ब्रिजधाम आश्रम सोरेगाव मध्ये काव्य मैफील संपन्न
सोलापूर – ब्रिजधाम आश्रम
सोरेगाव येथे दि. ४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता काव्य मैफील आयोजित करण्यात आली
होती. या काव्य मैफिलीत गझलकार श्री.कालिदास चवडेकर, कवी श्री.आनंद घोडके,
कवियत्री वर्षा सरवदे, कवी प्रा.नवनाथ पाटोळे, कवीयत्री अपर्णा पटणे, कवी
श्री.शहाजी कांबळे आदि कवींनी सहभाग
नोंदवला होता, या मैफिलीत जेष्ठ नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
कवी कालिदास चौडेकर यांनी
हास्य गझल सादर करून श्रोत्यांना पोटधरून हसाय लावले. त्यांनी आपल्या कवितेतून
महागाईला कंटाळून, नवऱ्याशी भांडणारी श्रीची व्यथा सांगितली, ते म्हणतात,
प्राण नाथा वाढवून द्या ना माझाही भत्ता
इतक्या पैश्यामध्ये मिळेना सादा कडीपत्ता
ताळमेळ लागेना कोठे ह्या खर्चाचा
डोक्याचा तर झाला आता नुसता खलबत्ता
कवी कालिदास हे हजलकार
म्हणून प्रशिद्ध आहेत, त्यांनी आपल्या दुसऱ्या कवितेतून बायकोला माहेरी सोडून
आल्यावर होणारा आनंद आणि दुख: याचे हाश्य चित्रण केले. ते म्हणतात,
हवेवर स्वार झालो मी हिला सोडून आल्यावर
सुखाने ठार झालो मी हिला सोडून आल्यावर
डबे शोधून थकलो मी, रिकामे वाजती ठणठण
उपाशी घार झालो मी हिला सोडून आल्यावर
कवी आनंद घोडके यांनी
आपल्या कवितेतून मोबाईल, इंटरनेटच्या जमान्यात आई बापाचं मुलावर दुर्लक्ष होत
असल्याचे सांगितले. ते म्हणतात
पाप्पाचे फेसबुक
आईचा व्हॉटसअप
दोगेही ऑनलाइन
मी मात्र चीडीचीप
नास्ता, जेवण खेळणे
बागडनेही ऑनलाइन
देवा पांडुरंगा तू तरी
आहेस कारे ऑफलाइन
आपल्या दुसऱ्या कवितेतून
कवी आनंद घोडके यांनी विठ्ठलाचा महिमा सांगितला, ते म्हणतात,
भूवैकुंठी विसावला
माझा विठ्ठल सावळा
करी पापाचे क्षालन
देई पुंण्याचे आंदन
कवी प्रा.नवनाथ पाटोळे
यांनी, आपल्या कवितेतून सर्व वृद्धाना तारुण्यात घेऊन गेले. ते म्हतात,
आठवते मला तुझी पहिली भेट
तुझ्या मृगनयनांनी घायाळ केले
सिहसम कटीमधून तू मला
यौवनात उतरवले.
आता मात्र जीवाला
मोडून पडल्यासारखं वाटतंय
तुझ्या आठवणीन म्हातारपण
कसं खायला उठताय
कवियत्री अपर्णा पटणे
यांनी आपल्या कवितेतून बाल वयातील ,
बालप्रेमाचे वर्णन केले त्या म्हणतात,
मी खेळतअसायचो अंगणात
आणि ऐकू यायचे तुझेपैजण
फुले तोडायला यायची तू
आणि तोडून न्यायची माझे मन
कवी शहाजी कांबळे यांनी,
आपल्या कवितेतून मनात साठून राहिलेल्या जखमा कधीच कधीच डिलीट होत नाहीत . हे
सांगितले, ते म्हणतात
विसरायचं सार, विसरायचं म्हणून विसरता येतं का ?
झाकल्या जखमा जरी,
वेदना थांबतात का ?
हसायचं किती खोटं खोटं, हसण्यालाच वाटते लाज
हसून गाईले गीत आसवांचे, असावे कधी हसतात का
कवी शहाजी कांबळे यांनी
आपल्या दुसऱ्या कवितेतून, बाळाला बांधावर झोळीत टाकून काम करणाऱ्या आईचे वर्णन
करून उपस्थितांची मने जिंकली, ते म्हणतात
तान्ह बाळ वटीला
नाही भाकर पोटाला,
पदर खोचून माय
गाठ घालते कामाला
गाय उपाशी रिकामी कास
काय दोष त्या वासराचा
थकल्या मायीला पाहून बाळ
गाली खुदकन हसायचा
कवियत्री वर्षा सरवदे
यांनी आपल्या दुसऱ्या कवितेतून, श्री शक्तीचा जागर केला आहे, त्या म्हणतात
जननी म्हणजे श्री म्हणे
स्वर्गा पेक्षा महान
रोज तिला छळताना
विवेक ठेवता का गहाण
जिच्या उदरी जन्म घेतला
विटाळ तिचाच होतो
देवालयी पुजारी सुद्धा
दार लोटून घेतो
कवियत्री वर्षा सरवदे
यांनी आपल्या कवितेतून पहिल्या पावसाचे वर्णन, त्या आपल्या कवितेतून म्हणतात,
पाऊस आज पहिला, आला नभात तेव्हा
ओसंडल्या जलधारा मनात तेव्हा
आसुसली धरा हि , भेटीस साजनाच्या
मेघात पावसाची, सजली वरात तेव्हा
वर्षा सरवदे यांनी
पावसाची कविता सादर केली आणि खरोखरच , ढगात गडगडत सुरु झाला, ब्रिजधाम आश्रमातील
हिरवळ पावसाच्या आगमनाने अधिकच हिरवळ दिसत होती. ढगांचा गडगडत , कवीचे शब्द फुले,
बहरलेली हिरवळ, यामुळे काव्य मैफील अधिकच
रंगली, जेष्ठ नागरिकांनी मैफिलीचा मनमुराद आनंद घेतला. उपस्थित सर्व कवींचा
मा.श्री ब्रिजमोहन फोफलीया यांच्या हस्ते
हार, आभार पत्र देऊन सन्मान करण्यात आला. श्री नागेश खामिकर यांनी या
मैफिलीचे सूत्र संचालन केले.
No comments:
Post a Comment