Friday, March 30, 2018
Tuesday, March 20, 2018
ब्रिजधाम आश्रम येथे “अनुभवा मंटप्पा” नाटकाचे सादरीकरण
ब्रिजधाम आश्रम येथे “अनुभवा मंटप्पा” नाटकाचे सादरीकरण
सोलापूर : सोरेगाव ब्रिजधाम आश्रम येथील निसर्गरम्य ठिकाणी जेष्ठ नागरीकांसाठी शंकरलिंग महिला मंडळ यांनी अक्क्मादेवी यांच्या जीवनावरील “अनुभवा मंटप्पा” हे नाटक सादर केले. हे नाटक कन्नड भाषेतून सादर करण्यात आले.
या नाटकात प्रमुख भूमिका करणारे कलाकार पुढीलप्रमाणे आहेत.अक्कमहादेवी -राजश्री थलंगे , अल्लमा प्रभू –मीनाक्षी बागलकोटे, बसवप्पा- महादेवी हलकुडे, चन्नबसवप्पा – प्रियांका बागलकोटे, सिद्धराम – लता घनशेट्ठी , अक्कनागम्मा – इंदुमती हिरेमठ, निलांबिका – गिरीजा थलंगे, गंगाभिका -- कस्तुरा बागलकोटी, माडीव माचय्या – मीनाक्षी थलंगे
कार्यक्रमाची सुरुवात प्रथम श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराची प्रार्थना ॐ नम: शिवाय ने करण्यात आली. इ.स. १२ पूर्वीची घटना अक्कमहादेवी व चन्नमल्लिकार्जुन विषयी प्रार्थना केली. असे प्रसंग सादर करण्यात आले. एका जंगलात जावून चन्नमल्लिकार्जुनची प्रार्थना करताना सर्वस्वी समर्पण करते.शिष्य अक्क्महादेवीस “अनुभवा मंडप” कडे येण्यास सांगितले. अक्कमहादेवी चा जयजयकार करतात. सर्व शरण समूह अक्कम्हदेविला नमस्कार करतात.असा घटना नाटकातून दाखविण्यात आल्या.
बाराव्या शतकातील महान संत, कवयित्री आपल्या वचन साहित्यातून विश्वाला शांती संदेश व गुरु महिमा भक्तीतून जीवन उद्धार करून अक्क्मादेवी हे नाव जगात केलेल्या महादेवीचे जीवनातील घटना सादर केल्या.महात्मा बसवेश्वर स्थापित अनुभव मंडपात ७७ शरणी व ७०० शरण होते. त्यामध्ये अक्क्मादेवी यांचे कार्य व त्यांनी लिहिलेले वचन साहित्य जगाला प्रेरणा देणारे आहे. गुरु महिमा, गुरुभक्ती व त्यागमय जीवन जगून महादेवी यांनी सर्वांची अक्क (बहीण) म्हणून कीर्ती मिळवली होती.
विशेषतः सर्व भूमिका महिला कलाकारांनी सादर केल्या आहेत. सर्व ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन करण्यात आले. शेवटी ब्रिजमोहन फोफलिया यांनी सर्व कलाकारांचे कौतुक केले.

Wednesday, March 14, 2018
फोफलिया निस्वार्थी काम करतात - डॉ. मल्लिकार्जून महास्वामी , ब्रिजमोहन फोफलिया स्वा. सेनानी चंद्रदत्त पुरस्काराने सन्मानित
सोलापूर/ प्रतिनिधी
समाजकार्य करण्याची संधी सवांर्ना मिळत असते. पण कोणी समाज कार्य करत नाही.मात्र ज्येष्ठ समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया यांच्यामध्ये समाजाच्या प्रति उदारभाव आहे. ते परिवारापेक्षा जास्त वेळ समाजकार्याला देत असतात. त्यामुळेच मुंबईची संस्था सोलापुरात येवून त्यांना पुरस्काराने सन्मानित करते. ब्रिजमोहन फोफलिया यांना पुरस्कार मिळणे हे सोलापूरकरांचे भाग्य आहे, असे प्रतिपादन होटगी मठाचे डॉ. मल्लिकार्जून महास्वामीजी यांनी केले.
नेताजी चंद्रदत्त पुरोहित स्मृती संस्थान मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा स्वातंत्र्य सेनानी चंद्रदत्त पुरोहित राष्ट्रीय पुरस्कार सोलापूरचे सामूहिक विवाहाचे प्रणेते ब्रिजमोहन फोफलिया यांना डॉ. मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामीजींच्या हस्ते मंगळवारी सम्राट चौकातील त्यांच्या राधेे राधे निवासस्थानी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पुरोहित उपस्थित होते.
मांन्यवरांच्या हस्ते ब्रिजमोहन फोफलिया यांचा चंद्रदत्त पुरोहित राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, रोख 5,100 रुपये रोख असे या पुरस्काराच स्वरूप आहे. श्री.राजदत्त पुरोहित यांनी सोलापूर येथे येयुन श्री.फोफालिया यांच्या कार्याचे कौतिक पुरस्कार देऊन केले त्यामुळे त्यांचा हि सत्कार महास्वमिजींच्या हस्ते करण्यात आला.
महास्वामी पुढे म्हणाले, फोफलिया यांनी कुठलेही सामाजिक काम करतो असे सांगत नाहीत तर ते काम करतात पण ते केल्याचे सांगत नाहीत.हेच त्यांच्या सामाजिक कार्याचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्यामुळे अनेकांचे संसार थाटले आहेत. सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखे त्यांचे व्यक्तीमत्व आहे. त्यांनी निस्वार्थी भावनेने काम केले आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई काडादी म्हणाल्या, हा पुरस्कार फोफलिया यांना मिळाला, हे खरे तर सोलापूरकरांचे भाग्य आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
यावेळी प्रा. नसिमा पठाण म्हणाल्या, थेंबापासून त्यांनी समाजकार्यांची सुरूवात केली पण आज या थेंबाचे रुपांतर समुद्रामध्ये झाले आहे. ब्रिजमोहन फोफलिया हे नाव नसून एक तत्वज्ञानी विचार आहे.
सत्काराला उत्तर देताना ब्रिजमोहन फोफलिया म्हणाले, हा पुरस्कार जेव्हा मला जाहीर झाला, तेव्हा मलाही खूप आनंद झाला. पण मी आरोग्याच्या कारणामुळे येणार नाही, असे सांगितले. पण संस्थेने हा पुरस्कार सोलापुरात येऊन दिला. याबद्दल संस्थेचे मी आभार मानतो. आणि हा पुरस्कार मला महास्वामींच्या हस्ते मिळाला हे तर माझे भांग्यच समजतो. 1991 पासून मी सामुदायिक विवाह सोहळ्यांची सुरवात केली. अनेक शेतकर्यांच्या मुलांचे विवाह माझ्याकडून घडले, हे सर्व साधू संताच्या आशीर्वादामुळे घडले.
सूत्रसंचालन महावीर पुरोहित यांनी केले. यावेळी आयडल स्कूलच्या वतीने सचिन चव्हाण यांनी फोफलिया यांचा सत्कार केला. याच बरोबर जेष्ठ नागरीक संघासह अनेक संघटनांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राजवल्लभ जाजू, युवराज चुंमबळकर, श्रीकिशन लाहोेटी, हेमू चंदले, काशिनाथ भतगुणकी, पद्माकर कुलकणर्ी, प्रकाश शिंदे, अतुल धुमाळ, नलिनी चंदले, सत्यनाराण फोफलिया, प्रकाश मर्दा, राजाराम उपाध्ये, गोपाल मंत्री, राजद्र कलंत्री, किशोर चंडक, गिरीष चंडक, शाम पाटील, लालसिंग रजपूतयांची प्रमुख उपस्थिती होती.
Wednesday, March 7, 2018
Monday, March 5, 2018
ब्रिजधाम आश्रम भक्तिरसात रंगले
ब्रिजधाम आश्रम भक्तिरसात रंगले
सोलापुर : सोरेगाव
येथील ब्रीजधाम आश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रीमती कांबळे (गायिका) व त्याची वाघ्यामुरळी पार्टी
यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व रंगपंचमीचे औचित्य साधून भक्तीमय वातावरणात ज्येष्ठ नागरिकांनी गुलाल व रंगाची उधळून करून
रंगपंचमीचा आनंद घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश स्तवनाने करण्यात
आली. त्यानंतर खंडोबा, अंबाबाई, काळूबाई या देवी देवतांचे भजन सादर करण्यात
आले. “ अहो धनी मी सांगू व्यथा कुणाला...
अंबाबाई आता मी सांगू कुणाला...”, बानू चल चल देवाला जाऊ खंडोबाचा दर्शन घेऊ,
भंडारा खोबर वाहू .....”, “सपनात अंबा आली हितगुज सांगून गेले. छबिण्याला स्वार
झाली वाघावर....”, “माझ्या मनाची इच्छा झाली पुरी......”, “जोवर आहे जीवात जीव आई
आई म्हणून कोणी हाक मारी....”, “ स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी...” अशा
प्रकारची सदाबहार भजने सादर करून ज्येष्ठ नागरिकांची मने जिंकली.
या कार्यक्रमात गायिका कांबळे यांना गणेश
लक्ष्मन सरवदे - ढोलक वादक, की बोर्ड व गायक – तानसेन लोकरे, झांज वादक –
माधव शिंदे. या कलाकारांनी उत्तम साथ दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी जेष्ठ नागरिक वामनराव
सातपुते व सुहास माने यांनी ढोलकीच्या तालावर या गाण्यावर नृत्य करून उपस्थित
ज्येष्ठ नागरिकांची दाद मिळवली. व त्यांचा सोबत थेका धरत नृत्य केले.
श्री.ब्रिजमोहनजी
फोफलीया यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. आणि कार्यक्रमाची सांगता
झाली. यावेळी सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संखेने उपस्थितीत होते.
Subscribe to:
Posts (Atom)