराज चुंमबळकर, श्रीकिशन लाहोेटी, हेमू चंदले, काशिनाथ भतगुणकी, पद्माकर कुलकणर्ी, प्रकाश शिंदे, अतुल धुमाळ, नलिनी चंदले, सत्यनाराण फोफलिया, प्रकाश मर्दा, राजाराम उपाध्ये, गोपाल मंत्री, राजद्र कलंत्री, किशोर चंडक, गिरीष चंडक, शाम पाटील, लालसिंग रजपूतयांची प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment