Monday, April 9, 2018

ब्रिजधाममध्ये “स्वर उत्सव” चे आयोजन

ब्रिजधाममध्ये “स्वर उत्सव” चे आयोजन  
सोलापुर : सोरेगाव येथील ब्रीजधाम आश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी अशोक चोळळे व त्याची टीम कलाकार यांचा “स्वर उत्सव” मनोरंजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कर्यक्रमात नवीन व जुनी हिंदी व मराठी गीतांचा समावेश होता.
     कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना “एक दन्ताय वक्रतुंडाय” या गाण्यावर आकांक्षा वाडे हिच्या कत्थक नृत्याने करण्यात आली. त्यानंतर सुमित चोळळे यांनी “शोधीशी मानवां राहुळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी” हे सदाबहार गाणे सादर केले. “ आने से उसकी आयी बहार, जानेके उसके जाये बहार.....”, “अब मुझे रात दिन तुम्हारा ही ख्याल है क्या कहूँ प्यार में दीवानों जैसा हाल हैदीवानों जैसा हाल है तुम्हारा ही ख्याल है” सोनू निगमच्या दिवाना या अल्बमच्या गाण्यांनी ज्येष्ठ नागरिकांची मने जिंकली. “ ऐसे ना मुझे तुम देखो सीनेसे लगा लुंगा तुमको मे चुरा लुंगा....”, “ जब से तेरे नैना मेरे नैनो सें लागे, तब से दिवाना हुआ, सबसे बेगाना हुआ रब भी दिवाना लागे रें..” , “ चेहरा है या चाँद खिला है, जुल्फ घनेरी शाम है क्या, सागर जैसी आँखोवाली  ये तो बता तेरा नाम है क्या....”, “ तेरा नाम है क्या ....” , “ कहना है कहना हैं आज ये तुमसे  पहेली बार, तुम हि तो लई हो जीवन मे मेरे प्यार, प्यार, प्यार...”, “ वादिया मेरा दामन, रस्ते मेरी बाहे, जावो मेरे सिवा, तुम कहाँ जाओगे...”  अशा अनेक सदाबहार  मराठी, हिंदी, कन्नड गाणी सादर करून ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज कोडमूर यांनी केले.             
     कार्यक्रमाच्या शेवटी आकांक्षा वाडे हिने शिव तांडव नृत्य कत्थक नृत्यात सादर केले.     श्री.ब्रिजमोहनजी फोफलीया यांच्या हस्ते सर्व कलाकारांना भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला. आणि कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संखेने उपस्थितीत होते.

Saturday, April 7, 2018

फोफलिया निस्वाथर्ी मनाने काम करतात - डॉ. मल्लिकार्जून महास्वामी ब्रिजमोहन फोफलिया स्वा. सेनानी चंद्रदत्त पुरस्काराने सन्मानित

सोलापूर/ प्रतिनिधी
       समाजकार्य करण्याची संधी सवांर्ना मिळत असते. पण कोणी समाज कार्य करत नाही.मात्र ज्येष्ठ  समाजसेवक ब्रिजमोहन  फोफलिया यांच्यामध्ये  समाजाच्या प्रति उदारभाव आहे. ते परिवारापेक्षा जास्त वेळ समाजकार्याला देत असतात. त्यामुळेच मुंबईची संस्था सोलापुरात येवून त्यांना पुरस्काराने सन्मानित करते. ब्रिजमोहन फोफलिया यांना पुरस्कार मिळणे हे सोलापूरकरांचे भाग्य आहेअसे प्रतिपादन होटगी मठाचे डॉ. मल्लिकार्जून महास्वामीजी यांनी  केले. 
 नेताजी चंद्रदत्त पुरोहित स्मृती संस्थान मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा स्वातंत्र्य सेनानी चंद्रदत्त पुरोहित राष्ट्रीय पुरस्कार सोलापूरचे सामूहिक विवाहाचे प्रणेते ब्रिजमोहन फोफलिया यांना डॉ. मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामीजींच्या हस्ते मंगळवारी सम्राट चौकातील त्यांच्या राधेे राधे निवासस्थानी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पुरोहित उपस्थित होते. 
 मांन्यवरांच्या हस्ते ब्रिजमोहन फोफलिया यांचा चंद्रदत्त पुरोहित राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शालश्रीफळसन्मानचिन्हरोख 5,100 रुपये रोख असे या पुरस्काराच स्वरूप आहे.  श्री.राजदत्त पुरोहित यांनी सोलापूर येथे येयुन श्री.फोफालिया यांच्या कार्याचे कौतिक पुरस्कार देऊन केले त्यामुळे त्यांचा हि सत्कार महास्वमिजींच्या हस्ते करण्यात आला. 
       महास्वामी पुढे म्हणालेफोफलिया यांनी कुठलेही सामाजिक काम करतो असे सांगत नाहीत तर ते काम करतात पण ते केल्याचे सांगत नाहीत.हेच त्यांच्या सामाजिक कार्याचे वैशिष्ट्य आहे.  त्यांच्यामुळे अनेकांचे संसार थाटले आहेत. सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखे त्यांचे व्यक्तीमत्व आहे. त्यांनी  निस्वार्थी भावनेने काम केले आहे. 
 यावेळी सामाजिक कार्यकर्त्या  सिंधूताई काडादी म्हणाल्याहा पुरस्कार फोफलिया यांना मिळालाहे खरे तर सोलापूरकरांचे भाग्य आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
  यावेळी प्रा. नसिमा पठाण म्हणाल्याथेंबापासून त्यांनी समाजकार्यांची सुरूवात केली पण आज या थेंबाचे रुपांतर समुद्रामध्ये झाले आहे. ब्रिजमोहन फोफलिया हे नाव नसून एक तत्वज्ञानी विचार आहे. 
 सत्काराला उत्तर देताना ब्रिजमोहन फोफलिया म्हणालेहा पुरस्कार जेव्हा मला जाहीर झालातेव्हा मलाही खूप आनंद झाला. पण मी आरोग्याच्या कारणामुळे येणार नाहीअसे सांगितले. पण संस्थेने हा पुरस्कार सोलापुरात येऊन दिला. याबद्दल संस्थेचे मी आभार मानतो. आणि हा पुरस्कार मला महास्वामींच्या हस्ते मिळाला हे तर माझे भांग्यच समजतो. 1991 पासून मी सामुदायिक विवाह सोहळ्यांची सुरवात केली. अनेक शेतकर्‍यांच्या मुलांचे विवाह माझ्याकडून घडलेहे सर्व साधू संताच्या आशीर्वादामुळे घडले. 
        सूत्रसंचालन महावीर पुरोहित यांनी केले. यावेळी आयडल स्कूलच्या वतीने सचिन चव्हाण यांनी फोफलिया यांचा  सत्कार केला. याच बरोबर जेष्ठ नागरीक संघासह अनेक संघटनांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. 
 यावेळी राजवल्लभ जाजूयुवराज चुंमबळकरश्रीकिशन लाहोेटीहेमू चंदलेकाशिनाथ भतगुणकीपद्माकर कुलकणर्ीप्रकाश शिंदेअतुल धुमाळनलिनी चंदलेसत्यनाराण फोफलियाप्रकाश मर्दाराजाराम उपाध्येगोपाल मंत्रीराजद्र कलंत्रीकिशोर चंडकगिरीष चंडकशाम पाटीललालसिंग रजपूतयांची प्रमुख उपस्थिती होती. 

योगगुरु रामदेवबाबा का ८ दिन, योग शिबीर का आयोजन- आयोजक- ब्रिजमोहन फोफलिया

'स्वतंत्रता सेनानी चंद्रदत्त पुरोहित राष्ट्रीय पुरस्का से श्री.बृजमोहन...

राधाकृष्ण महाराजद्वारा ३ दिन "नानीबाई का मायरा" कार्यक्रम संपन्न-२०११

सामाजिक कार्यकर्ते सामुदायिक विवाहाचे प्रणेते श्री.ब्रिजमोहनजी फोफलिया य...

सोलापूर मे संचारबंदी के समय ' अन्नक्षेत्र ' का आयोजन - सन २००२

राधाकृष्ण महाराजद्वारा ३ दिन "नानीबाई का मायरा" कार्यक्रम संपन्न-२०११